'द काश्मीर फाइल्स' आणि 'गदर २' सारखे चित्रपट मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय होत आहेत हे त्रासदायक आहे, असं वक्तव्य ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे नाराज झालेल्या विवेक अग्रिहोत्री यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं. तसेच त्यांच्या धर्मामुळे कदाचित दहशतवाद्यांवर त्यांचं प्रेम असेल म्हणून ते अशी वक्तव्ये करत आहेत, अशी टीकाही त्यांनी शाहांवर केली. आता शाहांच्या त्याच वक्तव्यावर नाना पाटेकरांची प्रतिक्रिया समोर आली आहे. “त्यांना वाटत असेल की मी खूप…”, ‘वेलकम टू द जंगल’चा भाग नसण्याबद्दल स्पष्टच बोलले नाना पाटेकर नाना पाटेकर यांना नसीरुद्दीन शाहांच्या वक्तव्याबद्दल त्यांचं मत विचारण्यात आलं. "तुम्ही नसीर यांना विचारलं होतं का की त्यांच्यासाठी राष्ट्रवाद म्हणजे काय? माझ्या मते, राष्ट्रावर प्रेम दाखवणे हा राष्ट्रवाद आहे आणि ती वाईट गोष्ट नाही," असं ते म्हणाले. "गदर हा चित्रपट ज्या प्रकारचा आहे, त्यात तसा आशय असेल आणि मी द केरला स्टोरी पाहिला नाही, त्यामुळे मी त्यावर भाष्य करू शकत नाही," असंही नाना पाटेकर यांनी नमूद केलं. प्रेम विवाह करूनही पत्नीपासून वेगळे का राहतात नाना पाटेकर? कोण आहेत त्यांच्या पत्नी? वाचा "राष्ट्रवादाच्या नावाखाली लोकांनी पैसे कमावणे योग्य नाही, सत्य घटनांवर चित्रपट बनवताना त्यांनी वस्तुस्थिती लक्षात ठेवली पाहिजे," असंही नाना म्हणाले. दरम्यान, नाना पाटेकर लवकरच विवेक अग्निहोत्रींच्या ‘द व्हॅक्सिन वॉर’ चित्रपटात दिसणार आहेत. यामध्ये नाना पाटेकर यांनी कोवॅक्सिनचा शोध लावणाऱ्या टीमचे प्रमुख डॉ. बलराम भार्गव यांची भूमिका साकारताना दिसतील. हा चित्रपट २८ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. “मला नग्न केलं होतं,” मराठमोळ्या सोशल मीडिया स्टारचा धक्कादायक खुलासा; म्हणाली, “मला खूप तुच्छतेने…” नसीरुद्दीन शाहांनी काय म्हटलं होतं? “मी ‘द केरला स्टोरी’ किंवा ‘गदर २’सारखे चित्रपट पाहिलेले नाहीत. पण त्यात नेमकं काय दाखवलं जात आहे ते मला चांगलंच ठाऊक आहे. ही फार चिंताजनक बाब आहे की ‘द काश्मीर फाइल्स’सारखे चित्रपट हिट होत आहेत, पण सुधीर मिश्रा, अनुभव सिन्हा, हंसल मेहता यांचे चित्रपट प्रेक्षक पाहत नाहीत. त्यामुळे या दिग्दर्शकांनी या गोष्टींमुळे न डगमगता त्यांचे चित्रपट लोकांसमोर आणायला पाहिजेत असं मला वाटतं,” असं नसीरुद्दीन शाह म्हणाले होते.