Associate Partner
Granthm
Education Partner
XAT
Samsung

उजनी धरण Videos

उजनी (Ujani-Dam) हे भीमा नदीवरील मोठे धरण आहे. या धरणामुळे तयार झालेल्या जलाशयाला यशवंत सागर असेही म्हटले जाते. मोठी जलक्षमता असलेला हा तलाव असल्याने येथे मत्स्यपालनाचा व्यवसाय ही मोठ्या प्रमाणात चालतो. या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता १५१७ गिगालिटर्स इतकी आहे. भीमा नदी ही महाराष्ट्र (७५ टक्के) आणि कर्नाटक (२५ टक्के) अशा दोन राज्यांतून वाहते. पश्चिम घाटातील भीमाशंकर टेकड्यांमधून उगम पावणाऱ्या या नदीच्या कुंडली, घोड, भामा, इंद्रायणी अशा काही उपनद्या आहेत. पुण्यामधून वाहत येणाऱ्या नद्यांच्या प्रवाहामुळे हे धरण नेहमी भरलेले असते.

याच्या बांधकामाची सुरुवात १९६९ मध्ये झाली होती, तर १९८० मध्ये ते बांधून पूर्ण झाले. या धरणामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फायदा होतो. अशा या भव्य धरणाभोवती गेल्या काही वर्षांपासून वाळू उपसून चोरी करण्याचे प्रमाण वाढले आहे. या विभागामध्ये वाळू माफियांची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे.
Read More