भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियवर सुरू आहे. गुरुवारी (९ फेब्रुवारी) बॉर्डर गावसकर ट्रॉफीची सुरुवात झाली. पहिल्या सामन्यात नाणेफेक पाहुण्या ऑस्ट्रेलियाने जिंकली. पण त्यांच्या संघाला अपेक्षित सुरुवात मिळू शकली नाही. सुरुवातीच्या षटकांमध्ये भारतासाठी मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराजने जबरदस्त गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियन सलामीवीरांना तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर पुनरागमन करणाऱ्या सर रवींद्र जडेजाने शानदार गोलंदाजी करत मार्नस लाबुशेन आणि स्टीव्ह स्मिथला तंबूत पाठवले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उपहारानंतर रवींद्र जडेजाने ऑस्ट्रेलियाला दोन मोठे धक्के दिले. त्याने सलग दोन चेंडूंत ऑसी फलंदाजांना बाद करत यशस्वी पुनरागमन केले. पदार्पणवीर केएस भरतने अप्रतिम स्टम्पिंग केली. तसेच त्याने मॅट रेनशॉला भोपळाही फोडू न देता तंबूत पाठवले. कर्णधार रोहित शर्माने कांगारूंना फसवण्यासाठी सातव्या षटकात फिरकीपटू रवींद्र जडेजाला गोलंदाजीला आणले. धोकादायक ठरत असणारी जोडी फोडण्यासाठी स्टीव्ह स्मिथ व मार्नस लाबुशेन या फलंदाजांनाही फिरकीपटूंनी अडचणीत आणले.

हेही वाचा: IND vs AUS 1st Test: ‘अभी तो पार्टी…”, अश्विनचा माइंड गेम अन मार्नस लाबुशेनची केली बोलती बंद, Video व्हायरल

अक्षर पटेल यालाही गोलंदाजीला आणून हिटमॅनने ऑस्ट्रेलियन संघाची कोंडी केली. स्मिथ व लाबुशेन यांनी अर्धशतकी भागीदारी करताना पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाला २ बाद ७६ धावा उभारून दिल्या. स्मिथ ७४ चेंडूंत १९ आणि लाबुशेन ११० चेंडूंत ४७ धावांवर खेळत होता. पण, उपहारानंतर लाबुशेनला २ धावाच करता आल्या. रवींद्र जडेजाच्या फिरकीवर तो यष्टीचीत झाला. भरतने यष्टींमागे सुरेख कामगिरी केली. त्यापाठोपाठ मॅट शेनशॉ पायचीत झाला. सर जडेजाची हॅटट्रिक मात्र हुकली.

रवींद्र जडेजाच्या लुकवर चाहते झाले वेडे

रवींद्र जडेजा प्रदीर्घ कालावधीनंतर मैदानात परतत आहे. नागपूर कसोटी मध्ये चाहत्यांना त्याच्याकडून सर्वोत्तम स्पेल आणि चांगल्या खेळीची अपेक्षा आहे. हा दिग्गज अष्टपैलू खेळाडू मैदानावर पहिले षटक टाकण्यासाठी आला होताच, सोशल मीडियावरील चाहते त्याच्या लूकचे वेडे झाले. जडेजाने आपल्या लूकमध्ये थोडा बदल केला असून तो पोनी बनवून मैदानात उतरला आहे. तिचा हा नवा अवतार चाहत्यांना खूप आवडला आहे.

जडेजा टीम इंडियात पुनरागमन करत आहे

दुखापतीमुळे रवींद्र जडेजा आशिया चषकपासून संघाबाहेर होता. ऑस्ट्रेलियासोबत मालिका खेळण्यापूर्वी त्याने रणजी सामने खेळले असले तरी तमिळनाडूविरुद्ध त्याची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. तसे, तिचा हा नवा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे. रवींद्र जडेजा हा नेहमीच एक असा खेळाडू आहे ज्याने आपल्या फॅशन आणि लुक्सवर खूप प्रयोग केले आहेत. सर रवींद्र जडेजा हे नाव नुसतेच मिळालेले नाही, तर त्यांनी आपल्या सेन्स ऑफ स्टाइलने सर्वांना चकित केले आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs aus 1st test sir ravindra jadeja makes a brilliant comeback the batsman tented before the ball was known impressed with his looks in the match avw
First published on: 09-02-2023 at 13:55 IST