Bigg Boss Marathi : भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने निक्की तांबोळीला तिचे मित्र घरात तिच्याबद्दल काय-काय गॉसिप करतात याचे व्हिडीओ दाखवले आणि ‘बिग बॉस’च्या घरात संपूर्ण ‘ए’ टीममधील मैत्रीचं समीकरण बदलून गेलं. निक्कीने ‘ए’ ग्रुपमधून एक्झिट घेतल्यापासून त्यांच्या टीममध्ये उभी फूट पडल्याचं पाहायला मिळत आहे. अरबाज, वैभव, जान्हवी आणि निक्की पहिल्या दिवसापासून एकत्र खेळत होते. मात्र, सध्या त्यांच्या मैत्रीत दुरावा निर्माण झाला आहे.
‘बिग बॉस’च्या ( Bigg Boss Marathi ) आजच्या भागात निक्की अन् अरबाजमध्ये टोकाचे वाद झाल्याचं पाहायला मिळालं. या वादात अभिजीत सोडून संपूर्ण घराने उडी घेतली होती. अरबाजने निक्कीवर वैतागून घरात तोडफोड देखील केली. या सगळ्याची शिक्षा म्हणून ‘बिग बॉस’ने अरबाजला मोठी शिक्षा दिली आहे.
हेही वाचा : Video: “मला अजिबात पटलेलं नाही”, अंकिताने धनंजयला नॉमिनेट केल्यामुळे भडकली सोनाली पाटील, म्हणाली, “तुला जान्हवीबद्दल…”
अरबाजकडून या आठवड्याची कॅप्टन्सी काढून घेण्यात आली आहे. याशिवाय आता आगामी भागात निक्की आणि वैभवमध्ये जोरदार भांडण होणार असल्याचं पाहायला मिळालं. अरबाजला शिक्षा मिळाली यासाठी निक्की कारणीभूत असल्याचं घरात प्रत्येकजण बोलत आहे आणि यामुळेच उद्याच्या भागात निक्की आणि वैभवचं वाजणार आहे. या भांडणात दोघांनीही एकमेकांबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरले आहे. दोघांनी एकमेकांची लायकी काढत पुढे, वैभव निक्कीला “थोबाड दिलंय म्हणून काहीपण बोलू नकोस… नाही तुझी मस्ती जिरवली तर बघ” असं सांगतो. यावर निक्की त्याला “गप्प भुसनाळ्या” म्हणते असं नव्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
आक्षेपार्ह शब्दांवर पुष्कर जोगने व्यक्त केली नाराजी
नौकरानी, लायकी, भुसXX अशा शब्दांचा वापर शोमध्ये केल्यावर याबत नेटकऱ्यांसह अभिनेता पुष्कर जोगने तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. अभिनेता लिहितो, “बिग बॉस मराठी या शोमध्ये आपण मराठी संस्कृतीनुसार वागलं पाहिजे. हा एक मनोरंजनात्मक शो असून इथे आपण जिद्दीने खेळलं पाहिजे. काय ही भाषा, हे असं वागणं एकदम चुकीचं आहे. तू महाराणी नक्की होशील पण, निक्की तू हा शो जिंकू शकणार नाहीस. प्रत्येकाचा आदर केला पाहिजे.” तसेच नोकराणी या शब्दाचा अपमान करणं देखील चुकीचं असल्याचं पुष्करने कमेंट्समध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, अन्य काही नेटकऱ्यांनी या ( Bigg Boss Marathi ) प्रोमोवर “निक्कीचे मुद्दे बरोबर आहे पण भाषा चुकीची”, “नासके, भूसनाळ्या अरे काय हे शब्द” अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.
© IE Online Media Services (P) Ltd