David Warner breaks the record of Virat Kohli and Rohit Sharma: आयपीएल २०२३ मधील ६७ वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला गेला. या सामन्यात चेन्नईने दिल्लीच्या ७७ धावांनी पराभव केला. तसेच या हंगामात प्लेऑफमध्ये पोहोचणारा दुसरा संघ ठरला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सकडून कर्णधार डेव्हिड वार्नरने सर्वाधिक धावांचे योगदान दिले, पण संघाचा पराभव टाळू शकला नाही. परंतु त्याने विराट कोहली आणि रोहित शर्माचा विक्रम मोडला आहे.

डेव्हिड वॉर्नरने विराट कोहलीचा मोठा विक्रम मोडला –

डेव्हिड वॉर्नरने ५८ चेंडूत ५ षटकार आणि ७ चौकारांच्या मदतीने ८६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. या मोसमातील त्याचे हे सहावे शतक असून त्याने या मोसमात ५०० धावांचा टप्पाही पार केला आहे. आता डेव्हिड वॉर्नर आयपीएलच्या इतिहासात ७ हंगामात ५०० हून अधिक धावा करणारा पहिला खेळाडू ठरला आहे. याबाबतीत त्याने विराट कोहलीला मागे टाकले आहे. कारण कोहलीने हा पराक्रम केवळ आयपीएलच्या सहा हंगामात केला आहे.

Marcus Stoinis Highest individual scores in IPL run chases with 124 Runs
IPL 2024: मार्कस स्टॉइनसची ऐतिहासिक खेळी, आयपीएलच्या इतिहासात ही कामगिरी करणारा पहिला फलंदाज
IPL 2024 Travis Head Breaks Many Records with 89 Runs innings against Delhi Capitals
IPL 2024: ११ चौकार, ६ षटकार, २७८च्या स्ट्राईक रेटने ट्रॅव्हिस हेडने दिल्लीच्या गोलंदाजांना धू धू धुतलं! ८९ धावांच्या खेळीत अनेक विक्रम
Michael Vaughan Claims Rohit Sharma to join CSK next year
IPL 2024 : ‘पुढच्या वर्षी रोहित चेन्नईकडून खेळताना दिसणार…’, इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा मोठा दावा
IPL 2024 Chennai Punjab Kings vs Sunrisers Hyderabad Match Updates in Marathi
IPL 2024: हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर सॅम करनने केली रिव्ह्यूची मागणी, करनच्या चतुराईमुळे असा बाद झाला राहुल त्रिपाठी; पाहा VIDEO

आयपीएल हंगामात सर्वाधिक जास्त वेळा ५०० पेक्षा जास्त धावा करणारे अव्वल चार फलंदाज –

१. डेव्हिड वॉर्नर – ७

२. विराट कोहली – ६

३. केएल राहुल – ५

४. शिखर धवन – ५

हेही वाचा – Kapil Dev: कपिल देवला रुपेरी पडद्याची भुरळ, रजनीकांत सोबत स्क्रीन शेअर करत ‘या’ चित्रपटात साकारणार भूमिका

दिल्लीकडून डेव्हिड वॉर्नरने सर्वाधिक धावा केल्या –

डेव्हिड वॉर्नर आयपीएल २०२३ मध्ये दिल्लीसाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. वॉर्नरने या मोसमात आपल्या संघासाठी खेळलेल्या १४ लीग सामन्यांमध्ये ५१६ धावा केल्या आहेत. या मोसमात तो दोनवेळा शून्यावर विकेट गमावली आहे. तसेच ६ अर्धशतके झळकावली आहेत. या सामन्यांमध्ये त्याच्या बॅटमधून ६९ चौकार आणि १० षटकार पाहिला मिळाले. वॉर्नरने या हंगामात १३१.६३ च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या आहे. तसेच त्याची सर्वोत्तम खेळी ८६ धावांची राहिली.

वॉर्नरने रोहित शर्माचा विक्रम मोडला –

डेव्हिड वॉर्नरने सीएसके विरुद्ध ८६ धावांची खेळी करताना आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून ३८व्यांदा ५० पेक्षा जास्त धावा केल्या. त्याने या लीगमध्ये ३७ वेळा हा पराक्रम करणाऱ्या रोहित शर्माला मागे टाकले. या लीगमध्ये कर्णधार म्हणून विराट कोहलीने सर्वाधिक ५० हून अधिक धावा केल्या होत्या.

हेही वाचा – DC vs CSK: ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवेची कमाल, आयपीएल २०२३ मध्ये ‘हा’ कारनामा करणारी ठरली चौथी जोडी

टी-२० मध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक वेळा ५० प्लस स्कोअर करणारे फलंदाज –

५५ – विराट कोहली

४० – अॅरॉन फिंच

३९ – बाबर आझम

३८ – डेव्हिड वॉर्नर

३७ – रोहित शर्मा