scorecardresearch

वाशिम Photos

वाशिम (Washim) जिल्हा महाराष्ट्र राज्यातील विदर्भ भागात पश्चिमेला स्थित आहे. त्याच्या उत्तरेस अकोला, ईशान्येला अमरावती, दक्षिणेस हिंगोली, पश्चिमेस बुलढाणा, पूर्वेस यवतमाळ अशी राज्ये आहेत. पैनगंगा ही या जिह्यातील प्रमुख नदी आहे. ही नदी वाशिमच्या रिसोड तालुक्यातून वाहते. पुढे ती वाशिम आणि हिंगोली जिल्ह्यांच्या हद्दीतून वाहते. पैनगंगा नदीव्यतिरिक्त या जिह्यामध्ये कास नगी, अरुणावती नदी, काटेपूर्णा नदी अशा नद्या आहेत. हा जिल्हा वाशिम, मंगरुळपीर आणि कारंजा या तीन उपविभागांमध्ये विभागला गेला आहे. त्याची पुढे सहा तालुक्यांमध्ये विभागणी करण्यात आली. मालेगाव, मंगरुळपीर, कारंजा, मानोरा, वाशिम आणि रिसोड हे वाशिम जिह्यातील तालुके आहेत. वाशिम हे जिह्यातील सर्वात मोठे शहर आहे. तेथे जिल्ह्यातील सर्वात मोठे रेल्वे जंक्शनही आहे. या जंक्शनमुळे हा जिल्हा अन्य जिल्ह्यांशी जोडला गेला आहे.


वाशिमला मोठा इतिहास लाभला आहे. एकेकाळी ही जागा वाकाटक राजवटीच्या वत्सगुल्मा वंशातील लोकांची राजधानी होती. तेव्हा वाशिम हे वत्सगुल्मा म्हणून ओळखले जात असे. वाकाटक राजवटीच्या प्रवरसेन प्रथम याच्या मृत्यूनंतर त्यांचा द्वितीय पुत्र सर्वसेन यांनी वत्सगुल्मा वंशाची स्थापना केली. सह्याद्री पर्वतरांगांपासून ते गोदावरी नदी दरम्यानचा भाग त्यांच्या अधिपत्याखाली होता. त्यांनी अजिंठा येथील काही बौद्ध लेण्यांचे संरक्षण केले असे म्हटले जाते. पुढे मुघल काळात अकोला जिल्ह्याचा मोठा भाग अकबराच्या सोरकर किंवा नरनाळा या महसूल जिल्ह्यात समाविष्ट होता. १९०५ मध्ये ब्रिटीश राजवटीत वाशिमचे विभाजन करून अकोला जिल्हा आणि यवतमाळ जिल्हा असे दोन स्वतंत्र जिल्हे करण्यात आले. तेव्हा वाशिम शहर हे अकोला जिल्ह्यामध्ये होते आणि राज्यकारभारासाठी संपूर्ण अकोला जिह्यावर अवलंबून होता. पुढे वाशिम जिल्ह्याची स्थापना १ जुलै १९९८ रोजी झाली.


Read More

ताज्या बातम्या