शाहरुख खानच्या बहुचर्चित चित्रपट जवान ७ सप्टेंबरला प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. प्रदर्शनाच्य पहिल्याच दिवशी या चित्रपटाने ७५ कोटींची कमाई केली होती. प्रेक्षकांमध्ये जवानची क्रेझ बघायला मिळत आहे. कमाईच्या बाबतीत या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर आता प्रेक्षक जवानच्या ओटीटी प्रदर्शनाची वाट पाहत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- इस्रायलमध्ये अडकली लोकप्रिय बॉलीवूड अभिनेत्री; संपर्क होईना, चिंता वाढली…

जवान चित्रपटाचे सगळे शो हाऊसफुल झाले होते. अॅडव्हान्स बुकिंगमध्येही या चित्रपटाने मोठी कमाई केली होती. मिळालेल्या माहितीनुसार ‘जवान’ची कामगिरी पाहता अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म या चित्रपटाचे हक्क खरेदी करण्यासाठी उत्सुक आहेत. चित्रपट निर्मात्यांनी हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी नेटफ्लिक्ससोबत २५० कोटी रुपयांचा करार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी म्हणजे २८ किंवा २९ ऑक्टोबरला हा चित्रपटव नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. पण अद्याप शाहरुख खानच्या टीमकडून किंवा निर्मात्यांकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

जवानाची ओटीटी रिलीज डेट अद्याप समोर आलेली नाही. नियमानुसार, कोणताही चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर ४ आठवड्यांनंतर OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होतो. पण जवानला चित्रपटगृहांमध्ये मिळणार प्रतिसाद पाहता प्रेक्षकांना हा चित्रपट ओटीटीवर बघण्यासाठी थोडी वाट पहावी लागण्याची शक्यता आहे.

हेही वाचा- Video : जिनिलीया त्यांच्याजवळ गेली अन्…; देशमुखांच्या सुनेच्या ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष, सर्वत्र होतंय कौतुक

जवानच्या कमाईबाबत बोलायचं झालं तर भारतात या चित्रपटाने ६१८ कोटींची कमाई केली आहे. तर जगभरात या चित्रपटाने ११०० कोटींचा व्यवसाय केला आहे. हिंदीबरोबर या चित्रपटाने तमिळ आणि तेलगूमध्येही चांगला गल्ला जमवला आहे. चित्रपटाला मिळालेल्या प्रतिसादानंतर ‘जवान २’ प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shah rukh khan deepika padukone nayanthara film ott platform netflix new details dpj