Shivam Dubey breaks MS Dhoni’s Record: आयपीएल २०२३ मधील ६७ वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स संघात खेळला गेला. या सामन्यात चेन्नईने दिल्लीचा ७७ धावांनी पराभव केला. त्याचबरोबर प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या सीएसके संघाने २२३ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दिल्ली संघाला २० षटकांत ९ गडी गमावून १४६ धावा करता आल्या. या सामन्यात अनेक षटकार ठोकणाऱ्या शिवम दुबेने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिवम दुबेने धोनीला मागे टाकले –

शिवम दुबेने दिल्लीविरुद्धच्या सामन्यात ९ चेंडूत २२ धावांची दमदार खेळी केली. यादरम्यान त्याने ३ षटकार मारले. हे तीन षटकार मारल्यानंतर शिवम दुबेने महेंद्रसिंग धोनीला एका मोठ्या विक्रमाच्या बाबतीत मागे टाकले आहे. दुबेने या मोसमात ३३ षटकार मारले आहेत. सीएसकेसाठी, तो आता एकाच मोसमात सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांमध्ये चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. दुबेने आयपीएल २०१८ मध्ये ३० षटकार मारणाऱ्या धोनीला मागे टाकले आहे.

शेन वॉटसन अव्वल स्थानी विराजमान –

सीएसकेसाठी एकाच मोसमात सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत शेन वॉटसन अव्वल स्थानावर आहे. वॉटसनने २०१८ मध्ये सीएसकेसाठी ३५ षटकार मारलेत. दुसऱ्या क्रमांकावर ड्वेन स्मिथ आहे, ज्याने २०१४ मध्ये ३४ षटकार ठोकले होते. याशिवाय २०१८ मध्ये ३४ षटकार मारणारा अंबाती रायडू तिसऱ्या क्रमांकावर आहे. सीएसकेचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. अशा परिस्थितीत दुबेला अव्वल स्थान गाठण्याची चांगली संधी आहे.

हेही वाचा – DC vs CSK: डेव्हिड वॉर्नरने मोडला विराट-रोहितचा मोठा विक्रम, ‘हा’ कारनामा करणारा ठरला पहिलाच खेळाडू

सीएसकेसाठी एकाच आयपीएल हंगामात सर्वाधिक षटकार ठोकणारे फलंदाज –

३५ – शेन वॉटसन (२०१८)
३४ – ड्वेन स्मिथ (२०१४)
३४ – अंबाती रायुडू (२०१८)
३३ – शिवम दुबे (२०२३)*
३० – एमएस धोनी (२०१८)

हेही वाचा – Kapil Dev: कपिल देवला रुपेरी पडद्याची भुरळ, रजनीकांत सोबत स्क्रीन शेअर करत ‘या’ चित्रपटात साकारणार भूमिका

दिल्लीचे फलंदाज ठरले अपयशी –

या सामन्यात २२३ धावांचा पाठलाग करताना दिल्ली सुरुवातीपासूनच सामन्यात कुठेही नव्हती. या सामन्यात दिल्लीचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरची ८६ धावांची खेळी वगळता एकाही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही. सलामीवीर पृथ्वी शॉ केवळ ५, फिल सॉल्ट ३ आणि रिले रुसो पहिल्याच चेंडूवर बाद झाले. याशिवाय यश धुलने १३ आणि अक्षर पटेलने १७ धावा केल्या. सीएसकेकडून दीपक चहरने सर्वाधिक ३ बळी घेतले.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivam dube breaks ms dhonis record for most sixes for csk in an ipl season vbm