बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सध्या केबीसीच्या १३ व्या सीजनचं सुत्रसंचालन करताना दिसून येत आहेत. या शोमध्ये अनेक स्पर्धक सहभागी होत आहेत आणि आपल्या ज्ञानाच्या जोरावर मोठी रक्कम जिंकत आहेत. शोमध्ये सहभागी होत असलेल्या अनेक स्पर्धकांना हा खेळ खेळण्यासाठी त्यांना बिग बी प्रोत्साहित करत असतात. पण काही स्पर्धक त्यांच्या हसमुख आणि मनमिळावू संवादामुळे ते फॅन्सचं मन जिंकतातच पण सोबतच बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनाही इम्प्रेस करण्यात ते यशस्वी होतात. या शोमधील स्पर्धक देशबंधु पांडे यांच्याबाबतीत अगदी असंच घडलंय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पाटणामध्ये राहणारे देशबंधु पांडे हे भारतीय रेल्वे कार्यालयात कार्यालय अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. गेल्या १३ वर्षापासून ते कोटामध्ये राहत आहेत. खूप कमी वयातच त्यांचं लग्न झालं. ‘केबीसी १३’ मध्ये ते आपल्या पत्नीसोबत आले होते. त्यांच्या लग्नाला २५ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्यांनी आपल्या पत्नीला एक घर गिफ्ट केलं. या शोमध्ये अतिशन शानदार पद्धतीने ते खेळताना दिसून आले. पण ६ लाख ४० हजार रूपयांचा प्रश्न ते सोडवू शकले नाही आणि घाई गडबडीत उत्तर देण्याच्या नादात त्यांना या शोमधून बाहेर पडावं लागलं. त्यांच्या जवळ आणखी बऱ्याच लाइफलाइन शिल्लक होत्या. पण त्यांनी कोणत्याही लाइफलाइनचा वापर न करता ६ लाख ४० हजार रूपयांच्या प्रश्नाचं उत्तर दिलं खरं, पण यात ते अयशस्वी ठरले. नेमका असा कोणता प्रश्न होता तो आणि काय होतं त्याचं योग्य? ते जाणून घेऊयात.

प्रश्न- यातील कोणता देश पूर्णपणे यूरोपमध्ये स्थित आहे ?

ऑप्शन्स-  ए- रूस
बी- यूक्रेन
सी- कजाकिस्तान
डी- टर्की

खूप विचार करूनही देशबंधु या प्रश्नाचं योग्य उत्तर देऊ शकले नाहीत. या प्रश्नावर त्यांनी खूप विचार केला. पण त्यांच्याकडे बऱ्याच लाइफलाइन शिल्लक राहिल्या आहेत, हे कदाचित त्यांच्या लक्षात आलं नाही. त्यांच्याकडे शिल्लक राहिलेल्या लाइफलाइनचा वापर न करता त्यांनी या प्रश्नाचं उत्तर ‘रूस’ असं दिलं. त्यांनी दिलेलं हे उत्तर चुकीचं होतं. अखेर देशबंधु पांडे यांना ३ लाख २० हजार रूपयांची रक्कम घेऊन घरी परतावं लागलं. यावेळी बोलताना देशबंधु पांडे यांनी सांगितलं की, ते खूपच फिल्मी स्टाईलचे व्यक्ती आहेत आणि ते बिग बीचे मोठे फॅन आहेत. यावेळी त्यांनी बिग बी यांच्या ‘सिलसिला’ या चित्रटातील एक डायलॉग बोलून सर्वाचं मन जिंकून घेतलं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kaun banega crorepati 13 amitabh bachchan show dehshbandhu contestant wrong answer geography question prp