अजय देवगण आणि आयुष्मान खुराना लवकरच एकत्र पडद्यावर झळकणार; या दिग्दर्शकाच्या चित्रपटावर काम सुरू | ayushmaan khurana and ajay devgn will be seen together in neeraj pandeys next edgy thriller | Loksatta

अजय देवगण आणि आयुष्मान खुराना लवकरच एकत्र पडद्यावर झळकणार; या दिग्दर्शकाच्या चित्रपटावर काम सुरू

हे दोघे कलाकार प्रथमच एकत्र मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत.

अजय देवगण आणि आयुष्मान खुराना लवकरच एकत्र पडद्यावर झळकणार; या दिग्दर्शकाच्या चित्रपटावर काम सुरू
अजय देवगण आणि आयुष्मान खुराना | ajay devgn and ayushman khurana

‘बेबी’, ‘स्पेशल २६’सारखे चित्रपट देणारे दिग्दर्शक नीरज पांडे हे त्यांच्या आगामी चित्रपटावर काम करत आहेत. त्यांनी अभिनेता अजय देवगणला घेऊन ‘चाणक्य’ या प्रोजेक्टची घोषणा केली होती, पण आता तो चित्रपट लांबणीवर पडल्याने नीरज पांडे यांनी अजय देवगणबरोबर एका वेगळ्या चित्रपटावर काम करायला सुरुवात केली आहे. अजय देवगणची यात मुख्य भूमिका असून आता आणखी एक अभिनेता या चित्रपटात दिसायची शक्यता आहे.

या नवीन थ्रिलर चित्रपटात अजय देवगण बरोबर नीरज पांडे यांनी आयुष्मान खुराना याला घेण्याचं ठरवलं आहे. अजय देवगण या चित्रपटाची निर्मिती करणार असल्याचंही सांगितलं जात आहे. ‘पिपिंग मून’च्या मीडिया रीपोर्टनुसार या चित्रपटासाठी नीरज पांडे अजूनही आयुष्मानशी बोलणी करत आहेत. आयुष्मानशी बोलणं झाल्यानंतर लगेचच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होईल असंही सांगण्यात आलं आहे.

आणखी वाचा : आता टीव्हीवरील कार्यक्रम होणार बॉयकॉट; ‘इंडियन आयडल’वर बहिष्कार घालायची मागणी का होत आहे?

चित्रपटाचं नाव, कथा याबाबतीत आणखी काही खुलासा नीरज यांनी केला नसला तरी त्यांच्या इतर चित्रपटांप्रमाणे हा चित्रपटही एक थ्रिलर असणार आहे. अजय देवगण मुख्य भूमिकेत तर आयुष्मान खुरानाला सहाय्यक भूमिकेसाठी विचारण्यात आलं आहे. शिवाय लवकरच या चित्रपटाचे चित्रीकरण भोपाळमध्ये सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

अजय देवगण आणि आयुष्मानबरोबरच अनुपम खेरही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसू शकतात. अजय देवगण हा सध्या त्याच्या ‘दृश्यम २’च्या चित्रीकरणात व्यस्त आहे. तर आयुष्मान खुराना हा त्याच्या आगामी ‘अॅक्शन हीरो’साठी तयारी करत आहे. आयुष्मानचा ‘डॉक्टर जी’ हा चित्रपटही लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
मराठी मालिकांमधील प्रसिद्ध चेहरा ‘दृश्यम २’मध्ये दिसणार, अजय देवगणबरोबर करणार काम

संबंधित बातम्या

“तुम्ही जन्मत:च हिंस्र विकृत आहात की…” सुमीत राघवनला नेटकऱ्याचा प्रश्न; अभिनेत्याच्या आरे कारशेडवरील ‘त्या’ वादग्रस्त ट्वीटनंतर रंगले ट्विटर वॉर
नोरा फतेहीला डान्सरचा चुकीच्या पद्धतीने स्पर्श; व्हिडीओ व्हायरल
“आता लवकरच…” लग्नानंतरची पाठकबाईंची ‘ती’ पोस्ट चर्चेत
विश्लेषण : ‘कांतारा’ चित्रपटातील ‘वराह रुपम’ गाण्यावरचे आक्षेप कोर्टाने फेटाळले; बंदी उठवण्याचे आदेश; नेमका काय होता वाद?
“मी खरा आहे कारण…” मानसी नाईकच्या नवऱ्याची ‘ती’ पोस्ट चर्चेत

व्हिडिओ

ताज्या बातम्या
काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपामध्ये आलेल्या जयवीर शेरगील यांना मिळाली राष्ट्रीय प्रवक्तेपदाची जबाबदारी!
“…तर गंभीर परिणाम भोगावे लागतील”, ‘हर हर महादेव’ चित्रपटावरून संभाजीराजेंचा ‘झी स्टुडिओ’ला इशारा!
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजी-माजी आमदारांचा छत्रपती संभाजीराजेंच्या समाधिस्थानी आत्मक्लेश
Delhi Riots 2020 : दिल्ली दंगल खटल्यात उमर खालिद आणि खालिद सैफीची निर्दोष मुक्तता
विश्लेषण : चीनने ‘शून्य कोविड धोरण’ शिथिल केल्यास काय होणार?