scorecardresearch

उजनी धरण News

उजनी (Ujani-Dam) हे भीमा नदीवरील मोठे धरण आहे. या धरणामुळे तयार झालेल्या जलाशयाला यशवंत सागर असेही म्हटले जाते. मोठी जलक्षमता असलेला हा तलाव असल्याने येथे मत्स्यपालनाचा व्यवसाय ही मोठ्या प्रमाणात चालतो. या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता १५१७ गिगालिटर्स इतकी आहे. भीमा नदी ही महाराष्ट्र (७५ टक्के) आणि कर्नाटक (२५ टक्के) अशा दोन राज्यांतून वाहते. पश्चिम घाटातील भीमाशंकर टेकड्यांमधून उगम पावणाऱ्या या नदीच्या कुंडली, घोड, भामा, इंद्रायणी अशा काही उपनद्या आहेत. पुण्यामधून वाहत येणाऱ्या नद्यांच्या प्रवाहामुळे हे धरण नेहमी भरलेले असते.

याच्या बांधकामाची सुरुवात १९६९ मध्ये झाली होती, तर १९८० मध्ये ते बांधून पूर्ण झाले. या धरणामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फायदा होतो. अशा या भव्य धरणाभोवती गेल्या काही वर्षांपासून वाळू उपसून चोरी करण्याचे प्रमाण वाढले आहे. या विभागामध्ये वाळू माफियांची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे.
Read More
fish
उजनीत ‘हेलिकॉप्टर’ माशांचा सुळसुळाट, पारंपरिक माशांवर संकट फ्रीमियम स्टोरी

सध्या उजनी जलाशयात पारंपरिक गोड्या पाण्यातील माशांचे प्रमाण अत्यल्प राहिले आहे. जलाशयात ‘हेलिकॉप्टर’ माशांचा वेगाने वाढणारा उपद्रव ही मच्छीमारांसाठी डोकेदुखी…

Increase in water release from Ujani Dam
उजनी धरणातून पाण्याच्या विसर्गात वाढ – नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

घाटमाथ्यावर सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे.

Maharashtra dam silt removal policy Godavari river linking project irrigation boost Telangana desilting model
तेलंगणाच्या धर्तीवर राज्यातील धरणांमधून गाळ उपसा; पर्यावरणीय परिणामांचा विचार करून नवीन धोरण

पर्यावरण विभागाच्या मान्यतेने गाळ काढण्याची प्रक्रिया पुढे नेण्यात येणार असल्याचे राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

ताज्या बातम्या