सांगली : पोलीसांच्या तात्काळ मदत केंद्राच्या फोनवर संपर्क साधून नियंत्रण कक्षात बॉम्ब ठेवल्याचा खोटा संदेश देण्याचा प्रकार शनिवारी समोर आला. या प्रकरणी काही तासातच खोटा कॉल करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली असून त्यांने मद्याच्या नशेत हा संदेश दिल्याची कबुली दिली. यामुळे पोलीसांची मात्र धावपळ उडाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याबाबत पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी, आज सकाळी ११.३० वाजता मोबाईलवरुन अज्ञाताने नियंत्रण कक्ष येथे फोन करुन सांगली कंट्रोल रुम मध्ये बॉम्ब लावला आहे, पोलीस मदत हवी आहे अशी अर्धवट माहिती देवून फोन कट केला. सांगली शहर पोलीस ठाणे कडील कर्मचाऱ्यांनी या संदेशाचे गांभीर्य लक्षात घेवुन याबाबत तात्काळ वरिष्ठांना माहिती दिली.

हेही वाचा…Kailas Gorantyal : “जालन्यात राजकीय भूकंप कसे होतात तुम्ही पाहा”, काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचं मोठं विधान, चर्चांना उधाण

पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे सांगली जिल्हा पोलीस कंट्रोल रुम, पोलीस अधीक्षक कार्यालय व बस स्थानक येथे बॉम्ब शोध पथकाकडून तपासणी करण्यात आली. परंतु या कोणत्याही ठिकाणी काहीही आक्षेपार्ह चिजवस्तु मिळुन आल्या नाहीत. त्यामुळे सदरचा कॉल करणाऱ्याने खोटी माहिती दिल्याचे निष्पन्न झाल्याने सदर बाबत सांगली शहर पोलीस ठाणे अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

हेही वाचा…Supriya Sule : “सर्व आरोपी पुण्यातच कसे सापडत आहेत?” संतोष देशमुख हत्येप्रकरणी सुप्रिया सुळेंचा सवाल

तांत्रिक माहितीच्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक नितीन सावंत, कर्मचारी मगदुम, ऐदाळे, कॅप्टन गुंडवाडे, शिंदे यांनी सदरचा कॉलर हा मालगाव येथील तवटे मळयाजवळ राहत असल्याची खात्री केली. त्याच्या आधारे खोटा कॉल करणाऱ्या यमनाप्पा मरगप्पा माडर (वय ५०, रा. तवठे मळा, मालगाव, ता मिरज) याला अटक करण्यात आली. सदरचा कॉल त्याने दारुचे नशेत केल्याचे कबुल केले असुन त्याने यापुर्वी २०२३ मध्ये असाच कॉल केला असलेबाबत मिरज ग्रामीण पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: On saturday false message of bomb being placed in control room by contacting police emergency center came to light sud 02