Health Special: आज मितीला भारतात साडेआठ कोटींहून लोकांना स्मृतिभ्रंशाचा आजार आहे असे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या संशोधनावरून लक्षात येते. याचा अर्थ स्मृतिभ्रंश ही एक सार्वजनिक आरोग्याची महत्त्वाची समस्या झाली आहे आणि त्यामुळे त्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाढते वय आणि स्मृतिभ्रंश

घरोघरी आपल्याला आजी आजोबांचे वय वाढलेले दिसते. आता बहुतेकदा आजी आजोबा ७५-८०-८५ वर्षांचे असतात. यातले अनेक जण हिंडते फिरते, आपापली कामे करणारे, घरात जबाबदारी उचलणारे असे असतात. भारतात एकूण लोकसंख्येच्या ६.४% लोक ६० वर्षे वयाच्या वरील आहेत आणि २०३० सालापर्यंत हे प्रमाण ८.६% इतके झालेले असेल. समाजातील वृद्धांचे प्रमाण वाढते आहे आणि अर्थातच त्या बरोबर शारीरिक आणि मानसिक आजारांचेही प्रमाण वाढते आहे. ब्लड प्रेशर, डायबिटीस, हृदयरोग, अर्धांगवायू paralysis/ stroke, संधिवात अशा अनेक शारीरिक आजारांबरोबरच डिप्रेशन, अतिचिंता, संशयग्रस्तता आणि डिमेन्शियाचे सुद्धा प्रमाण वाढत चाललेले दिसून येते. आज मितीला भारतात साडेआठ कोटींच्यावर लोकांना स्मृतिभ्रंशाचा आजार आहे असे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या संशोधनावरून लक्षात येते. याचा अर्थ स्मृतिभ्रंश ही एक सार्वजनिक आरोग्याची महत्त्वाची समस्या झाली आहे आणि त्यामुळे त्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक झाले आहे.

हेही वाचा : Jugaad Video : फक्त एका कांद्याच्या मदतीने घरातील डास पळवा, पाहा हा सोपा जुगाड; व्हिडीओ होतोय व्हायरल

हसण्यावारी नेऊ नका…

आपल्या घरातील वृद्ध व्यक्ती जेव्हा काही गोष्टी विसरू लागते किंवा रोजच्या कामात काही चुका करू लागते, घरी आलेल्या नातेवाईकांना ओळखण्यात गडबड करते किंवा एखादे वेळेस रस्ता चुकते त्या वेळेस बहुतेकदा ‘वय झाले, आता असे व्हायचेच’ किंवा ‘आता ह्यांच्यावर काही काम सोपवायला नको, आता आपल्यालाच त्यांची काळजी घ्यायला हवी’, ‘आता ७५ व्या वर्षी यांच्याकडून काय अपेक्षा करणार आपण? चुका व्हायच्याच’ असे आपण म्हणतो आणि आपल्या वृद्ध नातेवाईकांच्या वागण्यातील बदल ‘नॉर्मल’ आहेत, स्वाभाविक आहेत असे वाटून घेतो… एखाद वेळेस घरातल्या माणसांना असे वाटते की, डॉक्टरांना दाखवले पाहिजे; पण शेजारीपाजारी, नातेवाईक हसण्यावरी नेतात, डॉक्टरांकडे जाण्यापासून परावृत्त करतात.

वेळीच उपचार महत्त्वाचे

आपल्याही मनात अनेक शंका येतात, ‘बऱ्याच तपासण्या सांगितल्या तर? अनेक औषधे सुरू केली तर? सारे खूप खर्चिक असले तर? माझा किती वेळ या सगळ्यात जाईल? इतके सगळे करून काही उपयोग होईल का?’ तसेच मनात असाही विचार येतो, की आता या वयात माझ्या आईला/ वडीलांना काय ‘वेडे’ ठरवणार का? वार्धक्यामधील वर्तणुकीतील बदल हे असे ‘कलंक’(stigma)निर्माण करणारे असतात. अशा सर्व कारणांमुळे स्मृतिभ्रंश झालेल्या रुग्णाला बऱ्याच वेळा अशाच वेळी डॉक्टरकडे नेले जाते जेव्हा लक्षणांची तीव्रता वाढते, वागणुकीवर घरच्या घरी नियंत्रण मिळवणे कठीण होऊ लागते.

हेही वाचा : भात करण्याआधी तांदूळ भिजवण्याचे फायदे वाचून व्हाल खुश; डॉक्टर सांगतायत, तांदूळ किती वेळ पाण्यात ठेवावा?

स्मृतिभ्रंश कोणाला होतो? त्याची जोखीम वाढवणारे घटक(risk factors) कोणते?

अनेक मानसिक विकारांप्रमाणे स्मृतिभ्रंश सुद्धा काही प्रमाणात अनुवांशिक आहे. विशेषतः अल्झायमर डिमेन्शिया(Alzheimer dementia) हा स्मृतिभ्रंशाचा प्रकार अनुवांशिक आहे असे सिद्ध झालेले आहे. APOE4 नावाचे जनुक या आजाराला जबाबदार असते. त्यामुळे रुग्णाची माहिती घेताना घराण्यात कोणाला स्मृतिभ्रंशाचा आजार झाला आहे का, हे पहावे लागते. वयाच्या प्रत्येक वाढत्या दशकाबरोबर डिमेन्शियाचे प्रमाण वाढते, म्हणजे ६०-७० वर्षांपेक्षा ७०-८० वर्षांमध्ये आणि ७०-८० वर्षांपेक्षा ८०-९० वर्षांमध्ये डिमेन्शियाचे प्रमाण जास्त असते. महिलांमध्ये स्मृतिभ्रंशाचे प्रमाण जास्त आढळते.

स्मृतिभ्रंशाचा धोका कशामुळे वाढतो?

कमी शिक्षण स्मृतिभ्रंशाची जोखीम वाढवते. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागामध्ये रुग्णांचे प्रमाण जास्त असते. आपली जीवनशैलीही स्मृतिभ्रंश होण्यास कारणीभूत ठरते. आहार, धूम्रपानासारखी सवय, स्थूलपणा, ब्लड प्रेशर, डायबिटीस, स्ट्रोक, हृदयाच्या ठोक्यांच्या वेगाचे विकार (atrial fibrillation), शरीरात मेदाचे प्रमाण(cholesterol) जास्त असणे, या सगळ्यामुळे स्मृतिभ्रंशाचा धोका वाढतो.

हेही वाचा : महिनाभर डाळीचे सेवन न केल्यास आरोग्यावर कोणते परिणाम होऊ शकतात?

स्मृतिभ्रंशाचे प्रकार आणि कारणे

स्मृतिभ्रंशाचे प्रकार आणि कारणे अनेक आहेत. अल्झायमर डिमेनशिया, Vascular dementia, Frontotemporal dementia, Lewy Body dementia, कंपवात (Parkinson’s disease), शरीराच्या हालचालींवर परिणाम करणारे Huntington disease सारखे आजार, अशा अनेक प्रकारचे आजार असतात. ह्या बरोबरच पोषणतील कमतरता, यकृत, किडनी यांचे विकार, एचआयव्ही इन्फेक्शन, Prion disease असे विविध आजारही असतात. प्रकार आणि कारणांबरोबर लक्षणेही काही प्रमाणात वेगवेगळी असतात.

हेही वाचा : रोजच्या आहारात प्रथिनांचा समावेश कसा करावा? जाणून घ्या आठ सोपे मार्ग

गेल्या काही वर्षांमध्ये डिमेन्शियाविषयी बरीच जनजागृती केली जाते आहे आणि त्याचा सकारात्मक उपयोग होतानाही दिसतो आहे. स्मृतिभ्रंश असा आजार असू शकतो, त्याचे लवकर निदान झाले पाहिजे, उपचार केले गेले पाहिजेत असा बदलता दृष्टिकोन आज समाजामध्ये दिसून येतो आहे. स्मृतिभ्रंश झालेल्या व्यक्तीच्या दृष्टीने हा खूप मोठा बदल आहे. वर उल्लेखलेल्या काही प्रमुख प्रकारांची, त्यांच्या लक्षणांची, ओळख पुढील लेखात.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is dementia its symptoms and causes hldc css