India vs New Zealand 2nd T20 Highlights Score Updates: भारत आणि न्यूझीलंड संघातील दुसरा टी-२० सामना लखनऊमध्ये खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडवर ६ गडी राखून मात केली. त्याचबरोबर तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. भारताकडून कर्णघार हार्दिक पांड्या १५ आणि उपकर्णधार सूर्यकुमार यादव २६ धावांवार नाबाद राहिले.
न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना, निर्धारित २० षटकांत ८ बाद ९९ धावा केल्या होत्या. त्यामुळे भारतीय संघाला विजयासाठी १०० धावांचे लक्ष्य मिळाले. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने १९.५ षटकांत ४ गडी गमावून १०१ धावा करत विजय मिळवला.
न्यूझीलंड संघाकडून कर्णधार मिचेल सँटनरने सर्वाधिक धावांचे योगदान दिले. त्याने २३ चेंडूत नाबााद १९ धावा केल्या. इतर किवी फलंदाज भारतीय गोलंदाजांपुढे सपशेल अपयशी ठरले. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना अर्शदीप सिंगने सर्वाधिक २ विकेट घेतल्या. त्याचबरोबर शिवम मावी वगळता प्रत्येक गोलंदाजांने प्रत्येकी १ विकेट घेतली.
India vs New Zealand 2nd T20 Highlights Match Score Updates: भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरी टी२० हायलाइट्स अपडेट्स
IND vs NZ: तीन षटकांच्या समाप्तीनंतर न्यूझीलंडची धावसंख्या बिनबाद २१
फिन ऍलन ११
डेव्हॉन कॉनवे १०
इशान किशनकडून फिन एॅलनचा झेल सुटला.
दोन षटकांच्या समाप्तीनंतर न्यूझीलंड धावसंख्या बिनबाद १०
फिन ऍलन १
डेव्हॉन कॉनवे ९
पहिल्या षटकानंतर न्यूझीलंडची धावसंख्या बिनबाद ६
फिन ऍलन १
डेव्हॉन कॉनवे ५
2ND T20I. 0.4: Hardik Pandya to Devon Conway 4 runs, New Zealand 5/0 https://t.co/p7C0QbPSJs #INDvNZ @mastercardindia
— BCCI (@BCCI) January 29, 2023
कर्णधार हार्दिक पांड्या पहिले षटक टाकण्यासाठी आला आहे.
न्यूझीलंडकडून फिन ऍलन आणि डेव्हॉन कॉनवे सलामीला आले आहेत
२०१६ पासून भारताने निर्णायक १० सामने जिंकलेत
२०१६ पासून आतापर्यंत १३ निर्णायक सामने झाले आहेत. त्यापैकी १०मध्ये भारताने विजय मिळवला आहे. त्याचबरोबर एका सामन्यात पराभव झाला आहे.
न्यूझीलंड संघात कोणताही बदल केलेला नाही.
Batting first in Lucknow after a toss win for skipper Mitch Santner. Follow play LIVE in T20I 2 with @skysportnz. LIVE scoring | https://t.co/7yvdcl3yDW #INDvNZ pic.twitter.com/ykDDUzZ3Ws
— BLACKCAPS (@BLACKCAPS) January 29, 2023
न्यूझीलंड संघ: फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे (यष्टीरक्षक), मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, मायकेल ब्रेसवेल, मिचेल सँटनर (कर्णधार), ईश सोधी, जेकब डफी, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर.
दुसऱ्या टी-२०सामन्यात टीम इंडियामध्ये एक बदल करण्यात आला आहे. स्टार वेगवान गोलंदाज उमरान मलिकच्या जागी फिरकीपटू युजवेंद्र चहलला संधी मिळाली. न्यूझीलंड संघात कोणताही बदल झालेला नाही.
भारतीय संघ: शुबमन गिल, इशान किशन (विकेटकीपर), राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, शिवम मावी, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग</p>
या खेळाडूंना मिळाली प्लेइ्ंग इलेव्हनमध्ये संधी
🚨 Toss Update from Lucknow 🚨
— BCCI (@BCCI) January 29, 2023
New Zealand have opted to bat first.
One change in #TeamIndia's Playing XI as @yuzi_chahal is named in the side 👌
Live – https://t.co/VmThk71OWS… #INDvNZ @mastercardindia pic.twitter.com/9btnunpbkM
पाहा न्यूझीलंड संघाची प्लेइंग
2ND T20I. New Zealand XI: F Allen, D Conway, M Chapman, D Mitchell, G Phillips, M Bracewell, M Santner (c), J Duffy, B Tickner, L Ferguson, I Sodhi. https://t.co/p7C0QbPSJs #INDvNZ @mastercardindia
— BCCI (@BCCI) January 29, 2023
भारतीय संघाची प्लेइंग
2ND T20I. India XI: S Gill, I Kishan (wk), R Tripathi, S Yadav, H Pandya (c), D Hooda, W Sundar, K Yadav, S Mavi, A Singh, Y Chahal. https://t.co/p7C0QbPSJs #INDvNZ @mastercardindia
— BCCI (@BCCI) January 29, 2023
न्यूझीलंड संघाचा कर्णधार मिचेल सँटनरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
2ND T20I. New Zealand won the toss and elected to bat. https://t.co/p7C0QbPSJs #INDvNZ @mastercardindia
— BCCI (@BCCI) January 29, 2023
सलखनऊच्या मैदानावर भारतीय संघाने दोन सामने जिंकले आहेत. ज्यामध्ये रोहित शर्मा आणि इशान किशन मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकला आहे.
Huddle time in Lucknow ✅
— BCCI (@BCCI) January 29, 2023
Gearing up for the second #INDvNZ T20I 👌🏻
Live – https://t.co/p7C0QbPSJs #INDvNZ @mastercardindia pic.twitter.com/cfWLO0IRV6
स्टार स्पोर्ट्सच्या मास्टरकार्ड क्रिकेट लाइव्ह शोमध्ये अभिनेता कार्तिक आयर्न आला आहे.
Like every Shehzada, #TeamIndia bhi kabhi kisi chunauti se peeche nahi hatt te 🔥
— Star Sports (@StarSportsIndia) January 29, 2023
Tune-in to Mastercard Cricket Live
Today, 6:00PM | Star Sports & Disney+Hotstar pic.twitter.com/wL7mWrzcig
दुसऱ्या टी-२० सामन्यापूर्वी भारत आणि न्यूझीलंड संघांतील खेळाडू सराव करत आहेत.
Welcome to the live coverage of the 2ND T20I between India and New Zealand. https://t.co/p7C0QbPSJs #INDvNZ @mastercardindia
— BCCI (@BCCI) January 29, 2023
एकना क्रिकेट स्टेडियमच्या सपाट खेळपट्टीमुळे येथे फलंदाजांना खूप मदत मिळते. त्याचबरोबर दव असल्याने संघ प्रथम गोलंदाजी करण्यास पसंती देतात.
सूर्यकुमार यादवने टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात केवळ ४४ डावात १६२५ धावा केल्या आहेत. यासह सूर्यकुमार टी-२० मध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत टॉप-५ मध्ये सामील झाला आहे. मात्र, जर सूर्यकुमारने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात ४७ धावा केल्या, तर तो या बाबतीत दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज एबी डिव्हिलियर्सला मागे टाकेल.
एबी डिव्हिलियर्स १६७२ धावा
सूर्यकुमार यादव १६२५ धावां
भारत: इशान किशन (यष्टीरक्षक), शुबमन गिल, राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, शिवम मावी, कुलदीप यादव, उमरान मलिक, अर्शदीप सिंग.
न्यूझीलंड: फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे (यष्टीरक्षक), मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर (कर्णधआर), मायकेल ब्रेसवेल, जेकब डफी, ईश सोधी, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर.
या मैदानावर नाणेफेक महत्त्वाची भूमिका बजावेल. कारण नाणेफेक जिंकणाऱ्या संघाचा सामना जिंकणेही जवळपास निश्चित मानले जात आहे.
वास्तविक, या मैदानावर आतापर्यंत झालेल्या सर्व टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघानेच विजय मिळवला आहे. या मैदानावर आतापर्यंत ५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत.
Devon Conway full of praise for Finn Allen and @dazmitchell47's contributions with the bat in T20I 1. The team moved to Lucknow today ahead of Game 2 on Sunday. #INDvNZ pic.twitter.com/0uvJbEfJfa
— BLACKCAPS (@BLACKCAPS) January 28, 2023
भारत आणि न्यूझीलंडमध्ये आतापर्यंत एकूण २३ टी-२० सामने खेळले गेले आहेत. यापैकी भारताने १०, तर किवी संघाने १० सामने जिंकले आहेत. तीन सामने बरोबरीत आहेत. दोन्ही संघ भारतात नऊ वेळा आमनेसामने आले आहेत. यातील टीम इंडियाने पाचवेळा, तर न्यूझीलंडने चार सामने जिंकले. लखनऊच्या एकना स्टेडियमवर दोन्ही संघ प्रथमच भिडणार आहेत.
भारतीय संघ: शुबमन गिल, इशान किशन (यष्टीरक्षक), राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, शिवम मावी, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, पृथ्वी शॉ, युझवेंद्र चहल, जितेश शर्मा , मुकेश कुमार.
न्यूझीलंड संघ: फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे (यष्टीरक्षक), मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, मायकेल ब्रेसवेल, मिशेल सँटनर (कर्णधार), ईश सोधी, जेकब डफी, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर, हेन्री शिपले, मायकेल रिप्पन, डेन क्लीव्हर, बेन लिस्टर.
सामन्यापूर्वी डॅरिल मिशेलने पत्रकार परिषदेला हजेरी लावली.
Stoked for ya mates! Player of the Match @dazmitchell47 on seeing Mitchell Santner and Ish Sodhi do well on the international stage. T20I 2 is today in Lucknow. Follow play LIVE in NZ with @skysportnz (2-30am Monday NZT). #INDvNZ pic.twitter.com/wogKkGFzTl
— BLACKCAPS (@BLACKCAPS) January 29, 2023
भारत आणि न्यूझीलंड संघातील सामन्याची नाणेफेक साडेसहाला होणार आहे. त्यानंतर सातला सामन्याला सुरुवात होईल.
भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरी टी२० लाइव्ह अपडेट
India vs New Zealand 2nd T20 Highlights Match Score Updates: भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरी टी२० मॅच हायलाइट्स स्कोर अपडेट्स
IND vs NZ 2nd T20 Match Updates : भारत आणि न्यूझीलंड संघातील दुसरा टी-२० सामना लखनऊमध्ये खेळला गेला. या सामन्यात भारताने न्यूझीलंडवर ६ गडी राखून विजय मिळवला. त्याचबरोबर तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ ने बरोबरी साधली.