Premium

कोण जिंकणार WTC फायनल? भारत-ऑस्ट्रेलियाबाबत ‘या’ दिग्गज खेळाडूने केला दावा, म्हणाला, “टीम इंडियाला खूप कठीण..”

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल ७ जूनपासून लंडनच्या ओव्हल मैदानात सुरु होणार आहे. त्याआधी माजी दिग्गज क्रिकेटरने त्याच्या पसंतीचा संघ निवडला आहे.

India vs Australia WTC Final 2023
WTC फायनल कोणता संघ जिंकणार? (Image-Indian Express)

Former Star Cricketer Prediction About WTC Final 2023 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल ७ जूनपासून लंडनच्या ओव्हल मैदानात सुरु होणार आहे. त्याआधी माजी दिग्गज क्रिकेटरने त्याच्या पसंतीचा संघ निवडला आहे. जो यावेळी हा फायनलचा सामना जिंकू शकतो. आयसीसीच्या माध्यमातून आयोजित प्रोग्राममध्ये पाकिस्तानचा माजी गोलंदाज वसीम अकरमने अशा संघाचं नाव जाहीर केलं आहे, जो हा फायनलचा सामना जिंकू शकतो. वसीमने म्हटलं, इंग्लंडमध्ये हा सामना होत असल्याने ऑस्ट्रेलियाला फायदा होणार आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ इथल्या परिस्थितीला चांगल्या पद्धतीने समजतो आणि त्यांच्याकडे खूप चांगले गोलंदाजही आहेत. अशातच ऑस्ट्रेलिया माझा फेव्हरेट संघ आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अकरम म्हणाला की, “भारतीय फलंदाजांना इथं खेळणं कठीण वाटेल, पण संघाकडे चांगले फलंदाज आहेत. या फलंदाजांच्या जोरावर सामना बदलण्याची क्षमता टीम इंडियाकडे आहे. पण ऑस्ट्रेलियाचा संघ विश्व टेस्ट चॅम्पियनशिप जिंकण्यासाठी माला फेव्हरेट वाटत आहे.” याआधी झालेल्या विश्व टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये न्यूझीलंडने भारताविरुद्ध विजय मिळवला होता. यावेळी भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वात हा फायनलचा सामना खेळत आहे. यावेळी भारतीय संघ या फायनलमध्ये बाजी मारणार का? हे पाहावं लागणार आहे. २०१३ नंतर टीम इंडियाने आयसीसीचा कोणताही किताब जिंकला नाहीय. धोनीच्या नेतृत्वात २०१३ मध्ये टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीचा किताब जिंकला होता.

नक्की वाचा – WTC फायनलआधी प्रशिक्षक राहुल द्रविडची मोठी प्रतिक्रिया, म्हणाला, “फक्त इतिहास बदलणार नाही, तर…”

टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दूल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनादकट आणि इशान किशन (विकेटकीपर),
राखिव खेळाडू : यशस्वी जैस्वाल, मुकेश कुमार, सूर्यकुमार यादव

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-06-2023 at 11:28 IST
Next Story
WTC फायनलआधी प्रशिक्षक राहुल द्रविडची मोठी प्रतिक्रिया, म्हणाला, “फक्त इतिहास बदलणार नाही, तर…”