‘बिग बॉस मराठी’ हा नेहमी चर्चेचा विषय असतो. गेल्या दोन वर्षांपासून ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर काही दिवसांपूर्वी ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाची अधिकृत घोषणा झाली. त्यामुळे ‘बिग बॉस मराठी’च्या चाहत्यांमध्ये एक उत्साह निर्माण झाला आहे. पण यंदाच्या ‘बिग बॉस मराठी’मध्ये एक मोठा बदल झाला आहे. तो म्हणजे ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात महेश मांजरेकरांच्या ऐवजी अभिनेता रितेश देशमुख सुत्रसंचालन करताना दिसणार आहे. अशा या लोकप्रिय मराठी रिअ‍ॅलिटी शोमध्ये झळकलेला एका अभिनेत्याच्या कोकणातील सुंदर घराने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

‘बिग बॉस मराठी’चं दुसरं पर्व चांगलंच गाजलं होतं. याच पर्वात झळकलेला अभिनेता अभिजीत केळकरचं हे कोकणातलं सुंदर घर आहे. याचा व्हिडीओ त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ‘साधी माणसं’ चित्रपटातील ‘ऐरणीच्या देवाला तुला’ गाण्यातील ओळ कॅप्शनला लिहित अभिजीने गावाच्या घराचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत अभिजीतचं कौलूर चिऱ्याचं घर पाहायला मिळत आहे. घराच्या चहूबाजूला नारळासह विविध झाडं दिसत आहेत. तसंच घराबाहेर मोठं अंगण आहे आणि आतमध्ये सुंदर घर पाहायला मिळत आहे.

Divya Agarwal deleted wedding photos
प्रसिद्ध अभिनेत्रीने हटवले लग्न अन् गुढीपाडव्याचे फोटो, तीन महिन्यांतच घेणार मराठमोळ्या पतीपासून घटस्फोट?
mrunal dusanis says live in america is more difficult than India
“अमेरिकेत राहणं खूप अवघड”, चार वर्षांनी भारतात आलेल्या मृणाल दुसानिसने सांगितलं परदेशातील राहणीमान, म्हणाली…
puneri pati viral there is no love like father Emotional Slogan Written Behind puneri riksha Video
“आज पाहिलेली सगळ्यात भारी पुणेरी पाटी” रिक्षामागची पाटी पाहून व्हाल भावूक; पुण्यातला VIDEO व्हायरल
mohena kumari reveals baby girl name
Video: पाच वर्षांपूर्वी अभिनय सोडून मंत्र्याच्या मुलाशी केलं लग्न, दुसऱ्यांदा आई झाली अभिनेत्री; बाळाचं नाव केलं जाहीर
Marathi actress sai lokur is going to in law's house after three years of marriage
लग्नाच्या तीन वर्षानंतर ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री जाणार सासरी; गुड न्यूज देत म्हणाली, “मी खूप…”
bigg boss season new reality show hosting by riteish deshmukh
‘बिग बॉस मराठी’च्या ५ व्या सीझनची घोषणा! महेश मांजरेकरांच्या जागी दिसणार ‘हा’ मराठमोळा बॉलीवूड सुपरस्टार
Marathi Singer Juilee Joglekar answer to troller
“दाताडी” म्हणणाऱ्याला गायिका जुईली जोगळेकरने सुनावलं, म्हणाली, “स्वतःचं थोबाड…”
What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”

हेही वाचा – Video: ‘ठरलं तर मग’ फेम अमित भानुशालीचा बायकोबरोबरचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले, “अरेरे बिचारा…”

अभिजीत सध्या आपल्या कुटुंबासह कोकणात सुट्टी एन्जॉय करत आहे. काही दिवसांपूर्वी त्याने गुहागरच्या समुद्र किनाऱ्यावरील, लेकाचा झाडावर चढतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. हे व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते.

हेही वाचा – Video: ‘पिंकीचा विजय असो’ मालिकेचा ‘या’ दिवशी होणार शेवटचा भाग प्रसारित, ‘असा’ होणार शेवट

हेही वाचा – Video: सतत आयपॅड बघत असल्यामुळे लेकीवर ओरडली क्रांती रेडकर, पण मुलीने दिलं जबरदस्त उत्तर, पाहा व्हिडीओ

हेही वाचा – Video: एक बार देख लीजिए…; जुईली जोगळेकरने गायलं ‘हीरामंडी’तील लोकप्रिय गाणं, नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव

दरम्यान, अभिजीतच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, अलीकडेच तो ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘तुझेच मी गीत गात आहे’मध्ये झळकला होता. या मालिकेत त्याने साकारलेला साहेबराव प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडला होता. याआधी अभिजीत ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर ‘योगयोगेश्वर जय शंकर’ मालिकेत पाहायला मिळाला होता. या मालिकेत बालगंधर्वांच्या भूमिकेत तो दिसला होता. अभिनय क्षेत्राबरोबरच अभिजीत राजकारणात देखील सक्रिय झाला आहे. गेल्या वर्षी त्याने भाजपामध्ये प्रवेश केला होता. भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत अभिजीने भाजपाचा झेंडा हाती घेतला होता. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये अभिजीत दिसत होता.