Anushka Sharma Virat Kohli Scooter Ride: भारताचा फलंदाज विराट कोहली याने उघड केले आहे की त्याने एकदा त्याची पत्नी अनुष्का शर्माला त्याच्या स्कूटी चालविण्याच्या कौशल्याने कसे प्रभावित केले होते. कोहली आणि शर्मा तीन वर्षांच्या डेटिंगनंतर डिसेंबर २०१७ मध्ये विवाहबद्ध झाले, त्यांना २०२१च्या जानेवारीमध्ये एक सुंदर मुलगी झाली आणि सध्या विराट आयपीएल २०२३ स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांचा एक व्हिडीओ फोटोग्राफर विरल भयानी यांनी इंस्टाग्रामवर शेअर केला होता. यामध्ये अनुष्का शर्मा आणि विराट कोहली एकत्र स्कूटर चालवताना दिसत आहेत. विशेष बाब म्हणजे या दोघांनीही यावेळी काळे हेल्मेट परिधान केले होते. त्यामुळे दोघांचा चेहरा दिसत नाही. कोहलीने एका मुलखातीत त्याने या आठवणींना उजाळा दिला.

हेही वाचा: IPL2023: “मला वाटतं अंपायर चष्मा…”, अल्ट्राएजमध्ये कुठलाही स्पाइक नसताना चेन्नईच्या बाजूने निर्णय, माजी खेळाडू भडकला

दरम्यान, स्टार स्पोर्ट्सशी संवाद साधताना कोहलीने खुलासा केला की त्याने अनुष्काला स्कूटी चालवण्याच्या कौशल्याने प्रभावित केले. तो म्हणाला की, “एका बाईकवर तीन माणसे आमचा अगदी जवळून पाठलाग करत होते, अगदी ते एकदम बेफाम गाडी चालवत होते. त्यांची ड्रायव्हिंग पाहून आम्हाला ही आनंदा झाला. परंतु ते ज्या पद्धतीने गाडी चालवत होते ते पाहून ते अधिक उपद्रवी आहेत असे आम्हाला वाटले. आपण रस्त्यावर असे कसे ड्रायव्हिंग करू शकतो? याचेच मला आश्चर्य वाटले. आम्हाला दोघांना गाडी चालवण्याचा आनंद घ्यायचा होता, म्हणून आम्ही फक्त फोटो किंवा चित्रे देण्यापेक्षा मुंबईतील रस्त्यांवर गाडी चालवली. लोकांनी आमच्याकडे लक्ष दिले नाही, परंतु तरीही ते छान वाटत होते.” एका स्कूटीच्या जाहिरातील किस्सा कोहलीने स्टार स्पोर्ट्सच्या मुलाखतीत सांगितला.

पुढे कोहली म्हणाला की, “तो परिसर खूप गजबजलेला होता, एका ठिकाणापर्यंत चारचाकी गाडीत जाण्याचा हेतू होता. मात्र जेव्हा मी म्हटलो ठीक आहे तेव्हा अनुष्का म्हणाली, ‘आपण स्कूटीवर घरी जाऊया का?’ मी होय म्हणालो. मी आयुष्यभर स्कूटी चालवली हे तिला माहीत नव्हते. मी माझी किटबॅग सरावाला जाताना समोर ठेवून स्कूटीवर गाझियाबादला जात असे. हे सांगितल्यावर ती जरा संकोचली, पण मी म्हणालो ‘माझ्यावर विश्वास ठेवा’, मी या रस्त्यावरून तुला स्कूटीवर घेऊन जाऊ शकतो. मग मी जेव्हा स्कूटीवर घेऊन गेलो तेव्हा तिला आत्मविश्वास आला की मी खूप चांगली स्कूटी चालवू शकतो.” अशा अनेक मजेशीर किस्से त्याने त्या मुलाखतीत सांगत जुन्या आठवणीना उजाळा दिला.

हेही वाचा: IPL2023: एम.एस. धोनी म्हणजे कोण? दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूंनी माहीचे एका शब्दात केले वर्णन, पाहा Video

दरम्यान, विराटचे हे रेस्टॉरंट एकेकाळी किशोर कुमार यांचा बंगला होते. विराटने मागच्या वर्षी याठिकाणी रेस्टॉरंट सुरू केले. हा बंगला विराटने पाच वर्षांच्या करारवर भाड्याने घेतल्याचेही सांगितले गेले होते. चालू आयपीएल हंगामातील पहिल्या ११ सामन्यांमध्ये विराटचे प्रदर्शन पाहिले, तर ते समाधानकारक ठरले आहे. विराटने आतापर्यंत ४२.००च्या सरासरीने ४२० धावा केल्या आहेत. नाबाद ८२ ही त्याची सर्वोत्तम खेळी ठरली आहे. येत्या सामन्यांमध्येही विराटकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असेल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virat kohli virat kohli recalls when he impressed anushka sharma with his scooty driving skills avw