“छत्रपती शिवरायांविषयी वादग्रस्त विधान केल्यानंतर अद्याप कोश्यारी यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. सरकारला शिवभक्तांच्या भावना समजत नसतील तर उठाव होणारच.”, असे म्हणत संभाजीराजे छत्रपती यांनी भाजपा आणि केंद्र सरकारला इशारा दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – “राजकारण म्हणजे मिमिक्री नाही, आपण आता…”; राज ठाकरेंच्या टीकेला संजय राऊतांकडून प्रत्युत्तर!

या पार्श्वभूमीवर आज प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, “कालच छत्रपती संभाजीराजे, छत्रपती उदयनराजे यांनी जी भूमिका घेतलेली आहे ती भूमिका म्हणजे लोकभावना आहे, की राज्यपालांचे कार्यक्रम जिथे होतील ते आम्ही उधळून लावू. ही लोकभावना आहे. अद्याप महाराष्ट्राने संयम राखलेला आहे आणि राज्यपालांचा बचाव केला जातोय, सुंधांशु त्रिवेदींचा बचाव केला जातोय. या महाराष्ट्रात असं कधी घडलं नव्हतं.”

हेही वाचा – भाजपाच्या ‘आराध्य दैवतां’कडून शिवरायांचा अपमान; स्वाभिमानाच्या गोष्टी करून गेले ते किती वेळ हात चोळत बसणार? – संजय राऊत

शिवसेना(ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपा प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून भाजपा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.

याप्रसंगी संजय राऊत यांनी “पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्याकडून जेव्हा अपमान झाला होता, तेव्हा त्यांनी माफी मागितली होती. कारण ते मोठे होते त्यांना कळलं की छत्रपतींविषयी लिखाणात आणि बोलण्यात आपल्याकडून चूक झाली. तेव्हा त्यांनी पंतप्रधान असतानाही माफी मागितली. मोरारजी देसाई मोठे नेते होते, त्यांचा आणि महाराष्ट्राचा वाद आहे. त्यांच्याकडूनही छत्रपतींविषयी काही चुकीची विधानं केली गेली होती, त्यांनीही माफी मागितली. प्रत्येकाने माफी मागितली पण भाजपाचे हे जे टगे आहेत, ते टगे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करून परत महाराष्ट्राला शहाणपणा शिकवता आहेत. हे महाराष्ट्र बघतोय, महाराष्ट्र संतापलेला आहे, महाराष्ट्र आतून खवळलेला आहे आणि याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही, थांबा आणि पाहा.” असंही सांगितलं.

काय म्हणाले आहेत संभाजीराजे छत्रपती? –

छत्रपती संभाजीराजे यांनी पुन्हा एकदा भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली आहे. तसेच या मागणीची दखल घेतली जात नसेल, तर राज्यात उठाव होणार असा इशारा त्यांनी ट्वीटच्या माध्यमातून दिला आहे. ‘भगतसिंह कोश्यारी यांच्यावर अजूनही कोणती कारवाई झालेली नाही. कारवाई होत नाही याचा अर्थ त्यांनी केलेल्या विधानांशी राज्यकर्ते सहमत आहेत का ? महाराष्ट्राच्या जनतेला कुणीही गृहीत धरू नये. शिवभक्तांच्या भावना सरकारला समजत नसतील तर उठाव होणारच’, असे संभाजीराजे आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहे.


उदयनराजे काय म्हणाले आहेत?-

भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी माफीनामा लिहून दिला, असे विधान केले. त्यांची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे की काय? जेव्हा मुघल साम्राज्यासमोर सगळे शरण जात होते, तेव्हा एकटे छत्रपती शिवाजी महाराज ताठ मानेने जनतेसाठी, देशासाठी उभे राहिले होते. त्यांना शरण जायचे असते तर तेव्हाच गेले असते. माफीनामा देण्याची गरज नव्हती. असे वक्तव्य करताना या लोकांना लाज वाटत नाही का? हे लोक कशाचा आधार घेऊन बोलत आहेत,” अशा शब्दांत उदयनराजे यांनी आपला संताप व्यक्त केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay rauts reaction to the role of chhatrapati sambhaji raje udayan raje msr
First published on: 28-11-2022 at 11:19 IST