‘खुपते तिथे गुप्ते’या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रमाच्या तिसऱ्या पर्वाला ४ जून २०२३ पासून सुरुवात झाली होती. एकूण १६ भाग प्रदर्शित झाल्यावर १७ सप्टेंबरला या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला. कार्यक्रमाने टीआरपीच्या शर्यतीतदेखील बाजी मारली होती. त्यामुळे हा शो एवढ्या लवकर का बंद केला? असे प्रश्न चाहते अवधूत गुप्तेला विचारत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : “लाडक्या लेकीचा पहिला सण”, राम चरण आणि उपासनाने साजरी केली गणेश चतुर्थी, पाहा फोटो

‘खुपते तिथे गुप्ते’या कार्यक्रमाच्या तिसऱ्या पर्वाला प्रेक्षकांना भरभरून प्रतिसाद दिला होता. या कार्यक्रमात यंदाच्या पर्वात राज ठाकरे, नारायण राणे, संजय राऊत, अभिजीत बिचुकले, डॉ. अमोल कोल्हे, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, अमोल कोल्हे, श्रेयस तळपदे, अमृता खानविलकर, सई ताम्हणकर, सुबोध भावे, जितेंद्र जोशी आणि सुप्रिया सुळे अशा दिग्गजांनी हजेरी लावली होती. एकूण १६ भाग प्रदर्शित झाल्यावर अवधूत गुप्तेने ट्वीट करत आता हा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार असं जाहीर केलं. यावर असंख्य चाहत्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली.

हेही वाचा : ‘तुझे मेरी कसम’ ते ‘वेड’, रितेश-जिनिलीयाचा रोमॅंटिक व्हिडीओ चर्चेत; नेटकरी म्हणाले, “दादा-वहिनी…”

एका युजरने अवधूत गुप्तेला, “शेवटचा भाग? खूप छान शो होता… आम्ही नेदरलॅंडमधून पाहतो आणि आम्हाला हा कार्यक्रम आवडतोही…का बंद करताय? लय भारी होता अवधुतदा…” असा प्रश्न विचारला. यावर गायक म्हणाला, “पुढचा सीझन लवकरच करणार की वो दादा!!” अवधूतच्या या ट्वीटवरून काही काळ ब्रेक घेऊन या कार्यक्रमाचं नवं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा : “मला घाम फुटला होता”, विजय वर्माने सांगितला करीनासोबत रोमँटिक सीन करण्याचा अनुभव; ‘त्या’ दृश्याबद्दल म्हणाला “ती खूप…”

दरम्यान, ‘खुपते तिथे गुप्ते’ हा कार्यक्रमाचं पहिलं पर्व २५ जून २०११ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. यानंतर दुसरं पर्व २१ फेब्रुवारी २०१३ मध्ये प्रदर्शित करण्यात आलं. दुसऱ्या पर्वानंतर तब्बल १० वर्षांनी ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाचं तिसरं पर्व ४ जून २०२३ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलं. त्यामुळे आता चौथं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला केव्हा येणार याबद्दल चाहत्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Avadhoot gupte replied to his fan when will be the next season of khupte tithe gupte start sva 00
First published on: 19-09-2023 at 10:32 IST