Sunil Gavaskar Lashes Out at Team India: टीम इंडियाला गुरुवारी अॅडलेडमध्ये इंग्लंड विरुद्ध टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत 10 विकेट्सने दारुण पराभव पत्करावा लागला. हार्दिक पांड्या, विराट कोहलीच्या अर्धशतकासह टीम इंडियाने १६९ धावांचे टार्गेट उभे केले होते मात्र त्यानंतर भारतीय गोलंदाजांची खेळी अशी विस्कटली की एकही विकेट न देता इंग्लंडचे सलामीवीर जोस बटलर आणि अॅलेक्स हेल्स यांनी एकहाती विजय मिळवला. २४ चेंडू शिल्लक असताना एकही गडी बाद न करता झालेला हा पराभव टीम इंडियाच्या जिव्हारी लागणारा ठरला. यानंतर कर्णधार रोहित शर्माने संघ तणावात होता व प्रेशरमध्ये चुका होत गेल्या असे स्पष्टीकरण दिले. मात्र यावरूनही अनेक माजी खेळाडूंनी टीका केली आहे. टीम इंडियाचे माजी कर्णधार व दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांनी भारतीय संघातील ‘वर्कलोड मॅनेजमेंट’ या संकल्पनेवर कठोर शब्दात टीका केली आहे.

भारतीय क्रिकेट संघाला “वर्कलोड मॅनेजमेंट” जमत नाही या कारणातून आता बाहेर पडण्याची गरज आहे असे म्हणत सुनील गावस्कर यांनी टीकास्त्र उगारले. पुढे गावस्कर म्हणतात की, ” हेच खेळाडू जेव्हा इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळतात तेव्हा अशी ताण तणाव, कामाचं दडपण विसरतात. तुम्ही आयपीएलच्या संपूर्ण हंगामात खेळता, प्रवास करता. तुम्हाला तिथे कंटाळा येत नाही का? कामाचं ओझं वाटत नाही का? केवळ जेव्हा तुम्ही भारतासाठी खेळता, विशेषत: जेव्हा तुम्हाला नॉन-ग्लॅमरस देशाचा दौरा करावा लागतो तेव्हा तुम्हाला कामाचा ताण आठवतो?” असा प्रश्न गावस्कर यांनी आजतकशी बोलताना केला आहे.

Rohit Sharma Is My Captain Not Other Guy Hardik Pandya
“रोहित शर्माच्या सल्ल्यावरच MI च्या खेळाडूंचा..”, इरफान पठाणने सांगितला ‘त्या’ Video चा अर्थ; म्हणाला, “हार्दिकपेक्षा..”
Hardik Pandya Mental Health Going Bad Due to IPL 2024 Booing Abuses In Stadium
“हार्दिक पंड्याचं मानसिक आरोग्य बिघडतंय, तो तणावाचा..”, IPL मधील शिवीगाळ, ट्रोलिंग पाहून माजी सलामीवीराची माहिती
ohit Sharma Statement on Impact Player Rule in IPL and Explains Why it is not Helping the Indian Cricket
Rohit Sharma: ‘भारतीय क्रिकेट संघाला याचा काहीच फायदा नाही’, आयपीएलमधील इम्पॅक्ट खेळाडू नियमाबद्दल रोहितचे मोठे वक्तव्य
not to share any photo or video of the stadium on their accounts on the day of the match.
IPL 2024 : मीडिया हक्कांबाबत बीसीसीआयची कठोर भूमिका, संघ-खेळाडू आणि समालोचकांना दिल्या ‘या’ विशेष सूचना

Video: IPL चे पैसे कमी करा मग भूक काय असते…; वसीम अक्रम यांची टीम इंडियाच्या गोलंदाजांवर सडसडून टीका

“तसेच जेव्हा तुम्ही विश्वचषक जिंकू शकत नाही, तेव्हा संघात बदल होतील. न्यूझीलंड संघात बदल करण्यात आले आहेत”, असे म्हणत गावस्कर यांनी संघात बदल होण्याचेही संकेत दिले आहेत. गावस्कर पुढे म्हणतात की “भारतीय खेळाडूंचे इतके “लाड” केले जाऊ नये, बीसीसीआयने क्रिकेटपटूंना कठोर ताकीद देणं गरजेचं आहे. तुम्ही तंदुरुस्त असल्यास, कामाचा भार कसा येतो? खेळाडूंचे लाड करणे थांबवा. तुमची टीममध्ये निवड केली जात आहे, तुम्हाला रिटेनर फी दिली जात आहे. जर तुम्ही कामाच्या ओझ्यामुळे खेळू शकत नसाल तर रिटेनर फी देखील घेऊ नका असे गावस्कर यांनी स्पष्ट सांगितले आहे.