scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

उर्वशी रौतेला Videos

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा जन्म २५ फेब्रुवारी १९९४ रोजी हरिद्वारमध्ये झाला होता. तिने सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूल, कोटद्वार आणि दिल्लीतील गार्गी कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केलं आहे. विल्स लाइफस्टाइल इंडिया फॅशन वीकमध्ये रौतेलाला वयाच्या १५ व्या वर्षी पहिला ब्रेक मिळाला होता. तिने मिस टीन इंडिया २००९ चे विजेतेपद देखील पटकावले होते. लॅक्मे फॅशन वीकसाठी ती मॉडेल म्हणून शो स्टॉपर होती आणि अॅमेझॉन फॅशन वीक, बॉम्बे फॅशन वीक आणि दुबई फॅशन वीकमध्ये तिने रॅम्प वॉक केला होता. तिने २०१३मध्ये ‘सिंग साब द ग्रेट’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तिने ‘सनम रे’, ‘हेट स्टोरी ४’, ‘पागलपंती’, ‘वर्जिन भानूप्रिया’ या चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. याशिवाय तिने काही दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केलं असून ती अनेक म्युझिक व्हिडीओमध्येही झळकली आहे. Read More