Uric Acid Level Chart: युरिक ॲसिड हे शरीराने बनवलेले एक प्रकारचे टॉक्सिन आहे जे प्रत्येकाच्या शरीरात तयार होते. युरिक ॲसिड वाढणे ही समस्या नाही, पण त्यातून वेळीच सुटका नाही झाली तर अनेक समस्या उद्भवू शकतात. रेड मीट, सीफूड, काही मासे, पोल्ट्री उत्पादने आणि गोड पदार्थ यासारख्या प्युरीनयुक्त पदार्थांचे आहारात सेवन केल्याने शरीरातील यूरिक ॲसिडची पातळी वाढते. युरिक ॲसिड वाढल्यानंतर त्याची लक्षणे शरीरात दिसू लागतात. युरिक ॲसिडच्या लक्षणांमध्ये सांधे दुखणे आणि सूज येणे, बोटांना सूज येणे, सांध्यांमध्ये गुठळ्या होणे, बोटांमध्ये दुखणे इत्यादी समस्या निर्माण होतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रक्तात यूरिक ॲसिड किती असावे? Uric Acid Level In Blood

मेडिकल न्यूज टुडेच्या मते, पुरुष आणि महिलांमध्ये यूरिक ॲसिडचे प्रमाण वेगवेगळे असते. २.४ ते ६.० mg/dL या श्रेणीतील युरिक ॲसिडचे प्रमाण स्त्रियांमध्ये सामान्य मानले जाते. जर स्त्रियांमध्ये युरिक ऍसिड ६.० mg/dL पेक्षा कमी असेल तर ते धोकादायक नाही. प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात कमी-जास्त प्रमाणात यूरिक ॲसिड तयार होते, जे किडनीद्वारे फिल्टर केले जाते आणि शरीरातून काढून टाकला जाते. जेव्हा हे विष शरीरात जमा होऊ लागते तेव्हा धोका जास्त वाढतो.

यूरिक ॲसिडची किती असली पाहिजे? वयानुसार चार्ट पाहा

Age Uric Acid level
प्रौढ पुरुष ४.०-८.५ mg/dL किंवा ०.२४-०.५१ mmol/L
प्रौढ महिला २.७-७.३ mg/dL किंवा ०.१६-०.४३ mmol/L
लहान बाळ २.५-५.५ mg/dL किंवा ०.१२-०.३२mmol/L
नवजात बालक २.०-६.२ mg/dL

( हे ही वाचा: बदाम भिजवून खाल्याने खरोखरच फायदा होतो की ही केवळ अफवा? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत..)

महिलांमध्ये यूरिक ऍसिडची पातळी किती असावी? Uric Acid Level In Woman

स्त्रियांमध्ये सामान्य पातळी १.५ ते ६.० mg/dL असते. जेव्हा स्त्रियांमध्ये यूरिक ॲसिडची पातळी ९.५ mg/dL पर्यंत पोहोचते तेव्हा ते शरीराला अधिक नुकसान करू शकते. यूरिक ॲसिडच्या या वाढलेल्या पातळीमुळे किडनी निकामी होणे, रक्तदाब वाढणे आणि मधुमेह होऊ शकतो.

अशा प्रकारे यूरिक ॲसिड नियंत्रित करा Uric Acid Control Tips

  • फळे आणि भाज्यांचे सेवन करा.
  • आहारात प्युरीनयुक्त पदार्थ टाळा.
  • जास्त पाणी प्या
  • लाल मांस, सीफूड टाळा.
  • सोया, पनीर, कडधान्ये यांसारखे प्रथिनेयुक्त पदार्थ टाळा.
  • अन्नामध्ये कमी चरबीयुक्त पदार्थ वापरा. जास्त चरबीयुक्त पदार्थ समस्या वाढवू शकतात.
  • दररोज अर्धा तास चालणे किंवा व्यायाम करणे.
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How much uric acid should be there in woman body see simple chart to control gps