Premium

“पुरुषांची असुरक्षितता वाढतेय म्हणूनच…”, नसीरुद्दीन शाहांचे वक्तव्य; ‘या’ दोन दाक्षिणात्य चित्रपटांचा उल्लेख करत म्हणाले…

काही ब्लॉकबस्टर चित्रपटांबद्दल आपलं मत व्यक करत नसीरुद्दीन शाह म्हणाले, “माझा तरुण पिढीवर प्रचंड विश्वास…”

naseeruddin-shah
नसीरुद्दीन शाह पुरुषत्वाबद्दल काय म्हणाले? वाचा

नसीरुद्दीन शाह हे हिंदी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी ओळखले जातात. ते त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठीही प्रसिद्ध आहेत. अनेक अनेक सामाजिक व राजकीय मुद्द्यांवर आपली मतं मांडत असतात. नुकतेच त्यांनी बॉलीवूड चित्रपटांमधील पुरुषत्वाच्या गौरवावर आपले विचार मांडले. आपण ‘RRR’ आणि ‘पुष्पा’ चित्रपटं पाहण्याचा प्रयत्न केला होता पण पाहू शकलो नाही, असंही शाह यांनी सांगितलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

४१ वर्षांच्या संसारानंतर आंतरधर्मीय लग्नाबाबत नसीरुद्दीन शाह म्हणाले, “मला हिंदू असलेल्या रत्नाशी…”

‘यू आर युवा’ या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या एका मुलाखतीत ते म्हणाले की ‘आरआरआर’ आणि ‘पुष्पा’ सारख्या मुख्य प्रवाहातील ब्लॉकबस्टर चित्रपट पाहणं त्यांच्यासाठी कठीण होतं. ‘कबीर सिंग’सारख्या चित्रपटांच्या यशाबद्दल विचारल्यावर शाह यांनी पुरुषांमधील वाढत्या असुरक्षिततेवर भाष्य केले. ते म्हणाले, “पुरुषांची असुरक्षितता वाढत आहे. म्हणूनच पुरुषत्वावर अधिक जोर दिला जात आहे. अमेरिकेत सुपरहिरोज आणि ‘मार्व्हल्स’ चित्रपटांची भरभराट होत आहे आणि ते भारतातही घडत आहे. पण सोबतच, ‘ए वेन्सडे’ सारखे चित्रपट देखील यशस्वी होतात, ज्यात हायपरमस्क्युलिन नायक नाही. पण ते पात्र कसे तरी नायकाच्या श्रेणीत येते कारण तो जे करतो, ते कोणालाही करणे शक्य नाही. मात्र लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. थ्रिल मिळवण्याची ही गरज आहे आणि नेहमीच असेल, असे मला वाटते. पण अनुरागने बनवलेले छोटे चित्रपट, ‘रामप्रसाद की तेरहवी’, ‘गुलमोहर’ यांसारख्या छोट्या चित्रपटांना स्वीकारल्यामुळे या प्रकारच्या संवेदनशील चित्रपटांनाही त्यांचे स्थान मिळेल असे वाटते.”

“राष्ट्रवादाच्या नावाखाली पैसे कमवणे….”, नसीरुद्दीन शाहांच्या ‘त्या’ वक्तव्यावर नाना पाटेकरांची प्रतिक्रिया; म्हणाले, “सत्य घटनांवर…”

काही ब्लॉकबस्टर चित्रपटांबद्दल आपलं मत व्यक करत नसीरुद्दीन शाह म्हणाले, “माझा तरुण पिढीवर प्रचंड विश्वास आहे आणि मला वाटतं की ते आपल्यापेक्षा कितीतरी जास्त विकसित, कितीतरी अधिक माहितीपूर्ण आणि जाणकार आहेत. थ्रिलशिवाय, असे चित्रपट पाहून आणखी काय मिळते याची मी कल्पना करूच शकत नाही. मी ‘आरआरआर’ पाहण्याचा प्रयत्न केला, पण मला तो पाहायला जमलं नाही. मी ‘पुष्पा’ पाहण्याचा प्रयत्न केला, पण मला जमलं नाही. पण मी मणिरत्नमचा चित्रपट पूर्ण पाहिला, कारण तो एक अतिशय सक्षम चित्रपट निर्माता आहे आणि त्याच्याकडे अजेंडा नाही. दुसरीकडे ते चित्रपट (पुष्पा, आरआरआर) तुमच्या आत दडलेल्या थ्रिल किंवा भावनांना भर घालण्याव्यतिरिक्त दुसरं काहीच करत नाही. मी तरी असे चित्रपट पाहण्यासाठी कधीच जाणार नाही,” असं स्पष्ट वक्तव्य त्यांनी केलं.

दरम्यान, यापूर्वी नसीरुद्दीन शाह यांनी ‘द केरला स्टोरी’ आणि ‘गदर २’ या चित्रपटांबद्दल विधान केलं होतं. हे चित्रपट मी पाहिलेले नाहीत पण ते कशाबद्दल आहेत हे मला माहीत आहे. काश्मीर फाइल्स सारखे चित्रपट खूप लोकप्रिय होतात, ही अस्वस्थ करणारी बाब आहे, असं ते म्हणाले होते.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Naseeruddin shah says he couldnt watch rrr and pushpa its a celebration of hyper masculinity hrc

First published on: 27-09-2023 at 08:31 IST
Next Story
कंगना रणौतने राजकारणात येण्याविषयी मांडलं मत; म्हणाली, “मी एक देशभक्त…”