कवरीना कपूर खानने ‘जाने जान’च्या ट्रेलर लाँचच्या वेळी तिला शुटिंगसाठी पती सैफने दिलेल्या सल्ल्याबद्दल सांगितलं होतं. सैफ अली खानने विजय वर्मा आणि जयदीप अहलावत यांच्यासोबत काम करताना करीनाला तयारी करून जाण्यास सांगितलं होतं. याबाबत बोलताना तिने विजय व जयदीपचं कौतुक केलं होतं. आता करीनाच्या या वक्तव्यावर विजय वर्माने प्रतिक्रिया दिली आहे.

पालकांच्या विरोधात जाऊन १८ व्या वर्षी लग्न अन् वर्षभरात घटस्फोट; सुनिधी म्हणाली, “माझ्याकडून चुका झाल्या, पण…”

विजय वर्मा शहनाज गिलशी गप्पा मारताना म्हणाला, “हा तिचा मोठेपणा आहे की ती (करीना) माझ्याबद्दल आणि जयदीपबद्दल अशा प्रकारे बोलली. त्याची खरंच गरज नव्हती. आम्हाला तिने केलेलं कौतुक ऐकून खूप छान वाटलं.” विजयने करीनाला उत्तम अभिनेत्री म्हटलं. “आम्ही तिचे चित्रपट पाहिले आहेत, शिट्ट्या वाजवल्या आहेत आणि जेव्हा त्या व्यक्तीला तुमचं काम आवडतं तेव्हा हे थोडं विचित्र वाटतं, पण आम्ही त्या कौतुकाचा आनंद घेतला,” असं विजय म्हणाला.

दीपिका पदुकोणने शाहरुख खानला किस करतानाचा फोटो केला शेअर, पती रणवीर सिंहच्या कमेंटने वेधलं लक्ष

शहनाज गिलने करीना कपूर जवळपास प्रत्येकाची क्रश आहे आणि तिच्यासोबत रोमँटिक सीन शूट कसा केला याबाबत विचारलं. तेव्हा विजय म्हणाला, “एक दृश्य आहे, जिथे ती माझ्याकडे एका विशिष्ट प्रकारे पाहत आहे आणि ती गाते आहे. तो सीन आला तेव्हा मला घाम फुटला होता.” त्यानंतर शहनाजने करीनाला हॉट म्हटलं. तेव्हा विजय म्हणाला ती अत्यंत करिष्माई देखील आहे. “ती जेव्हा परफॉर्म करते तेव्हा ती खूप सुंदर असते. तिला माहित आहे की तिच्याजवळ अदा आहे,” असं त्याने नमूद केलं.

View this post on Instagram

A post shared by Vijay Varma (@itsvijayvarma)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुजॉय घोष दिग्दर्शित ‘जाने जान’ २१ सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. यात करीना कपूर खान, जयदीप अहलावत आणि विजय वर्माच्या मुख्य भूमिका आहेत.