कोल्हापूर : वस्त्रनगरीतील यंत्रमागधारक, उद्योजक, व्यापारी, कामगार, किरकोळ विक्रेते अशा सर्व घटकांना भाजपाशी सामावून घेण्याचे आवाहन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी केले. महाराष्ट्राच्या मँचेस्टर नगरीत बावनकुळे यांचे जल्लोषी स्वागत झाले. रात्री महात्मा गांधी पुतळ्याजवळ झालेल्या त्यांच्या जाहीर सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आज ‘घर चलो’ अभियानांतर्गत शहरातील मुख्य मार्गावर पदयात्रा काढून बावनकुळे यांनी विविध घटकांशी संवाद साधला. आगामी निवडणुकीत पंतप्रधान कोण होणार, आवडता पंतप्रधान कोण, भाजप जिंकणार का, असे प्रश्न विचारले. उपस्थितांनी मोदी… मोदी….असा जागर केला.  पदयात्रेत शहरातील कार्यकर्ते, महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. यामुळे शहर भाजपमय झाले होते.

कार्यकर्त्यांशी संवाद

इचलकरंजी येथे सायंकाळी आगमन झाल्यानंतर बावनकुळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर,  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. त्यानंतर भाजप वॉरीयर यांच्याशी संवाद साधला. पदयात्रेसाठी मलाबादे चौकात त्यांचे भव्य हार घालून स्वागत झाले. 

सभेला प्रतिसाद

जल्लोशी वातावरणात पदयात्रेला सुरुवात झाली. फटाक्यांची आतषबाजी, फुलांची उधळण होत होती. ढोल ताशाचा गजर, मोदी, भाजपचा जयघोष करणारे कार्यकर्ते अशी पदयात्रा लक्षवेधी बनली होती. याचवेळी ते नागरिक, महिला, व्यापारी, व्यावसायिक, महिला आदींशी संवाद साधत ते सभास्थानी पोहचले. वर्गाचा सभेत गावांकडे यांनी आगामी निवडणुकीतून भाजपला विजयी करण्याचे आवाहन केले.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Social elements should accommodate with bjp chandrasekhar bawankule appeal to ichalkaranjikar people ysh