‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचा विजेता अभिनेता अक्षय केळकर लवकरच नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर ‘अबीर गुलाल’ या नव्या मालिकेत अक्षय प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. त्यामुळे सध्या तो चांगलाच चर्चेत आला आहे. अशातच त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे; जी चांगलीच चर्चेत आली आहे.

अभिनेता अक्षय केळकर ‘अबीर गुलाल’ या नव्या मालिकेत अभिनेत्री गायत्री दातार आणि पायल जाधव बरोबर पाहायला मिळणार आहे. या मालिकेत अक्षय अगस्त्यची व्यतिरेखा साकारणार आहे. काही दिवसांपूर्वीच ‘अबीर गुलाल’ मालिकेचा दमदार प्रोमो प्रदर्शित झाला होता. या दमदार प्रोमोमध्येच अक्षय केळकरची जबरदस्त एन्ट्री दाखवण्यात आली होती. सध्या मालिकेच जोरदार चित्रीकरण सुरू आहे. अक्षय केळकरने कोल्हापुरातील चित्रीकरणाचा एक अनुभव चाहत्यांबरोबर शेअर केला आहे.

हेही वाचा – कौलारू घर, अंगण अन्…; ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्याच्या कोकणातील सुंदर घराच्या व्हिडीओने सगळ्यांचं वेधलं लक्ष

अक्षयने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो बैलगाडा चालवताना दिसत आहे. यामागचीच गोष्ट अक्षयने चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. हा व्हिडीओ शेअर करत अभिनेत्याने लिहिलं आहे, “तर हा बैलगाडा, शूटिंगचा भाग नव्हता. कोल्हापुरात ‘अबीर गुलाल’च्या शूटिंगसाठी गेलेलो असताना, सेटच्या जवळून एक दादा त्यांचा हा बैलगाडा घेऊन जात होते आणि खूप इच्छा झाली त्यावर बसायची…सहज म्हणून विचारलं आणि काय…कोल्हापूरची माणसं म्हणजे विषय आहे का? तर हौस पुरवून घेतली…कॉलेजमध्ये असताना अनेकदा चित्र काढलं आहे बैलांचं, बैलगाड्याच… आणि हा तर कसलाच हँडसम आहे.”

अक्षयच्या या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. “तसंच चालता चालता आमच्या गावाकडे ये”, “वाटताय बरं का आमच्या कोल्हापुरातले”, “बैलगाडीवर इतका बिनधास्त बसलेला माणूस मी पहिल्यांदा बघितला”, “नाद एकच बैलगाडा शर्यत…वाटत नाही की पहिल्यांदा बसला आहेस”, “जमलंय बर का”, “मस्त, आमचं कोल्हापूर आहेच भारी”, अशा अनेक प्रतिक्रिया अक्षयच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

हेही वाचा – Video: ‘ठरलं तर मग’ फेम अमित भानुशालीचा बायकोबरोबरचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले, “अरेरे बिचारा…”

दरम्यान, अक्षयच्या कामाबद्दल बोलायचं झालं, ‘अबीर गुलाल’ मालिकेआधी ‘कलर्स मराठी’च्या ‘ढोलकीच्या तालावर’ या कार्यक्रमाच्या निवेदनाची जबाबदारी त्याने पेलली होती. तसंच अक्षयने हिंदी मालिकेतही काम केलं. शिवाय तो ‘दोन कटिंग’ या वेब फिल्ममध्ये समृद्धी केळकरबरोबर पाहायला मिळाला होता.