आपल्या अभिनयाने आणि नृत्याने प्रेक्षकांची मनं जिंकणारी बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षित सातत्याने चर्चेत असते. टीव्ही शो वगळता ती सोशल मीडियावरदेखील सक्रीय असते. ती आपल्या डान्सचे व्हिडीओ शेअर करत असते. सध्या सोशल मीडियावर क्वाला चित्रपटातील ‘घोडे पे सवार’ हे गाणे चांगलेच व्हायरल झाले आहे. या गाण्यावरचा डान्स माधुरीने शेअर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

माधुरीचा डान्स पाहणे ही एक पर्वणीच असते. ती उत्तम नृत्यांगना आहे. नुकताच ‘क्वाला’ चित्रपट नेटफिल्क्सवर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट संगीतावर आधारित असून या चित्रपटाची कथा स्वातंत्र्यपूर्व काळातली आहे. या चित्रपटात ‘घोडे पे सवार’ या गाण्यावर अनुष्का शर्माने डान्स केला आहे. तिच्या भावाने हा चित्रपटाची निर्मिती केली आहे.

लेकाबद्दल सोनम कपूर खूपच जागरूक; म्हणाली, “वायूचे फोटो मी तेव्हाच शेअर करेन….”

माधुरीने या गाण्यावर आपल्या अदा दाखवल्यानंतर नेटकरी तसेच कलाकारांनी तिचे कौतुक केलं आहे. चित्रांगदा सिंगने लिहिले, “यू आर लव्ह, तर एकाने लिहले आहे मॅडम खूपच सुंदर, दुसऱ्याने लिहले आहे “या गाण्यासाठी तुम्हीच योग्य आहात.” आणखीन एकाने लिहले आहे “क्या बात हैं मॅडम एकदम मस्त”, एकाने तर चक्क लिहले आहे “अनुष्का शर्मापेक्षा सरस आहात,” अशी कॉमेंट केली आहे.

मध्यंतरी माधुरीने ‘मेरा दिल ये पुकारे…’ या गाण्यावर पल्या डान्सचं रिल बनवून इन्स्टाग्रामवर शेअर केलं होत. पण तिच्या व्हिडीओवर अनेक चाहत्यांनी कमेंट्स करत नापसंती व्यक्त केली आहे. माधुरीने पाकिस्तानी अभिनेत्रींच्या स्टेप्स कॉपी केल्या आहेत असा आरोप त्यांनी केला.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Madhuri dixit shared video on ghode pe sawar song trending on social media spg