scorecardresearch

वाशिम News

वाशिम (Washim) जिल्हा महाराष्ट्र राज्यातील विदर्भ भागात पश्चिमेला स्थित आहे. त्याच्या उत्तरेस अकोला, ईशान्येला अमरावती, दक्षिणेस हिंगोली, पश्चिमेस बुलढाणा, पूर्वेस यवतमाळ अशी राज्ये आहेत. पैनगंगा ही या जिह्यातील प्रमुख नदी आहे. ही नदी वाशिमच्या रिसोड तालुक्यातून वाहते. पुढे ती वाशिम आणि हिंगोली जिल्ह्यांच्या हद्दीतून वाहते. पैनगंगा नदीव्यतिरिक्त या जिह्यामध्ये कास नगी, अरुणावती नदी, काटेपूर्णा नदी अशा नद्या आहेत. हा जिल्हा वाशिम, मंगरुळपीर आणि कारंजा या तीन उपविभागांमध्ये विभागला गेला आहे. त्याची पुढे सहा तालुक्यांमध्ये विभागणी करण्यात आली. मालेगाव, मंगरुळपीर, कारंजा, मानोरा, वाशिम आणि रिसोड हे वाशिम जिह्यातील तालुके आहेत. वाशिम हे जिह्यातील सर्वात मोठे शहर आहे. तेथे जिल्ह्यातील सर्वात मोठे रेल्वे जंक्शनही आहे. या जंक्शनमुळे हा जिल्हा अन्य जिल्ह्यांशी जोडला गेला आहे.


वाशिमला मोठा इतिहास लाभला आहे. एकेकाळी ही जागा वाकाटक राजवटीच्या वत्सगुल्मा वंशातील लोकांची राजधानी होती. तेव्हा वाशिम हे वत्सगुल्मा म्हणून ओळखले जात असे. वाकाटक राजवटीच्या प्रवरसेन प्रथम याच्या मृत्यूनंतर त्यांचा द्वितीय पुत्र सर्वसेन यांनी वत्सगुल्मा वंशाची स्थापना केली. सह्याद्री पर्वतरांगांपासून ते गोदावरी नदी दरम्यानचा भाग त्यांच्या अधिपत्याखाली होता. त्यांनी अजिंठा येथील काही बौद्ध लेण्यांचे संरक्षण केले असे म्हटले जाते. पुढे मुघल काळात अकोला जिल्ह्याचा मोठा भाग अकबराच्या सोरकर किंवा नरनाळा या महसूल जिल्ह्यात समाविष्ट होता. १९०५ मध्ये ब्रिटीश राजवटीत वाशिमचे विभाजन करून अकोला जिल्हा आणि यवतमाळ जिल्हा असे दोन स्वतंत्र जिल्हे करण्यात आले. तेव्हा वाशिम शहर हे अकोला जिल्ह्यामध्ये होते आणि राज्यकारभारासाठी संपूर्ण अकोला जिह्यावर अवलंबून होता. पुढे वाशिम जिल्ह्याची स्थापना १ जुलै १९९८ रोजी झाली.


Read More
anukampa, government job compassionate appointment, Washim district government jobs, compassionate appointment process, government jobs in Maharashtra, family support after father's death,
संघर्ष अन प्रतीक्षा! अनुकंपा नोकरीसाठी तब्बल दहा वर्ष झिजवले शासकीय उंबरठे

वडिलांच्या निधनानंतर कुटुंबावर दु:खाचे डोंगर कोसळतो. कुटुंबाचा आधार हरपल्यानंतर जबाबदारी निश्चितच मुलांवरच येते. अनुकंपा तत्वावर नोकरी लागणार या आशेवर असतांना…

amravati university sub center in akola approved
अमरावती विद्यापीठाचे उपकेंद्र अकोल्यात होणार, जागेची शोधशोध; तात्पुरत्या स्वरूपात महाविद्यालयात…

विद्यापीठाचे उपकेंद्र अकोल्यात सुरू करण्याला मंजुरी मिळाल्याने आता जागेच्या शोधासोबतच तात्पुरत्या स्वरूपात ते महाविद्यालयात सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.

Maharashtra Nagarparishad And Nagarpanchayat Reservation
Nagarparishad-Nagarpanchayat Reservation : कोण होणार तुमचा नगराध्यक्ष? नगरपरिषद व नगरपंचायतींमधील आरक्षण जाहीर, वाचा संपूर्ण यादी

Maharashtra Nagarparishad And Nagarpanchayat Reservation Reservation Details : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार हा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात…

rains flood akola Washim fields soybean crops sprout causing huge losses to farmers
पावसामुळे पूल वाहून गेला अकोला, वाशीम जिल्ह्यात उभे पिके पाण्यात; सोयाबीनला कोंब फुटले

अकोला, वाशीम जिल्ह्यात पावसाचा कहर कायम असून शेतकऱ्यांचे उभे पिके पाण्यात गेले. सोयाबीन पिकाला कोंब फुटल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले…

heavy rains again hit akola and washim causing floods
पुन्हा ‘कोसळ’धारांचा तडाखा, अकोल्यात खड्ड्यात पडून एकजण वाहून गेला; वाशिम जिल्ह्यात जनावरे वाहून गेली

अकोला व वाशीम जिल्ह्यांना पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा तडाखा बसला आहे.गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यांमध्ये कोसळधारा सुरू आहेत.

Akola Zilla Parishad election, Washim Zilla Parishad election, Scheduled Tribe women reservation,
अकोला, वाशीम जिल्हा परिषदेत ‘महिलाराज’ येणार; अनुसूचित जमातीच्या महिला मिनी मंत्रालयाच्या कारभारी

अकोला आणि वाशीम जिल्हा परिषदेमध्ये ‘महिलाराज’ येणार आहे. दोन्ही जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी आरक्षित झाले.

heavy rain in washim caused rivers to overflow flooding roads and halting all traffic
वाशिम जिल्ह्यात मुसळधारेने नदी, नाल्यांना पूर अनेक मार्ग बंद, वीज पुरवठा खंडित, वृक्ष उन्मळून पडले, शेतात पाणीच पाणी…

वाशिम जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. मुसळधार पावसामुळे नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. पूर आल्याने अनेक मार्ग बंद होऊन…

Akola heavy rain, Dattatray visit Akola, heavy rainfall damage, Washim farmer aid, crop damage relief,
अकोला : चिखलातून वाट काढत कृषिमंत्री बांधावर, व्यथा सांगताना बळीराजाचे अश्रू अनावर

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची अतोनात हानी झाली आहे. राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी बुधवारी वाशीम जिल्ह्यात पोहोचले.

washim heavy rainfall damage, washim crop loss 2025, washim flood relief updates,
वाशिम जिल्ह्यात हळदीचे पीक पाण्यात, पावसाने ७८ हजारांवर शेतकऱ्यांच्या…

वाशिम जिल्ह्याला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. या पावसाने ७८ हजारांवर शेतकऱ्यांच्या डोळ्यात अक्षरश: पाणी आणले.