SAIL Recruitment 2023 Apply For 120 Posts At Sail Co In | Loksatta

SAIL Recruitment 2023: SAIL मध्ये १०० पेक्षा जास्त पदांसाठी मेगा भरती; जाणून घ्या अर्ज भरण्याची शेवटची तारीख

​SAIL Recruitment 2023: सेलने अनेक पदांसाठी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यासाठी उमेदवार अधिकृत साइटला भेट देऊन अर्ज करू शकतात.

SAIL Recruitments 2023
फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम

​SAIL Recruitment 2023: भारतीय स्टील प्राधिकरण (SAIL) भिलाईने एक अधिसूचना जारी करून १२० पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. या भरतीसाठी पात्र असलेले उमेदवार १९ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना अधिकृत वेबसाइट http://www.sail.co.in ला भेट द्यावी लागेल. या मोहिमेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया यापूर्वीच सुरू झाली आहे.

ही मोहीम SAIL मध्ये 120 पदवीधर/तंत्रज्ञ शिकाऊ पदांसाठी भरतीसाठी चालवली जाईल. अभियानांतर्गत पदवीधर अभियंता अप्रेंटिसची ६० पदे भरण्यात येणार आहेत. यामध्ये मेकॅनिकलची १० पदे, इलेक्ट्रिकलची १० पदे, माइनिंगची १५ पदे आणि धातूशास्त्राची २५ पदांचा समावेश आहे. या मोहिमेअंतर्गत डिप्लोमा इंजिनीअरच्या एकूण ६० पदांची भरती करण्यात येणार आहे. ज्यामध्ये मेटलर्जीच्या २० पदे, १० सिव्हिल पदे, CS/IT च्या १० पदे आणि माइनिंगच्या २० पदांचा समावेश करण्यात आला आहे.

​SAIL Apprentice Recruitment 2023 पात्रता

मान्यताप्राप्त संस्थेतून B.Tech ची पदवी असलेले उमेदवार पदवीधर अप्रेंटिससाठी अर्ज करू शकतात आणि पॉलिटेक्निक उत्तीर्ण झालेले उमेदवार डिप्लोमासाठी अर्ज करू शकतात.

​SAIL Apprentice Recruitment 2023: निवड कशी केली जाईल

या पदांसाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया गुणवत्तेच्या आधारावर होईल. शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना डॉक्यूमेंट्स वेरिफिकेशन प्रक्रियेसाठी बोलावले जाईल.

( हे ही वाचा; Central Bank of India मध्ये बंपर भरती; दरमहा ८०,००० पेक्षा जास्त असेल पगार)

​SAIL Apprentice Recruitment 2023: वेतन

निवडलेल्या उमेदवारांना नियमानुसार दरमहा वेतन दिले जाईल.

​SAIL Apprentice Recruitment 2023: अर्ज फी किती असेल

अधिसूचनेनुसार, या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारले जाणार नाही.

​SAIL Apprentice Recruitment 2023: अशाप्रकारे अर्ज करा

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराला अधिकृत वेबसाइट sail.co.in वर जाऊन अर्ज करावा लागेल. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १९ फेब्रुवारी निश्चित करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व करिअर ( Career ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-02-2023 at 17:07 IST
Next Story
Recruitment 2023: १२ वी उत्तीर्णासाठी हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये मोठी संधी, १ लाखापर्यंत मिळणार पगार