पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन यांची प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना बुधवारी अहमदाबाद येथील यू. एन. मेहता इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओलॉजी अँड रिसर्च सेंटर या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांनतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेऊन तब्येतीची विचारपूस केली तसेच डॉक्टरांशी चर्चा केली होती. हिराबेन यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टारांनी सांगितले आहे. हिराबेन यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावी यासाठी देशभरातून प्रार्थना करण्यात येत आहे. अनेक राजकीय नेत्यांनी ट्विट आणि पत्राच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींना हिराबेन यांच्या प्रकृतीबद्दल काळजी व्यक्त करत दिलासा दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी देखील पत्राच्या माध्यमातून काळजी व्यक्त केली. शरद पवार पत्रात म्हणाले की, काल तुम्ही अहमदाबाद मधील हॉस्पिटलमध्ये जाऊन आईच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे आणि त्यात सुधारणा होत असल्याचे समजल्यानंतर मला बरं वाटलं. मला माहितीये तुमचे आणि आईचे संबंध फार जवळचे आहेत. तुमच्यासाठी हा कठीण काळ आहे, याची देखील मला जाणीव आहे.”

“आई ही या जगातील सर्वात पवित्र अशी गोष्ट आहे. तुमच्या आयुष्याला आकार देण्याचे आणि उर्जेचा एक अखंड स्त्रोत बनण्याचे काम तुमच्या आईने केले. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो, अशी सदिच्छा व्यक्त करतो. आपल्याला नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!”

हिराबेन मोदी यांची प्रकृती खालावल्यानंतर देशभरातून अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी काळजी व्यक्त केली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेते राहुल गांधी, सरचिटणीस प्रियंका गांधी वाडरा यांनी बुधवारी हिराबेन मोदी यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली. तसेच त्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी सदिच्छा व्यक्त केली.

पंतप्रधान मोदींच्या मातोश्री रुग्णालयात दाखल झाल्यानंतर राहुल गांधींचं ट्वीट, म्हणाले “एका आई आणि मुलामधील प्रेम…”

मोदी यांच्या मोठ्या बंधूंकडून आईच्या तब्येतीबाबत महत्त्वाची माहिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मोठे भाऊ सोमाभाई मोदी यांनी थोड्याच वेळापुर्वी हिराबेन मोदी यांच्या तब्येतीबद्दल पीटीआय वृत्तसंस्थेला माहिती देताना सांगितले, “आईची तब्येतीमध्ये हळूहळू सुधारणा होत आहे. सध्या सकाळपासून त्या लिक्विड डाएटवर आहेत. त्या आता हाता-पायाची हालचाल देखील करत आहेत. एवढेच नाही तर त्यांनी हातवारे करुन मला उठवून बसा असेही सांगितले. हॉस्पिटलमधून सुट्टी देण्याबाबतचा निर्णय तपासण्या केल्यानंतर डॉक्टर घेतील.”

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This difficult phase in your life ncp chief sharad pawar writes letter to pm narendra modi about his mother kvg