Raj Thackeray महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. राज ठाकरेंनी त्यांचे अनेक उमेदवार मैदानात उतरवले आहेत. राज ठाकरे ( Raj Thackeray ) हे त्यांच्या पक्षाचा प्रचार करत आहेत. काही वेळापूर्वीच राज ठाकरेंची ( Raj Thackeray ) सभा पार पडली. राज ठाकरेंनी राजकारणी डँबिस का आवडतात असा प्रश्न उपस्थितांना विचारला आहे.

राज ठाकरे काय म्हणाले?

निवडणुकांच्या प्रचारसभा खूप कंटाळवाण्या असतात. कारण तेच तेच बोलावं लागतं. त्यामुळे आम्हा राजकारण्यांसाठी त्या अशा असतात. मात्र ते बोलावं लागतं. महाराष्ट्रात आपल्याला काय करायचं आहे, नवी मुंबईत काय करायचं आहे? या सगळ्या गोष्टींसाठी आपण सभा घेत असतो. या नवी मुंबईला नवी मुंबई का म्हणतात हे अनेकांना माहीतही नसेल. त्यावेळच्या राज्यकर्त्यांचा विचार व्यापक असायचा. नवी मुंबई उभी करावी हा विचार करण्यात आला होता. हा पहिला विचार कुणाच्या डोक्यात आला तर तो त्यावेळी मुख्यमंत्री असणाऱ्या वसंतराव नाईक यांच्या डोक्यात आला. कारण त्यावेळी सगळ्या गोष्टी मोजल्या जात होत्या. १९५० किंवा १९५१ ते १९७० या वीस वर्षांत मुंबईची लोकसंख्या दुपटीने वाढली. त्यामुळे त्यांना वाटलं की मुंबई जास्त लोकांचा भार सहन करु शकणार नाही. त्यामुळे नवी मुंबई उभी राहिली आहे असं राज ठाकरेंनी ( Raj Thackeray ) सांगितलं.

Raj Thackeray Slams Uddhav Thackeray in his Speech
Raj Thackeray : राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका, “बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते माझ्या शिवसेनेची काँग्रेस होताना दिसली तर..”
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…
ajit pawar on cm post
अजित पवार म्हणाले, “धरसोड केली तर तुमची विश्वासार्हता राहात नाही”; मुख्यमंत्रीपदाबाबतही तडजोडीची तयारी!
What Poonam Mahajan Said About Pramod Mahajan ?
Poonam Mahajan : ‘प्रमोद महाजन यांना ठार करण्याचं षडयंत्र कशासाठी आखलं गेलं?’ पूनम महाजन यांचं उत्तर, “त्यांना…”
ajit pawar on sharad pawar (1)
“मी आता काय करायचं हे शरद पवारांनी सांगावं”, अजित पवारांची ‘त्या’ विधानावर टिप्पणी; मांडलं ६० वर्षांचं गणित!
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…

हे पण वाचा- चुकीची माणसं आजपर्यंत निवडून दिल्याने कोकण मागे पडले – राज ठाकरे

आपल्याकडे विकास म्हणजे फक्त इमारती उभ्या केल्या जातात

आपल्याकडे विकास म्हणजे इमारती उभ्या केल्या जातात. नव्या शहरांमध्ये हेच घडतं. पण लोकांचा विचार करुन शहरांची आखणी केली जात नाही. मी नवी मुंबईत ग्राऊंड पाहिलं ते डी. वाय. पाटील यांचं आहे. मग सरकारचं काय? टाऊन प्लानिंग नावाचा प्रकार नाही असं राज ठाकरे म्हणाले. नवी मुंबईत फक्त एक नाट्यगृह आहे. मुंबईत किती नाट्यगृहं आहेत तुम्हीच बघा. शिवाजी पार्क, ओव्हल सारखं मैदान, आझाद मैदान सारखं मैदान इथे नाही. मुंबईची आखणी इंग्रजांनीच योग्य प्रकारे केली होती. हॉस्पिटल हबही इंग्रजांनी केलं. केईएमचा वगैरे भाग पाहिला तर कळेल की सगळी रुग्णालयं एका भागात आहेत असंही राज ठाकरे ( Raj Thackeray ) म्हणाले.

राजकारणी डँबिस का आवडतात?

मध्यंतरी रतन टाटा यांचं निधन झालं. सगळ्या महाराष्ट्राला, देशाला वाईट वाटलं. बरोबर ना? सगळे लोक हळहळले. चांगला माणूस गेला, सरळ माणूस गेला, सज्जन माणूस गेला.. असं वाटलं ना तुम्हाला? प्रत्येकाला वाटलं ना आपल्या घरचा माणूस गेला म्हणून? रतन टाटा गेल्यावर वाटलं की सरळ, सज्जन चांगला माणूस होता. मग राजकारणात तुम्हाला सगळे डँबिस लोक लागतात? रतन टाटांसारखा माणूस आवडतो, तर मग राजकारणातले लोक नालायक आहेत हे का म्हणत नाही? त्यांच्यासाठी मतदानाच्या दिवशी रांग का लावता? एकदा काय ते ठऱवा ना तुम्हाला सरळ सभ्य माणूस आवडतो की हरामखोर माणसं आवडतात असंही राज ठाकरे ( Raj Thackeray ) यावेळी म्हणाले.

Story img Loader