scorecardresearch

वाशिम News

वाशिम (Washim) जिल्हा महाराष्ट्र राज्यातील विदर्भ भागात पश्चिमेला स्थित आहे. त्याच्या उत्तरेस अकोला, ईशान्येला अमरावती, दक्षिणेस हिंगोली, पश्चिमेस बुलढाणा, पूर्वेस यवतमाळ अशी राज्ये आहेत. पैनगंगा ही या जिह्यातील प्रमुख नदी आहे. ही नदी वाशिमच्या रिसोड तालुक्यातून वाहते. पुढे ती वाशिम आणि हिंगोली जिल्ह्यांच्या हद्दीतून वाहते. पैनगंगा नदीव्यतिरिक्त या जिह्यामध्ये कास नगी, अरुणावती नदी, काटेपूर्णा नदी अशा नद्या आहेत. हा जिल्हा वाशिम, मंगरुळपीर आणि कारंजा या तीन उपविभागांमध्ये विभागला गेला आहे. त्याची पुढे सहा तालुक्यांमध्ये विभागणी करण्यात आली. मालेगाव, मंगरुळपीर, कारंजा, मानोरा, वाशिम आणि रिसोड हे वाशिम जिह्यातील तालुके आहेत. वाशिम हे जिह्यातील सर्वात मोठे शहर आहे. तेथे जिल्ह्यातील सर्वात मोठे रेल्वे जंक्शनही आहे. या जंक्शनमुळे हा जिल्हा अन्य जिल्ह्यांशी जोडला गेला आहे.


वाशिमला मोठा इतिहास लाभला आहे. एकेकाळी ही जागा वाकाटक राजवटीच्या वत्सगुल्मा वंशातील लोकांची राजधानी होती. तेव्हा वाशिम हे वत्सगुल्मा म्हणून ओळखले जात असे. वाकाटक राजवटीच्या प्रवरसेन प्रथम याच्या मृत्यूनंतर त्यांचा द्वितीय पुत्र सर्वसेन यांनी वत्सगुल्मा वंशाची स्थापना केली. सह्याद्री पर्वतरांगांपासून ते गोदावरी नदी दरम्यानचा भाग त्यांच्या अधिपत्याखाली होता. त्यांनी अजिंठा येथील काही बौद्ध लेण्यांचे संरक्षण केले असे म्हटले जाते. पुढे मुघल काळात अकोला जिल्ह्याचा मोठा भाग अकबराच्या सोरकर किंवा नरनाळा या महसूल जिल्ह्यात समाविष्ट होता. १९०५ मध्ये ब्रिटीश राजवटीत वाशिमचे विभाजन करून अकोला जिल्हा आणि यवतमाळ जिल्हा असे दोन स्वतंत्र जिल्हे करण्यात आले. तेव्हा वाशिम शहर हे अकोला जिल्ह्यामध्ये होते आणि राज्यकारभारासाठी संपूर्ण अकोला जिह्यावर अवलंबून होता. पुढे वाशिम जिल्ह्याची स्थापना १ जुलै १९९८ रोजी झाली.


Read More
Washim, contaminated water,
वाशिम : दूषित पाण्यामुळे ५० पेक्षा अधिक ग्रामस्थांची प्रकृती बिघडली; अनेकांना उलटी, मळमळचा त्रास

मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथे दूषित पाणीमुळे जवळपास ५० पेक्षा अधिक ग्रामस्थांची प्रकृती बिघडली. शनिवारी काहींना उलटी, मळमळचा त्रास उद्भवला.

Bhavana Gawali, ticket,
भावना गवळींचे तिकीट कापणे शिंदे सेनेच्या अंगलट, हा निकाल युतीसाठी धोक्याची घंटा

राजश्री पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला. सहाही विधानसभा मतदारसंघात युतीचे आमदार असताना राजश्री पाटील यांचा पराभव युतीसाठी धोक्याची घंटा…

Washim, Abuse, girl,
वाशिम : घरात एकट्या असलेल्या ८ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, वज्रदेही महिला विकास संघाचा मोर्चा

वाशिम शहरात माणूसकीला काळीमा फासणारी घटना घडली. कुटुंबातील सदस्य हळदीच्या कार्यक्रमाला गेले असता, जवळच राहणाऱ्या गुंड प्रवृत्तीचा व्यक्ती विजय उर्फ…

three nilgai dies after fell into well
दुर्दैवी… तीन रोहींचा विहिरीत पडून मृत्यू; पाण्याच्या शोधात भटकंती, वनविभागाची उदासीनता

बहुतांश विहिरींना कठडे नसल्याने त्याचा अंदाज प्राण्यांना येत नसून विहिरीत पडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू होत आहे. यापूर्वी देखील अशा घटना…

yavatmal washim lok sabha constituency
“यवतमाळ-वाशीम लोकसभेच्या मतमोजणीला स्थगिती द्या”, उच्च न्यायालयात याचिका; आक्षेप काय? जाणून घ्या…

यवतमाळ-वाशीम लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीचे प्रकरण आता थेट उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात पोहोचले आहे.

Washim, highway blocked,
वाशिम : वारंवार वीज जात असल्याने नागरिक संतापले, महामार्गच रोखून धरला!

गत काही दिवसापासून शेलूबाजारच नव्हे तर अनेक गावातील वीज पुरवठा काही ना काही कारणाने वारंवार खंडित होत असल्यामुळे ऐन उकड्याच्या…

washim farmer suicide marathi news
चिंताजनक : ४ महिन्यांत १८ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले; मृत्यूनंतरही कुटुंबीयांचा मदतीसाठी संघर्ष

सरत्या वर्षात ८३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तर चालू वर्षातील केवळ ४ महिन्यात १८ शेतकऱ्यांनी जीवन संपविले.

Dengue, chikungunya, Washim,
सावधान ! वाशिममध्ये डेंग्यू, चिकनगुनियाची साथ; १६१ संशयीतांपैकी…

मागील काही दिवसांपासून वातावरणात झालेला बदल, घरातील कुलरमधील साचलेले पाणी, सांडपाणी व इतर कारणामुळे जिल्ह्यात डेंगू, चिकनगुणीयाचा प्रादुर्भाव वाढला आहे.

jal jeevan mission marathi news
‘हर घर नल, हर घर जल’ची प्रतीक्षाच! जलजीवन योजनेवर १९८ कोटी खर्च

ग्रामीण भागातील नागरिकांना प्रति व्यक्ती ५५ लिटर गुणवत्तापुर्ण व शुध्द पाणी देण्यासाठी सरकारने जल जीवन मिशन योजना सुरु केली.

washim, Stormy Rain, High Winds, Stormy Rain in washim, High Winds in washim, Widespread Damage, Power Supply Disrupted,
वाशीम जिल्ह्याला वादळी पावसाचा तडाखा; झाडांची पडझड, अनेक घरांचे नुकसान

हवामान विभागाने वाशीम जिल्ह्यात वादळी पावसाचा व्यक्त केलेला अंदाज खरा ठरला. आज दुपारनंतर वादळी वारा व पावसाने जिल्ह्याला झोडपले.