२ दशकापूर्वीच्या सुपरहिट ‘गदर: एक प्रेम कथा’ या चित्रपटाच्या सिक्वेलची सध्या चांगलीच चर्चा आहे. ‘गदर २’ मध्ये पुन्हा एकदा सनी देओल आणि अमिषा पटेलची जोडी प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. प्रजासत्ताक दिनाचे अवचित्य साधून या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं. आता या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालं असून या चित्रपटातील शेवटच्या दिवशी शूट केलेल्या ॲक्शन सीनचा व्हिडीओ समोर आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झालं असून या चित्रपटातील सनीची पहिली झलक काही दिवसांपूर्वी समोर आली होती. ‘झी स्टुडिओज’च्या एका व्हिडीओमध्ये तो बैलगाडीचा चाक उचलताना दिसला होता. त्यानंतर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये तो हातात मोठा हातोडा घेऊन उभा दिसला. त्या पाठोपाठ आता या चित्रपटाच्या शूटिंगचा बिहाइंड द सीन व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

हेही वाचा : पुन्हा एकदा तारा सिंगची भूमिका साकारण्यासाठी सनी देओलने आकारले ‘इतके’ मानधन, आकडा वाचून व्हाल थक्क

चित्रपटाच्या शूटिंगच्या शेवटच्या दिवशी एक ॲक्शन सीन शूट करण्यात आला. या चित्रपटाची संपूर्ण टीम या सीनसाठी खूप मेहनत घेत असल्याचं या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे. दिग्दर्शकाने ॲक्शन म्हटल्यावर चित्रपटाच्या युनिटमधील सात-आठ जणं आता घट्ट धरलेला दोर सोडताना दिसत आहेत. हा ॲक्शन सीन खूप धमाकेदार असणार असा अंदाज या चित्रपटाचे चाहते व्यक्त करू लागले आहेत. त्यामुळे आता या चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांच्या मनातली उत्सुकता आणखीनच वाढल्याचं दिसत आहे.

आणखी वाचा : Video: ‘गदर २’ चित्रपटातील ॲक्शन सीन लीक, तारा सिंगचा जबरदस्त अंदाज एकदा पाहाच

२००१ प्रदर्शित झालेल्या ‘गदर’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. आता जवळपास २१ वर्षांनंतर या चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘गदर २’ ११ ऑगस्ट २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Behind the scene video of sunny deol starrer most awaited film gadar 2 gets viral rnv
First published on: 20-03-2023 at 14:34 IST