scorecardresearch

कुस्ती News

कुस्ती (Wrestling) हा एक मर्दानी खेळ आहे; जो फार पूर्वीपासून खेळला जातो. हा खेळ दोन खेळाडू किंवा स्पर्धकांमध्ये खेळला जातो. या खेळाडूंना पहिलवान आणि कुस्तीपटू असेही बोलले जाते. या खेळात डाव टाकणे, चपळता असणे व झटपट निर्णय घेण्याची क्षमता असणे अत्यंत महत्त्वाचे असते. या खेळात अनेक डावपेच असतात. हा खेळ इतर देशांमध्येही लोकप्रिय आहे. भारतात कुस्ती ही तांबड्या मातीत खेळली जाते. ऑलिम्पिक स्पर्धेत कुस्तीचे सामने एका जाड सतरंजीवर खेळले जातात. या खेळात फ्रीस्टाईल कुस्ती असाही एक प्रकार आहे. महाराष्ट्र केसरी ही महाराष्ट्र राज्यातील कुस्ती स्पर्धा आहे. या स्पर्धेची सुरुवात १९६१ साली झाली.


भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९५३ मध्ये महाराष्ट्र चॅम्पियन स्पर्धा पार पडली होती. तेव्हा पुण्यातील नगरकर तालमीचे प्रसिद्ध पहिलवान नुकाराम नानासाहेब फाळके यांनी ती स्पर्धा जिंकली होती. सुरुवातीला या स्पर्धेचे बक्षीस रोख रक्कम रूपात होते आणि १९८२ पासून विजेत्यांना दीड किलो वजनाची चांदीची गदा देऊन गौरवण्यात येते. अशी पहिली गदा कुस्तीवीर मामासाहेब मोहोळ यांना मिळाली होती. या स्पर्धेतील विजेते सरकारी नोकरीसाठी क्रीडा क्षेत्रातील राखीव जागांसाठी अर्ज करू शकतात.


कुस्ती स्पर्धेत महिला खेळाडूदेखील असतात. नुकत्याच झालेल्या १९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला कुस्त्यांमध्ये भारताची नवी अंतिम पंघाल हिने ५३ किलो वजनी गटात भारतासाठी कास्यपदक जिंकले होते; तर २० वर्षांखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताच्या मोहित कुमारेने ६३ किलो वजनी गटात फ्री स्टाईल कुस्तीमध्ये सुवर्णपदक जिंकले या वयोगटात विजेतेपद मिळवणारा हा चौथा भारतीय ठरला आहे. कुस्तीशी संबंधित विविध स्पर्धा आणि खेळाडूंच्या कामगिरीबाबत तुम्हाला येथे माहिती मिळू शकते


Read More
Hetal Dave's India's first female sumo wrestler Story
लोकांनी वजनावरून चिडवले; मात्र महिला ‘सुमो’ कुस्तीपटू बनून हेतलने कसा रचला क्रीडाविश्वात इतिहास? पाहा….

वयाच्या पाचव्या वर्षापासून खेळात रस असणाऱ्या हेतल दवे हिने तिला वजनावरून चिडवणाऱ्या लोकांच्या बोलण्यावर मात करून दाखवली. हेतलने भारतातील पहिली…

Kushti Video Viral On Social Media Kusti Shocking Video
कुस्तीचा असा डाव कधीच पाहिला नसेल; अवघ्या ४० सेकंदात धोबीपछाड, बेळगावमधल्या जंगी कुस्तीचा Video Viral

भारतातील कुस्ती ही तांबड्या मातीत खेळली जाते. दरम्यान सध्या एक कुस्तीच्या आखाड्यातील व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये एका पैलवानानं दुसऱ्या…

vinesh fogat
ऑलिम्पिक कोटा विजेत्या कुस्तीगिरांना निवड चाचणीपासून सूट; मानांकन स्पर्धा, शिबिरातून तंदुरुस्तीचा आढावा घेण्याचा निर्णय

भारतीय कुस्ती महासंघाने (डब्ल्यूएफआय) सर्व सहा ऑलिम्पिक कोटा विजेत्या कुस्तीगिरांना निवड चाचणीपासून सूट देण्याचा निर्णय घेतला आहे.

nisha dahiya succeeded in securing the fifth olympic quota for the country in womens wrestlingr
कुस्तीपटू निशा दहियाची ऐतिहासिक कामगिरी; भारतासाठी जिंकला ऑलिम्पिकचा पाचवा कोटा

Paris Olympic 2024 Quota : कुस्तीपटू निशा दहिया ही भारतासाठी महिला कुस्तीमधील पाचवा पॅरिस ऑलिम्पिक कोटा जिंकणारी पहिली कुस्तीपटू ठरली…

bajarang puniya
जागतिक कुस्ती संघटनेकडून बजरंग निलंबित; उत्तेजक चाचणीस नकार दिल्यामुळे ‘यूडब्ल्यूडब्ल्यू’कडून कारवाई

उत्तेजक सेवन चाचणीस नकार दिल्यामुळे राष्ट्रीय उत्तेजक संस्थेने (नाडा) केलेल्या तात्पुरत्या निलंबनाच्या कारवाईपुढे एक पाऊल टाकत संयुक्त जागतिक कुस्ती संघटनेने (यूडब्ल्यूडब्ल्यू)…

aman sehravat
भारतीय मल्लांचे कौशल्य पणाला; अखेरची ऑलिम्पिक पात्रता कुस्ती स्पर्धा आजपासून

बीजिंग २००८ पासून टोक्यो येथे झालेल्या गेल्या ऑलिम्पिकपर्यंत कायम असलेली कुस्तीमधील ऑलिम्पिक पदकाची प्रतिष्ठा जपण्यासाठी भारतीय मल्ल आज, गुरुवारपासून सुरू होणाऱ्या…

aman
पुरुष कुस्तीगिरांबाबत नाराजी, पण ऑलिम्पिक पात्रतेसाठी पूर्वीचाच संघ!

बिश्केक येथे झालेल्या आशियाई पात्रता स्पर्धेतील पुरुष कुस्तीगिरांच्या कामगिरीबाबत भारतीय कुस्ती महासंघात (डब्ल्यूएफआय) नाराजी आहे.

brijbhushan singh
“महिला कुस्तीपटूंवर अत्याचार झाला तेव्हा…”, ब्रिजभूषण सिंहांची कोर्टात माहिती; आरोप निश्चितीचा आदेश पुढे ढकलला!

Brij Bhushan Sharan Singh News Update : महिला कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता. याविरोधात देशात…

Kushti Video Viral On Social Media Kusti Shocking Video
कुस्तीचा असा डाव कधी बघितलाय का? एका पैलवानानं दुसऱ्याला अवघ्या ४० सेकंदात दाखवलं आस्मान, जंगी कुस्तीचा Video Viral

Shocking video: हा सामना इतका थरारक झाला की पैलवान आखाडा सोडून पळून गेला. तुम्हालाही कुस्त्या बघायला आवडत असतील तर हा…

Delhi High Court directs Sports Ministry to clarify stand on suspension of Wrestling Federation of India
भारतीय कुस्ती महासंघाच्या निलंबनासंदर्भात भूमिका स्पष्ट करा! दिल्ली उच्च न्यायालयाची क्रीडा मंत्रालयाला सूचना

भारतीय कुस्ती महासंघाने (डब्ल्यूएफआय) क्रीडा मंत्रालयाने आपल्यावर लादलेल्या निलंबनाला आव्हान देणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली होती.

Bajrang Punia Ravi Dahiya eliminated from Paris Olympics qualification race
टोकियो पदक विजेते बजरंग पुनिया आणि रवी दहियाच्या पॅरिस ऑलिम्पिकच्या आशा संपुष्टात

Wrestling: टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने कुस्तीत दोन पदके जिंकली होती. रवी दहियाने रौप्य तर बजरंग पुनियाने कांस्यपदक जिंकले. मात्र आता या…

ताज्या बातम्या