T20 World Cup Virender Sehwag Reacts: टी २० विश्वचषकात भारताचा इंग्लंडच्या विरुद्ध झालेला पराभव कोट्यवधी भारतीयांच्या जिव्हारी लागणारा ठरला. पाकिस्तान अंतिम फेरीत असताना १० गडी राखून इंग्लंडने इतका लाजिरवाणा पराभव केला ही सल कायम क्रिकेटप्रेमींच्या मनात राहील. खरंतर टी २० विश्वचषकाच्या संघाची निवड होताच अनेकांना यात स्थान न देण्यावरून माजी खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली होती त्यात आता पराभवामुळे हा नाराजीचा सूर आणखीन तीव्र झाला आहे. टीम इंडियाचा माजी तुफानी फलंदाज विरेंद्र सेहवाग यानेही पुढील विश्वचषकात आपल्याला काही चेहरे संघात बघायचे नाहीत असे म्हणत त्यांच्या ऐवजी नवीन व युवा खेळाडूंना संधी देण्याबाबत भाष्य केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

टीम इंडियातील दिग्गज सुनील गावस्कर यांच्या विचारांना सहमती दर्शवत सेहवाग म्हणाला की, सध्याच्या भारतीय संघातील काही खेळाडूंना २०२४ मध्ये होणाऱ्या पुढील टी-20 विश्वचषकात पाहू इच्छित नाही. २००७ टी-२० विश्वचषकात एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील संघात तरुण खेळाडूंना प्राधान्य देण्यात आले होते, या वेळेस अनेक दिग्गज व अनुभवी खेळाडूंनी माघार घेतली होती हेच एका विजयी संघाचे उदाहरण आहे.

मला कुणाच्याच मानसिकतेबद्दल बोलायचे नाही परंतु मला खेळाडूंच्या निवडीत बदल झालेला नक्कीच बघायचा आहे. मला पुढच्या विश्वचषकात काही विशिष्ट चेहरे बघायचे नाहीत. २००७ च्या टी-२० विश्वचषकात अनेक तरुण खेळाडू निवडण्यात आले त्यांच्याकडून काहीच अपेक्षा नव्हत्या आणि मला पुढील टी-२० विश्वचषकासाठी अशाच प्रकारचा संघ निवडलेला पाहायचा आहे, त्यांच्याकडून जिंकण्याची अपेक्षा कोणीही करणार नाही. पण हाच संघ खऱ्या अर्थाने भविष्यात चमकदार कामगिरी करेल.

सेहवागने क्रिकेबझशी बोलताना पुढे सांगितले की, “तुम्ही आताच तुमच्या भविष्याचा विचार करायला हवा तरच तुम्ही दोन वर्षात एक संघ तयार करू शकाल. पुढच्या विश्वचषकात मला काही नॉन-परफॉर्मिंग सीनियर्स बघायचे नाहीत. मला आशा आहे की निवडकर्ते ही बाब लक्षात घेतील. आता मुख्य समस्या अशी आहे की हे निवडकर्ते पुढच्या विश्वचषकापर्यंत राहतील का? पुढच्या वेळेपर्यंत नवी निवड समिती असेल, नवीन व्यवस्थापन असेल, नवा दृष्टिकोन असेल त्यामुळे ते बदल करतील का? पण एक गोष्ट नक्की आहे की ते पुढच्या विश्वचषकात आतासारखाच संघ व यंदाचाच दृष्टीकोन असेल तर परिणाम देखील समान असतील.”

World Cup Final PAK vs ENG: पाकिस्तान म्हणजे भारत नाही, तुमची…; शोएब अख्तर यांचा इंग्लंडला स्पष्ट इशारा

दरम्यान भारतीय संघ आता विश्वचषकानंतर आराम न करता हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारत न्यूझीलंडविरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिका खेळणार आहे. या संघात अनेक नव्या खेळाडूंना संधी देण्यात आली असून रोहित शर्मा , विराट कोहली सारख्या खेळाडूंना ब्रेक देण्यात आला आहे. बहुतेक वरिष्ठ खेळाडू सर्वात लहान फॉरमॅटमधून हळूहळू बाहेर पडतील आणि पुढील वर्षी मायदेशात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकावर अधिक लक्ष केंद्रित करतील, असे दिसत आहे.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: T20 world cup virender sehwag slams rohit sharma team india bcci selection committee says dont want to see face svs