Pakistan Twitter Account Withheld In India: जगप्रसिद्ध मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटरने पाकिस्तान सरकारचे ट्विटर हॅण्डल भारतात दिसणार नाही अशा रीतीने स्थगित केले आहे. शनिवारी १ ऑक्टोबरला ही कारवाई ट्विटरकडून करण्यात आली. भारतातील कायद्यांनुसार पाकिस्तानचे ट्विटर खाते भारतीय युजर्सना दिसू नये अशी मागणी केंद्र सरकारने ट्विटरकडे केली होती. या मागणीनुसार ट्विटरने ही कारवाई केली आहे. ट्विटर अकाउंट विथहेल्ड करणे म्हणजेच त्यावर स्थगिती आणणे अशी कारवाई का व कशी केली जाते? तसेच तुमच्या ट्विटर अकाउंटला याचा कितपत धोका आहे याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ट्विटरवरील पोस्ट स्थगित का केल्या जातात?

प्रत्येक देशातील कायदे व नियमांनुसार ट्विटरवरील पोस्टवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा पर्याय तयार करण्यात आला आहे. मुख्यतः जेव्हा एखाद्या संस्था व किंवा देशाकडून विशिष्ठ ट्विटर खात्यावरील ट्वीट हे असंवेदनशील असल्याचे म्हणत याविरुद्ध तक्रार नोंदवली जाते तेव्हा सुरुवातीला हे ट्वीट काढून टाकले जाते मात्र तक्रारीच्या गांभीर्यानुसार ट्विटर अकाउंटला स्थगिती देण्याची कारवाईसुद्धा केली जाऊ शकते. ही कारवाई प्रामुख्याने तक्रार प्राप्त झालेल्या संस्था किंवा देशाच्या अधिकारक्षेत्रातच लागू असते. उदाहरणार्थ तक्रारीनंतर पाकिस्तानचे ट्विटर खाते केवळ भारतातच स्थगित करण्यात आले आहे व भारताच्या अधिकारक्षेत्राबाहेर पाकिस्तानच्या अकाउंटला कोणतीही बंधने नसतील.

तुमचे ट्विटर अकाउंट स्थगित केल्याचे कसे समजते?

जेव्हा एखादे ट्विटर अकाउंट स्थगित केले जाते तेव्हा संबंधित युजरला पूर्वसूचना देण्यात येते. उदाहरणार्थ जर तुमचे अकाउंट स्थगित करण्यात आले असेल तर अकाउंटचे नाव तसेच ते कोणत्या क्षेत्रात स्थगित करण्यात आले आहे याबद्दल नोटिफिकेशन पाठवण्यात येते.

तुम्ही एखाद्या ट्विटर अकाउंटला स्थगित करण्याची विनंती कशी करू शकता?

जर आपण कायद्याची अंमलबजावणी करणारे सरकारी अधिकारी असाल किंवा आपण अन्य तृतीय-पक्षाच्या वतीने एखाद्या ट्विटर अकाउंटवरील पोस्ट काढून टाकण्याची विनंती करू इच्छित असाल तर आपल्याला आधी ट्विटरच्या नियमांचे पुनरावलोकन करण्यास सांगितले जाते. यातील कोणत्याही नियमांचे उल्लन्घन होत असल्यास आपण तक्रार नोंदवण्यास पात्र ठरता. https:// legalrequests.twitter.com. या साईटला भेट देऊन आपण आपली तक्रार नोंदवू शकता. आपल्या तक्रारीची पडताळणी झाल्यावर आपल्याला ट्विटरकडून ईमेलद्वारे माहिती दिली जाईल.

आपले ट्वीट स्थगित केले गेल्यास काय करावे?

जेव्हा आपले ट्वीट्स किंवा ट्विटर खाते स्थगित केले जाते तेव्हा आपल्याला सूचना दिली जाते समजा जरा आपले ट्वीट चुकून रोखले गेल्याचे आपल्याला वाटत असेल तर आपण ट्विटरच्या हेल्पडेस्कशी संपर्क साधू शकता. यासाठी आपल्याला सूचना प्राप्त झालेल्या मेल आयडीवर आपण संपर्क साधू शकता.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistan twitter account withheld in india know what is withhelding tweets can your account get banned svs