Salman Khan Birthday: बॉलिवूड कलाकारांचे वाढदिवस आणि त्या निमित्ताने होणाऱ्या पार्ट्या या चर्चेचा विषय बनतात. बॉलिवूडचा दबंग खान अर्थात सलमान खानचा आज वाढदिवस मात्र त्याच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन कालपासून सुरु झाले आहे. काल रात्रीच बॉलिवूडचे अनेक कलाकार त्याला शुभेच्छा देण्यासाठी आले होते. शाहरुख पासून ते सोनाक्षी सिन्हापर्यंत सर्वांनी लाडक्या भाईजानला शुभेच्छा दिल्या, मात्र सलमानची एक्स गर्लफ्रेंडनेदेखील या पार्टीला हजेरी लावली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सलमान खान हे बॉलिवूडमधील हे एक मोठं नाव आहे. त्याच्या चित्रपटांपेक्षा त्याचे खासगी आयुष्यदेखील चर्चेत राहील आहे. सलमानच्या सुरवातीच्या काळात त्याची नाव अनेक अभिनेत्रींनशी जोडली गेली होती. यातीलच एक अभिनेत्री म्हणजे संगीता बिजलानी, तिनेही या पार्टीला हजेरी लावली होती. या पार्टीतलय तिच्या ड्रेसचीदेखील चर्चा होत आहे.

Video: “मी त्याला शुभेच्छा का देऊ…?” सलमान खानच्या वाढदिवशी ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीला संताप अनावर

१९८६मध्ये संगीता-सलमानने एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली. या दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगत होत्या. जवळपास १० वर्ष दोघं एकमेकांना डेट करत होते. त्यांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं. इतकंच नव्हे तर लग्नपत्रिकाही छापण्यात आली. पण ऐनवेळी दोघांनीही लग्न न करण्याचा निर्णय घेतला. १९८८मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कातिल’ चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आज तिने वयाची ६० पार केली असली तरी तिचं सौंदर्य पाहता वय हा फक्त तिच्यासाठी आकडा असल्याचं लक्षात येतं.

दरम्यान सलमान लवकरच ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात झळकणार आहे. तसेच त्याच्या ‘टायगर ३’ चित्रपटाचे चित्रीकरण लवकरच सुरु होणार आहे. शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटात तो पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan celebrating his 57 birthday actor kisses ex girlfriend sangeeta bijlanis forhead spg