कोण आमिर खान? जेव्हा मुंबईच्या टॅक्सी, रिक्षा चालकांनी ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ला फटकारले…

आमिर खानने आपला पहिला चित्रपट प्रेक्षकांनी पाहावा म्हणून चक्क रस्त्यावर उतरावे लागले होते.

कोण आमिर खान? जेव्हा मुंबईच्या टॅक्सी, रिक्षा चालकांनी ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ला फटकारले…
फोटो आमिर खान कयामत से कयामत

आमिर खान आणि त्याचे चित्रपट यांच्यातील वाद काही केल्या संपत नाहीत. काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला पी.के या चित्रपटामुळे आमिर हा वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. इतकंच नव्हे तर गेल्या काही दिवसांपासून आमिर हा त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. आमिर खानच्या दुसऱ्या पत्नीने केलेल्या वादग्रस्त वक्त्यांमुळे त्याला देशभरात टीकेचा सामना करावा लागला होता.

आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. सध्या सोशल मीडियावर या चित्रपटाला मोठ्या विरोधाचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून ट्विटरसह फेसबुक, इन्स्टाग्रामवरही #lalsinghchaddhaboycot हा हॅशटॅग मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसून येत आहे. त्यानंतर आमिरने लगेचच प्रेक्षकांना आवाहन केले आहे की कृपया चित्रपटावर बहिष्कार घालू नका.

आणखी वाचा : ईडीच्या अटकेत असलेल्या माजी पोलीस आयुक्तांची शाहरुखने उडवली होती खिल्ली, म्हणाला “त्यांनाही झुकावे लागते…”

खान मंडळी म्हटंल की, आपसूकच प्रेक्षक चित्रपटगृहांकडे वळणार असे चित्र असते. मात्र सध्या याच मंडळींचे धाबे दणाणले पाहायला मिळत आहेत. पण तुम्हाला माहितीये का, याच खान मंडळींना आपल्या करियरच्या सुरवातीला भरपूर संघर्ष करावा लागला होता. शाहरुख खानचा संघर्ष आज प्रत्येकाला तोंडपाठ आहे. मात्र मिस्टर परफेक्शनिस्ट अशी ओळख असणाऱ्या आमिर खानने आपला पहिला चित्रपट प्रेक्षकांनी पाहावा म्हणून चक्क रस्त्यावर उतरावे लागले होते.

नव्व्दच्या दशकात जेव्हा मनोरंजनाची साधने कमी होती तेव्हा चित्रपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी कलाकार मंडळी वेगवेगळी शक्कल लढवत असायचे. आमिर खानचा पहिलावहिला चित्रपट म्हणजे कयामत से कयामत, त्याआधी यादों की बारात या चित्रपटामध्ये त्याने बालकलाकार म्हणून काम केले होते. कयामत से कयामत चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आमिरने चित्रपटातील काही कलाकारांना घेऊन मुंबईमधील टॅक्सी आणि रिक्षांवर चित्रपटाचे पोस्टर्स लावण्यास सुरुवात केली.

बॉलिवूड चित्रपट सुपरफ्लॉप होण्यामागचं कारण काय? आमिर खान स्पष्टच बोलला

मात्र काही टॅक्सी आणि रिक्षा चालकांनी त्याच्या चित्रपटाचे पोस्टर्स लावण्यास विरोध केला. ‘कोण आमिर खान’? आम्ही त्याला ओळखत नाही, या शब्दात चालकांनी आमिर खानचा अपमान केला होता. मन्सूर खान यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. या चित्रपटाने मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक यश मिळवले होते. आमिर खान आणि जुही चावला हे दोघे रातोरात स्टार बनले. ‘लाल सिंग चड्ढा’ला टक्कर द्यायला अक्षय कुमारचा ‘रक्षाबंधन’ हा चित्रपट येत्या शुक्रवारी प्रदर्शित होत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: When taxi driver denied to stick aamir khans film posters on taxi spg

Next Story
“त्यावेळी नाना पाटेकर चित्रीकरण सोडून…” विकी कौशलच्या वडिलांनी सांगितला कर्करोगाच्या उपाचारादरम्यानचा ‘तो’ प्रसंग
फोटो गॅलरी