scorecardresearch

कुस्ती Videos

कुस्ती (Wrestling) हा एक मर्दानी खेळ आहे; जो फार पूर्वीपासून खेळला जातो. हा खेळ दोन खेळाडू किंवा स्पर्धकांमध्ये खेळला जातो. या खेळाडूंना पहिलवान आणि कुस्तीपटू असेही बोलले जाते. या खेळात डाव टाकणे, चपळता असणे व झटपट निर्णय घेण्याची क्षमता असणे अत्यंत महत्त्वाचे असते. या खेळात अनेक डावपेच असतात. हा खेळ इतर देशांमध्येही लोकप्रिय आहे. भारतात कुस्ती ही तांबड्या मातीत खेळली जाते. ऑलिम्पिक स्पर्धेत कुस्तीचे सामने एका जाड सतरंजीवर खेळले जातात. या खेळात फ्रीस्टाईल कुस्ती असाही एक प्रकार आहे. महाराष्ट्र केसरी ही महाराष्ट्र राज्यातील कुस्ती स्पर्धा आहे. या स्पर्धेची सुरुवात १९६१ साली झाली.


भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९५३ मध्ये महाराष्ट्र चॅम्पियन स्पर्धा पार पडली होती. तेव्हा पुण्यातील नगरकर तालमीचे प्रसिद्ध पहिलवान नुकाराम नानासाहेब फाळके यांनी ती स्पर्धा जिंकली होती. सुरुवातीला या स्पर्धेचे बक्षीस रोख रक्कम रूपात होते आणि १९८२ पासून विजेत्यांना दीड किलो वजनाची चांदीची गदा देऊन गौरवण्यात येते. अशी पहिली गदा कुस्तीवीर मामासाहेब मोहोळ यांना मिळाली होती. या स्पर्धेतील विजेते सरकारी नोकरीसाठी क्रीडा क्षेत्रातील राखीव जागांसाठी अर्ज करू शकतात.


कुस्ती स्पर्धेत महिला खेळाडूदेखील असतात. नुकत्याच झालेल्या १९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला कुस्त्यांमध्ये भारताची नवी अंतिम पंघाल हिने ५३ किलो वजनी गटात भारतासाठी कास्यपदक जिंकले होते; तर २० वर्षांखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताच्या मोहित कुमारेने ६३ किलो वजनी गटात फ्री स्टाईल कुस्तीमध्ये सुवर्णपदक जिंकले या वयोगटात विजेतेपद मिळवणारा हा चौथा भारतीय ठरला आहे. कुस्तीशी संबंधित विविध स्पर्धा आणि खेळाडूंच्या कामगिरीबाबत तुम्हाला येथे माहिती मिळू शकते


Read More
Sakshi Malik Retirement
Sakshi Malik Retirement: पत्रकार परिषदेत साक्षी मलिकला अश्रू अनावर, कुस्तीपटूंची नेमकी भूमिका काय?

Sakshi Malik Retirement: भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक संजय कुमार सिंह (Sanjay Kumar Singh) यांनी जिंकली आहे. संजय सिंह (Sanjay…

ताज्या बातम्या