Premium

Utkarsha Pawar : कोण आहे उत्कर्षा पवार? ऋतुराज गायकवाडच्या पत्नीबाबत जाणून तुम्हीही व्हाल थक्क

सीएसकेनं आयपीएल २०२३ चा किताब जिंकल्यानंतर ऋतुराजने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता. या फोटोत त्याच्यासोबत त्याच्या प्रयेसीचा फोटो समोर आला होता.

Who is Utkasrha Pawar
ऋतुराज गायकवाडची पत्नी उत्कर्षा पवार कोण आहे ? (mage-Twitter)

Ruturaj Gaikwad And Utkarsha Pawar Wedding Update : चेन्नई सुपर किंग्जचा दिग्गज फलंदाज ऋतुराज गायकवाड लवकरच उत्कर्षा पवारशी विवाहबंधनात अडकणार आहे. आज शनिवारी ३ जूनला ऋतुराज आणि उत्कर्षाचा लग्नसोहळा संपन्न होणार आहे. सीएसकेनं आयपीएल २०२३ चा किताब जिंकल्यानंतर ऋतुराजने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता. या फोटोत त्याच्यासोबत त्याच्या प्रयेसीचा फोटो समोर आला होता. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर उत्कर्षाशी ऋतुराज लग्न करणार असल्याच्या चर्चा रंगल्या. पण उत्कर्षा सुद्धा स्वत: एक क्रिकेटर आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्र महिला क्रिकेट संघासाठी खेळली उत्कर्षा

ऋतुराज गायकवाड आज ३ जूना उत्कर्षाशी लग्न करणार आहे. उत्कर्षा स्वत: एक क्रिकेटर आहे आणि ती महाराष्ट्र महिला क्रिकेट संघासाठी खेळली आहे. उत्कर्षा महाराष्ट्र अंडर-१९ संघासाठी वर्ष २०१२-१३ आणि वर्ष २०१७-१८ मध्ये सामील झाली होती. महाराष्ट्राच्या सीनियर टीममध्ये तिची निवड झाली होती. उत्कर्षाने अष्टपैलू खेळाडू म्हणून मैदान गाजवलं आहे. १८ महिन्यांपूर्वी उत्कर्षाने शेवटचं क्रिकेट खेळलं होतं. आता सध्या ती आरोग्य विज्ञान संस्था (INFS) मध्ये शिक्षण घेत आहे.

नक्की वाचा – अखेर सत्य आलं समोर! शेवटचे दोन चेंडू राहिले असताना हार्दिक पांड्याने मोहित शर्माला काय सांगितलं? गोलंदाजाने केला मोठा खुलासा

आयपीएल २०२३ मध्ये ऋतुराजने चमकदार कामगिरी केली आणि १६ सामन्यांमध्ये एकूण ५९० धावा करण्यात यशस्वी झाला. या सीजनमध्ये ऋतुराजने ४ अर्धशतकही ठोकले. सीएसकेच्या आयपीएल फायनलमध्ये पोहोचण्यासाठी ऋतुराजचं योगदानं मोलाचं राहिलं आहे. इंग्लंडमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी टीम इंडियाच स्टॅंडबाय खेळाडू म्हणून ऋतुराज गायकवाडची निवड करण्यात करण्यात आली होती. परंतु, लग्नसोहळ्यामुळं त्याला या सामन्यात खेळता येणार नसल्याचं त्याने बीसीआयला सांगितलं.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-06-2023 at 14:29 IST
Next Story
“काय जोडी आहे”, ऋतुराज गायकवाडच्या लग्नसोहळ्यातील ‘तो’ फोटो व्हायरल