सध्या ‘गदर २’ चित्रपटाची सगळीकडे चांगलीच चर्चा आहे. काही दिवसांपूर्वीच‘गदर २’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. दोन दशकांपूर्वी सुपरहिट ठरलेल्या ‘गदर: एक प्रेम कथा’चा सीक्वेल ‘गदर २’ चित्रपट आज ११ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान या चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगला प्रेक्षकांकडून जोरदार प्रतिसाद मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा-‘वेल्कम ३’साठी अक्षय कुमारने घेतलं ‘एवढं’ मानधन; ‘केजीएफ १’ चित्रपटाचं बजेटही पडेल फिकं

चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगबाबत ट्वीट करत माहिती दिली आहे. ‘गदर २’ आत्तापर्यंत २० लाख तिकिट ॲडव्हान्स बुकिंगमध्ये विकली गेली आहेत. गदर २’ च्या पहिल्या दिवसाच्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर, हा चित्रपट पहिल्या दिवशी २० कोटींची कमाई करू शकतो. दुसरीकडे, काही लोकांच्या मते, हा चित्रपट पहिल्या दिवशी ३० कोटींची कमाई देखील करू शकतो. पठाणनंतर हा वर्षातील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर ठरेल, अशी अपेक्षा आहे.

दरम्यान, ‘गदर २’ मध्ये सनी देओल आणि अमीषा पटेलसह, उत्कर्ष शर्मा, सिम्रत कौर, लव्ह सिन्हा, गौरव चोप्रा, मिर सरवार हे कलाकार महत्त्वाच्या भूमिका आहेत. तर रोहित चौधरी आणि मनीष वाधवा यांनी या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunny deol and ameesha patel film gadar 2 20 lakh tickets sold in advance dpj