‘अल्पसंख्याविरोधात कधीही एक शब्द उच्चारला नाही. भाजप आजच नाही तर यापूर्वी कधीही अल्पसंख्याकांविरोधात नव्हता. मात्र आपण कोणालाही ‘विशेष नागरिक’ म्हणून स्वीकारण्यास तयार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘पीटीआय व्हीडिओज’ला रविवारी दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदी यांनी अल्पसंख्याकांबाबत विरोधकांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. मोदींची निवडणूक प्रचार भाषणे सांप्रदायिकदृष्ट्या फूट पाडणारी आणि ध्रुवीकरण करणारी आहेत हा विरोधकांचा आरोप त्यांनी खोडून काढला. ‘‘काँग्रेसने सातत्याने राज्यघटनेच्या धर्मनिरपेक्ष भावनेचे उल्लंघन केले आहे. अल्पसंख्याकांना संतुष्ट करण्यासाठी मतपेढीचे राजकारण करण्याचा काँग्रेसचा डाव उधळून लावणे हा माझ्या प्रचार भाषणांचा उद्देश आहे,’’ असे मोदी म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जवाहरलाल नेहरू यांसह भारताच्या राज्यघटना निर्मात्यांनी धर्माच्या आधारावर आरक्षण नसल्याचा निर्णय घेतल्याचे मोदींनी नमूद केले.

आरक्षण धर्माच्या आधारावर नको

आरक्षणाच्या मुद्द्याला धर्माच्या आधारावर जोडणे चुकीचे आहे. राज्यघटना आणि त्यांच्या निर्मात्यांना धर्माच्या आधारावर आरक्षण कधीच नको होते. काँग्रेसनेच अनेक राज्यांमध्ये आरक्षण सौम्य केले आहे, धर्माच्या आधारावर दिले आहे आणि राज्यघटनेचा अपमान केला आहे. त्यांना धर्माच्या आधारावर आरक्षण राष्ट्रीय स्तरावर करायचे आहे. मात्र मी हे कधीही होऊ देणार नाही, असे पंतप्रधान यांनी सांगितले.

हेही वाचा >>> “भगवान जनन्नाथ हे पंतप्रधान मोदींचे भक्त”; संबित पात्रांच्या विधानानंतर नवा वाद निर्माण होण्याची शक्यता!

राज्यघटनेच्या कल्याणातच माझे कल्याण

पंतप्रधान मोदी यांनी स्वत:च्या जीवनाच्या वाटचालीचे श्रेय राज्यघटनेला दिले. कोणी असे गृहीत धरले की मी स्वार्थापोटी काम करत आहेत. मात्र असे असले तरी माझे स्वत:चे कल्याण राज्यघटनेच्या कल्याणामध्ये आहे, असे पंतप्रधान म्हणाले. भाजपच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकार लोकसभा निवडणुकीत ४०० पेक्षा जास्त जागा जिंकल्यास राज्यघटना बदलेल आणि आरक्षण संपवतील, हा विरोधकांचा आरोप मोदींनी नाकारला. भाजपचे सर्वाधिक मंत्री अनुसूचित जाती-जमाती आणि ओबीसी समाजातील आहे, असे मोदींनी नमूद केले.

मोदी सरकारकडून अधिक रोजगार

तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचा आताच्या सरकारचा प्रयत्न मागील सरकारच्या तुलनेत सर्वोत्तम आहे. अंतराळ, सेमीकंडक्टर उत्पादन आणि विद्याुत वाहने या उदयोन्मुख क्षेत्रांना पाठिंबा दिला आहे. तसेच नवोद्योगांना मदत, भरीव खर्च, पायाभूत सुविधा आणि उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजना (पीएलआय) यांमुळे अधिक रोजगार निर्माण होण्यास मदत झाली आहे, असे मोदी म्हणाले.

दक्षिणेत अधिक जागा भाजपच्याच

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठामपणे सांगितले की भाजप दक्षिणेतील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येईल. दक्षिणेत अधिक जागा मिळवून राष्ट्रीय लोकशाही आघाडी ४०० जागांचे लक्ष्य पार करेल, असे ते म्हणाले.

‘‘अल्पसंख्याविरोधात कधीही एक शब्द उच्चारला नाही. भाजप आजच नाही तर यापूर्वी कधीही अल्पसंख्याकांविरोधात नव्हता. मात्र आपण कोणालाही ‘विशेष नागरिक’ म्हणून स्वीकारण्यास तयार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

‘पीटीआय व्हीडिओज’ला रविवारी दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदी यांनी अल्पसंख्याकांबाबत विरोधकांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. मोदींची निवडणूक प्रचार भाषणे सांप्रदायिकदृष्ट्या फूट पाडणारी आणि ध्रुवीकरण करणारी आहेत हा विरोधकांचा आरोप त्यांनी खोडून काढला. ‘‘काँग्रेसने सातत्याने राज्यघटनेच्या धर्मनिरपेक्ष भावनेचे उल्लंघन केले आहे. अल्पसंख्याकांना संतुष्ट करण्यासाठी मतपेढीचे राजकारण करण्याचा काँग्रेसचा डाव उधळून लावणे हा माझ्या प्रचार भाषणांचा उद्देश आहे,’’ असे मोदी म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जवाहरलाल नेहरू यांसह भारताच्या राज्यघटना निर्मात्यांनी धर्माच्या आधारावर आरक्षण नसल्याचा निर्णय घेतल्याचे मोदींनी नमूद केले.

आरक्षण धर्माच्या आधारावर नको

आरक्षणाच्या मुद्द्याला धर्माच्या आधारावर जोडणे चुकीचे आहे. राज्यघटना आणि त्यांच्या निर्मात्यांना धर्माच्या आधारावर आरक्षण कधीच नको होते. काँग्रेसनेच अनेक राज्यांमध्ये आरक्षण सौम्य केले आहे, धर्माच्या आधारावर दिले आहे आणि राज्यघटनेचा अपमान केला आहे. त्यांना धर्माच्या आधारावर आरक्षण राष्ट्रीय स्तरावर करायचे आहे. मात्र मी हे कधीही होऊ देणार नाही, असे पंतप्रधान यांनी सांगितले.

राज्यघटनेच्या कल्याणातच माझे कल्याण

पंतप्रधान मोदी यांनी स्वत:च्या जीवनाच्या वाटचालीचे श्रेय राज्यघटनेला दिले. कोणी असे गृहीत धरले की मी स्वार्थापोटी काम करत आहेत. मात्र असे असले तरी माझे स्वत:चे कल्याण राज्यघटनेच्या कल्याणामध्ये आहे, असे पंतप्रधान म्हणाले. भाजपच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकार लोकसभा निवडणुकीत ४०० पेक्षा जास्त जागा जिंकल्यास राज्यघटना बदलेल आणि आरक्षण संपवतील, हा विरोधकांचा आरोप मोदींनी नाकारला. भाजपचे सर्वाधिक मंत्री अनुसूचित जाती-जमाती आणि ओबीसी समाजातील आहे, असे मोदींनी नमूद केले.

मोदी सरकारकडून अधिक रोजगार

तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचा आताच्या सरकारचा प्रयत्न मागील सरकारच्या तुलनेत सर्वोत्तम आहे. अंतराळ, सेमीकंडक्टर उत्पादन आणि विद्युत वाहने या उदयोन्मुख क्षेत्रांना पाठिंबा दिला आहे. तसेच नवोद्योगांना मदत, भरीव खर्च, पायाभूत सुविधा आणि उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजना (पीएलआय) यांमुळे अधिक रोजगार निर्माण होण्यास मदत झाली आहे, असे मोदी म्हणाले.

दक्षिणेत अधिक जागा भाजपच्याच

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठामपणे सांगितले की भाजप दक्षिणेतील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येईल. दक्षिणेत अधिक जागा मिळवून राष्ट्रीय लोकशाही आघाडी ४०० जागांचे लक्ष्य पार करेल, असे ते म्हणाले.

पंतप्रधान मोदी म्हणाले…

● जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा पुन्हा बहाल करणे हे आम्ही दिलेले ठाम आश्वासन आहे. ते आम्ही पूर्ण करू. केंद्र सरकार योग्य परिस्थिती निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहे.

● काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या प्रचाराच्या हीन पातळीमुळे त्यांना कमी मतदान होणार आहे. त्यांच्या पक्षाचे कार्यकर्तेही त्यांना मतदान करणार नाही.

● व्यापार व वाणिज्यला चालना देण्यासाठी चाबहार करार महत्त्वाचा आहे. अफगाणिस्तान आणि मध्य आशियाला जोडण्यासाठी हा करार महत्त्वाचा आहे.

● जागतिक शांतता, सुरक्षा आणि विकासाच्या अजेंडाला प्रोत्साहन देणाऱ्या सर्व महत्त्वाच्या शिखर परिषदेत भारत सहभागी होईल.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm modi denies targeting minorities in pti interview zws