Aamir Khan : बॉलीवूडमध्ये एकापेक्षा एक हरहुन्नरी अभिनेते आहेत. यामध्ये बॉलीवूडच्या तिन्ही खानची कायम चर्चा होत असते. ते म्हणजे शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान या तिन्ही कलाकारांनी आजवर सिनेसृष्टीला अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. तिघांचेही चित्रपट बॉक्स ऑफिसवर कायम दमदार कमाई करतात. आता हे तिन्ही अभिनेते लवकरच एका चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. आमिर खानने स्वत: यावर प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नुकतेच आमिर खानला ‘रेड सी फिल्म फेस्टिव्हल’मध्ये सन्मानित करण्यात आले. त्यावेळी त्याला सलमान खान आणि शाहरुख खान यांच्याबरोबर काम करण्याच्या शक्यतेवर प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी आमिर खानने यावर प्रतिक्रिया दिली. “मला वाटतं सलमान खान आणि शाहरुख खान दोघांचीही यासाठी संमती आहे. त्यांचंही असं म्हणणं होतं की, आपण तिघांनी एकत्र काम केलं पाहिजे, त्यामुळे आशा आहे की हे लवकरच पूर्ण होईल”, असं आमिर खानने म्हटलं आहे.

हेही वाचा : Video: “तू काय प्रेम करणार?”, आकाशची वसुंधरावर नाराजी; प्रेक्षकांनी केले कौतुक, म्हणाले, “तुमची जोडी…”

आमिरने पुढे यावर याआधी आमच्या तिघांचीही चर्चा झाली होती हेसुद्धा सांगितलं आहे. तो म्हणाला, “जवळपास सहा महिन्यांपूर्वी मी, शाहरुख आणि सलमान एका कार्यक्रमात एकत्र भेटलो होतो, त्यावेळी आम्ही यावर चर्चा केली. खरंतर मी स्वत:च हा मुद्दा सुरू केला होता. मी शाहरुख आणि सलमान खानला म्हटलं, जर आपण तिघांनी एकत्र एका चित्रपटात काम केलं नाही तर ही खरोखर एक दु:खद बाब असेल.”

आमिर खान, सलमान खान आणि शाहरुख खान या तिघांना एकत्र रुपेरी पडद्यावर पाहता यावं अशी त्यांच्या चाहत्यांचीही इच्छा आहे. आमिरने याआधी कपिल शर्मा शोमध्येही यावर प्रतिक्रिया दिली होती. “आम्ही तिघेही इतक्या वर्षांपासून बॉलीवूडमध्ये काम करत आहोत, त्यामुळे आम्ही एकाही चित्रपटात एकत्र काम न करणे हे प्रेक्षकांसाठी अन्यायकारक असेल”, असं आमिर खान म्हणाला होता.

हेही वाचा : Video : पतीसाठी ‘कन्नड’मध्ये खास मेजेस, मंडपात थाटात एन्ट्री अन्…; रेश्मा शिंदेच्या लग्नात मित्रमंडळींच्या डोळ्यात आनंदाश्रू…

दरम्यान, या तिन्ही कलाकारांच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास, १९९४ मध्ये आलेल्या ‘अंदाज अपना अपना’मध्ये सलमान खान आणि आमिर खानने एकत्र काम केलं होतं, तर शाहरुखबरोबर सलमान खाननेदेखील काही चित्रपटांत एकत्र काम केलं आहे. ‘कुछ कुछ होता है’, ‘ट्यूबलाइट’, ‘झिरो’, ‘टाइगर ३’ या आणि अन्य काही चित्रपटांत शाहरुख खान आणि सलमान खान एकत्र रुपेरी पडद्यावर झळकले आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aamir khan statement on doing film with shah rukh khan and salman khan rsj