रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील एलिमिनेटर सामना हैदराबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. पण या एलिमिनेटर सामन्यापूर्वी, विराट कोहलीला दहशतवादी धमक्या मिळाल्याचे वृत्त पसरवले जात होते. विराटच्या सुरक्षिततेलाही धोका असल्याची माहिती समोर आली होती. परंतु गुजरात क्रिकेट असोसिएशनने या सर्व चर्चांवर वक्तव्य देत आरसीबीने सराव सत्र का रद्द केले, याचे खरे कारण सांगितले.

सोमवार, २० मेच्या रात्री अहमदाबादमध्ये पोलिसांनी दहशतवादी कारवायांच्या संशयावरून चार जणांना अटक केली होती. बंगाली वृत्तपत्र आनंद बाजार पत्रिकाने एका वृत्तात म्हटले की, आरसीबीने कोणतेही कारण न देता मंगळवारी नियोजित सराव रद्द केला आहे. केवळ सरावच नाही तर पत्रकार परिषदही रद्द करण्यात आली. यावरून सर्व चर्चांना उधाण आले होते.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, गुजरात क्रिकेट असोसिएशनने आरसीबीचे सराव सत्र उष्णतेमुळे रद्द केल्याचे समोर आले आहे. विराट कोहलीवर कोणतीही दहशतवादी हल्ला होण्याची भिती नाही. गुजरात क्रिकेट असोसिएशनचे सचिव अनिल पटेल यांनी TOI ला सांगितले की, “कोणताही दहशतवादी धोका नव्हता. गुजरात कॉलेजच्या मैदानावर आम्ही राजस्थान रॉयल्स आणि आरसीबी या दोन्ही संघांसाठी सरावाची व्यवस्था केली होती. आरीबीला दुपारी २ ते ५ वाजेपर्यंत सराव करायचा होता, मग त्यांनी सरावाची वेळ बदलून ३ ते ६ केली, कारण अहमदाबादमध्ये उन्हाळ्यात संध्याकाळी ६.३० वाजेपर्यंत प्रकाश चांगला असतो. तथापि, राजस्थान रॉयल्सने त्यांच्या संपूर्ण संघासह गुजरात कॉलेजच्या मैदानावर दुपारी ३.३० ते ६.३० या वेळेत सराव केला.

हेही वाचा – IPL च्या इतिहासात ‘ही’ कामगिरी करणारा श्रेयस अय्यर पहिलाच कर्णधार; धोनी,रोहितही करू शकले नाही असा पराक्रम

पटेल पुढे म्हणाले, “शहरात सुरू असलेल्या उष्णतेमुळे आरसीबीने त्यांचे सराव सत्र रद्द केले. आम्ही RCB ला सांगितले की ते तेथील इनडोअर सराव सुविधा किंवा नरेंद्र मोदी स्टेडियममधील इनडोअर सुविधा वापरू शकतात. मात्र, उष्णतेच्या लाटेमुळे आरसीबीने सराव न करण्याचा निर्णय घेतला.” एलिमिनेटर सामन्यापूर्वी सामन्यापूर्वी पत्रकार परिषद रद्द करण्याबाबत जोरदार चर्चा सुरू होती, मात्र या अफवांनाही पूर्णविराम मिळाला आहे.

बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, “या सामन्यापूर्वी कोणतीही पत्रकार परिषद नियोजित करण्यात आली नव्हकी कारण काल ​​येथे नरेंद्र मोदी स्टेडियमवर पहिला क्वालिफायर (कोलकाता नाइट रायडर्स आणि हैदराबाद सनरायझर्स यांच्यातील) खेळवला जात होता. कोणत्याही परिस्थितीत, स्पर्धेच्या या टप्प्यावर संघांसाठी सराव सत्रे नसणे सामान्य आहे, कारण ते दीर्घ मोहिमेनंतर सामन्यांसाठी ताजे राहण्याचा प्रयत्न करतात. ”

आरसीबी संघाने विलक्षण कमबॅक करत सलग सहा सामने जिंकले आणि थेट प्लेऑफमध्ये धडक मारली आहे. अखेरच्या साखळी सामन्यात आरसीबीने चेन्नई सुपर किंग्सचा पराभव करत प्लेऑफमध्ये आपले स्थान पक्के केले.