scorecardresearch

कुस्ती News

कुस्ती (Wrestling) हा एक मर्दानी खेळ आहे; जो फार पूर्वीपासून खेळला जातो. हा खेळ दोन खेळाडू किंवा स्पर्धकांमध्ये खेळला जातो. या खेळाडूंना पहिलवान आणि कुस्तीपटू असेही बोलले जाते. या खेळात डाव टाकणे, चपळता असणे व झटपट निर्णय घेण्याची क्षमता असणे अत्यंत महत्त्वाचे असते. या खेळात अनेक डावपेच असतात. हा खेळ इतर देशांमध्येही लोकप्रिय आहे. भारतात कुस्ती ही तांबड्या मातीत खेळली जाते. ऑलिम्पिक स्पर्धेत कुस्तीचे सामने एका जाड सतरंजीवर खेळले जातात. या खेळात फ्रीस्टाईल कुस्ती असाही एक प्रकार आहे. महाराष्ट्र केसरी ही महाराष्ट्र राज्यातील कुस्ती स्पर्धा आहे. या स्पर्धेची सुरुवात १९६१ साली झाली.


भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९५३ मध्ये महाराष्ट्र चॅम्पियन स्पर्धा पार पडली होती. तेव्हा पुण्यातील नगरकर तालमीचे प्रसिद्ध पहिलवान नुकाराम नानासाहेब फाळके यांनी ती स्पर्धा जिंकली होती. सुरुवातीला या स्पर्धेचे बक्षीस रोख रक्कम रूपात होते आणि १९८२ पासून विजेत्यांना दीड किलो वजनाची चांदीची गदा देऊन गौरवण्यात येते. अशी पहिली गदा कुस्तीवीर मामासाहेब मोहोळ यांना मिळाली होती. या स्पर्धेतील विजेते सरकारी नोकरीसाठी क्रीडा क्षेत्रातील राखीव जागांसाठी अर्ज करू शकतात.


कुस्ती स्पर्धेत महिला खेळाडूदेखील असतात. नुकत्याच झालेल्या १९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला कुस्त्यांमध्ये भारताची नवी अंतिम पंघाल हिने ५३ किलो वजनी गटात भारतासाठी कास्यपदक जिंकले होते; तर २० वर्षांखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताच्या मोहित कुमारेने ६३ किलो वजनी गटात फ्री स्टाईल कुस्तीमध्ये सुवर्णपदक जिंकले या वयोगटात विजेतेपद मिळवणारा हा चौथा भारतीय ठरला आहे. कुस्तीशी संबंधित विविध स्पर्धा आणि खेळाडूंच्या कामगिरीबाबत तुम्हाला येथे माहिती मिळू शकते


Read More
Asian sports gold medalist, wrestling champions India, Pune sports talent, Sunny Phulmali achievements, Indian wrestling awards,
चंद्रकांत पाटलांनी घेतले कुस्तीपटू सनी फुलमाळीचे पालकत्व; उदरनिर्वाहासाठी दरमहा पगारातून देणार ५० हजार रुपये

घरची परिस्थिती बिकट असूनही जिद्द,चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या बळावर बहरिन येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सनी फुलमाळीने भारतासाठी सुवर्णपदक कमवले.

sunny Phulmali won gold in wrestling at bahrain asian youth games
कौतुकास्पद : नंदीबैल गावोगावी फिरवणार्‍या च्या मुलाने,एशियन युथ गेमच्या कुस्ती स्पर्धेत मिळवले सुवर्णपदक

बीड जिल्हय़ातील आष्टी तालुक्यातील पाखसर गावातील सुभाष फुलमाळी यांच्या मुलाने बहरीन येथे झालेल्या एशियन युथ गेम पर्यत जाऊन पोहोचला आणि…

court granted bail to wrestler sikander Sheikh
कुस्तीपटू सिकंदर शेखची कोल्हापूरची गंगावेश तालीम, या तालिमशी येवल्याचा काय संबंध ?

कुस्तीपटू पहिलवान सिकंदर शेख यास अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात न्यायालयाने सिंकदरविरुध्द यापूर्वी कोणताही गुन्हा नसल्याने जामीन मंजूर केला. यानिमित्ताने सिकंदर…

Sikander Sheikh, who shone in the wrestling ring, is now in the light of the law
कुस्तीत थार, बुलेट जिंकणारा सिकंदर शेख असे का करेल ? महाराष्ट्र केसरी उपविजेता राजेंद्र लोणारी यांचा प्रश्न

नाशिक : कुस्तीपटू सिकंदर शेखच्या अटकेने खळबळ; “सुनियोजित कट, असा गुन्हा तो करूच शकत नाही,” असा दावा महाराष्ट्र केसरी उपविजेता…

sikandar-shaikh-father- reaction
“हिंद केसरी स्पर्धा जवळ आल्यामुळं…”, आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू सिकंदर शेखच्या अटकेनंतर वडिलांनी केला मोठा आरोप

Wrestler Sikandar Shaikh: कुस्तीपटू सिकंदर शेख याला अवैध शस्त्रांच्या तस्करी प्रकरणात पंजाब पोलिसांनी अटक केली. यानंतर त्याच्या वडिलांनी भावनिक साद…

rohit-pawar-on-sikandar-shaikh-arrest
महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखच्या अटकेनंतर रोहित पवारांनी व्यक्त केला संशय; म्हणाले, “कदाचित त्याची प्रगती पाहून…”

Sikandar Shaikh Arrest: महाराष्ट्र केसरी विजेता पैलवान सिंकदर शेखला पंजाब पोलिसांनी अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात अटक झाल्यानंतर खळबळ उडाली. यावर…

U23 World Wrestling Championships news
सुजीत कलकलची सुवर्णपदकावर मोहोर; युवा जागतिक कुस्तीत उझबेकिस्तानच्या जालोलोव्हवर एकतर्फी विजय

फ्री-स्टाइल विभागातील ६५ किलो वजनी गटाच्या अंतिम लढतीत सुजीतने उझबेकिस्तानच्या उमिदजोन जालोलोव्ह याच्यावर तांत्रिक वर्चस्वावर १०-० अशी मात केली.

Indian wrestlers latest news
हंसिका, सारिकाला रौप्यपदक; युवा जागतिक कुस्तीत भारताला सर्वसाधारण जेतेपद

हंसिकाला ५३ किलो वजनी गटाच्या अंतिम लढतीत जपानच्या हरुना मोरिकावाकडून ०-४ असा पराभव पत्करावा लागला. अंतिम लढतीच्या पहिल्या फेरीत हंसिकाने…

Maharashtra Sahabrao centenary Hind Kesari National Wrestling Competition Satara Sharad Pawar
क्रीडामहर्षी साहेबराव पवारांच्या शतकपूर्ती वर्षाला आदरांजली! पुरुष, महिला हिंदकेसरी स्पर्धेचे साताऱ्यात आयोजन…

Hind Kesari, Satara : भारतीय शैली कुस्ती महासंघाच्या मान्यतेने होणाऱ्या या स्पर्धेत देशभरातील २६ राज्यांतून सुमारे ८०० पुरुष आणि महिला…

Aman Sehrawat disqualified from World Wrestling Championships due to overweight sports news
वाढीव वजनामुळे अमन सेहरावत अपात्र; जागतिक कुस्ती स्पर्धेत ऑलिम्पिकमधील विनेश फोगटच्या चुकीची पुनरावृत्ती

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत विनेश फोगटकडून अशीच चूक झाली होती. त्याच चुकीची पुनरावृत्ती जागतिक स्पर्धेत अमन सेहरावतकडून झाली.

Wrestler Kyle Cummings to stand trial on drug charges
अमली पदार्थप्रकरणी कुस्तीपटू काइल कमिंग्सवर खटला चालणार

कमिंग्स याला उच्च न्यायालयाने गेल्या वर्षी जामीन मंजूर केला होता. त्यानंतर, कमिंग्स याने गुन्ह्यात सहभागी असल्याचा कोणताही थेट पुरावा नाही,…