मुंबई: उमेदवारी अर्जावर अनुमोदकाची स्वाक्षरी नसल्याने चेंबूरमधील एका अपक्ष उमेदवाराचा उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी रद्द केला आहे. याप्रकरणी अपक्ष उमेदवाराने मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली होती. मात्र उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. दरम्यान, आता या अपक्ष उमेदवाराने सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आशिष गडकरी यांनी अपक्ष उमेदवार म्हणून चेंबूर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी २४ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र अनुमोदकाची स्वाक्षरी नसल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज बाद केला. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात त्यांनी दुसऱ्याच दिवशी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने अनुच्छेद २२६ अन्वये न्यायालयाला निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याचा अधिकार असला तरी तो फक्त निवडणूक प्रक्रिया पुढे नेण्यासाठी असून बाधा घालण्यासाठी नसल्याचे स्पष्ट करीत ही याचिका फेटाळली होती.

हेही वाचा >>>रिझर्व बँकेला ‘लश्कर-ए-तैयबा’च्या नावाने धमकी, कशी आणि कोणती धमकी दिली वाचा…

निवडणूक अधिकाऱ्यांनी पडताळणी न करताच आपला उमेदवारी अर्ज स्वीकारला होता. त्यांनी आपल्याला वेळच दिला नाही. हा अन्याय असून निवडणूक लढवण्यासाठी मला पाच वर्षे वाट पहावी लागणार आहे, असा  आरोप त्यांनी केला. यासंदर्भात आपण सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती आशिष गडकरी यांनी दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Appeal will be filed in the supreme court regarding the cancellation of the independent candidature application form mumbai print news amy