छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस’ हा सर्वाधिक लोकप्रिय शो पैकी एक समजला जातो. बिग बॉस मराठीचे तिसरे पर्व इतर दोन पर्वांपेक्षा जास्तच गाजले. बिग बॉसचे तिसरे पर्व हे फारच चर्चेत पाहायला मिळाले. अभिनेता विशाल निकम हा बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वाचा विजेता ठरला. बिग बॉस मराठी ३ ची टॉप ५ स्पर्धकांपैकी लोकप्रिय स्पर्धक म्हणून मीनल शाहला ओळखले जाते. नुकतंच मीनलने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट लिहित सूत्रसंचालक महेश मांजेरकरांचे आभार मानले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बिग बॉसच्या घरात एंट्री घेतल्यापासून मीनल शाह ही नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असायची. तिच्या खेळाचे अनेकांनी कौतुक केले होते. विशेष म्हणजे बिग बॉस मराठीच्या या सोहळ्याचे सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांनीही मीनले विशेष कौतुक केले होते. तसेच ती त्यांच्या आवडत्या स्पर्धकांपैकी एक असल्याचेही ते अनेकदा म्हटले होते.

मीनल ही इन्स्टाग्रामवर प्रचंड सक्रीय असते. नुकतंच मीनलने महेश मांजरेकरांसोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोद्वारे तिने महेश मांजरेकरांचे आभार मानले आहेत. तिची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे.

“माझा बिग बॉसच्या घरातील प्रवास हा महेश सरांशिवाय अपूर्ण आहे. माझ्या लहानपणापासूनच महेश सर हे माझ्यासाठी एक आदर्श होते. बिग बॉसच्या माध्यमातून त्यांच्यासोबत हे ३ महीने खूप काही शिकायला मिळाले. खुप खुप धन्यवाद. महेश मांजरेकर सर तुम्ही दिलेल्या मार्गदर्शनासाठी व प्रोत्साहनासाठी,” अशी पोस्ट मीनलने शेअर केली आहे.

प्रसाद ओकने लग्नाच्या २५ व्या वाढदिवसानिमित्त पत्नीला दिली ‘प्रेमाची भेट’, म्हणाला…

दरम्यान तिची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे तिच्या या पोस्टला अनेकांना लाईक आणि कमेंट केल्या आहेत. यावरुन अनेक नेटकऱ्यांनी तिला ट्रोलही करण्याचा प्रयत्न केला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi 3 meenal shah gratitude note to mahesh manjrekar on instagram nrp