पीटीआय, इम्फाळ : मणिपूरमध्ये लैंगिक अत्याचाराचे आणखी एक प्रकरण उघडकीस आले आहे. राज्यात ज्या दिवशी वांशिक संघर्षांला सुरुवात झाली त्या दिवशी, म्हणजे ३ मे रोजी आपण आपल्या जळत्या घरातून पळून जात असताना काही जणांनी आपल्यावर सामूहिक बलात्कार केला, असा आरोप चुडाचांदपूर जिल्ह्यातील ३७ वर्षांच्या एका महिलेने केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

 या संबंधात बिष्णुपूरच्या महिला पोलीस ठाण्यात ९ ऑगस्टला एफआयआर दाखल करण्यात आला असून, तो नंतर पुढील तपासासाठी चुडाचांदपूर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला, असे पोलिसांनी सांगितले. या एफआयआरनुसार, ‘अनोळखी कुकी पुरुषांनी’ चुडाचांदपूर जिल्ह्यातील खुमुजांबा मैतेई लेइकाई येथे सामूहिक बलात्कार केला.

 ‘३ मे रोजी सायंकाळी कुकी समाजकंटकांच्या एका गटाने या महिलेच्या घरासह अनेक घरे पेटवून दिली. या गोंधळात तिने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुमारे अर्धा किलोमीटर धावल्यानंतर काही लोकांनी तिला थांबवले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला’, असे पोलिसांनी या महिलेच्या तक्रारीचा हवाला देऊन सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Another case of rape exposed in manipur racial conflicts started ysh