Latest News in Mumbai Today Live पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना परत आणण्यासाठी राज्य सरकारकडून मदतकार्य सुरू करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरिकांसाठी विशेष विमानाची सोय केली. राज्य सरकारने ‘इंडिगो’ आणि एअर इंडिया अशी दोन विशेष विमाने पर्यटकांसाठी केली होती, त्यातून १८४ पर्यटक मुंबईत दाखल झाले. दरम्यान, आणखी २३२ प्रवाशांसाठी आज, शुक्रवारी एका विशेष विमानाची व्यवस्था राज्य सरकारने केली आहे. मुंबईशी संबंधित विविध घडामोडींची माहिती या Blog च्या माध्यमातून घेता येईल…

Live Updates

Mumbai Maharashtra News LIVE Today, 25 April 2025

21:31 (IST) 25 Apr 2025

केंद्र सरकारच्या ‘वेव्हज २०२५’साठी पालिकेचे ४०० हून अधिक अभियंते तैनात, पालिकेच्या पावसाळापूर्व कामावर परिणाम होण्याची शक्यता

केंद्र सरकारच्या ‘वेव्हज २०२५’ या कार्यक्रमाची जबाबदारी मुंबई महानगरपालिकेतील ४०० हून अधिक अभियंत्यांवर सोपविण्यात आली आहे. …अधिक वाचा
21:07 (IST) 25 Apr 2025

विक्रोळीत ई- बाईक टॅक्सीचालकाने केला तरुणीचा विनयभंग

विक्रोळी येथील बस थांब्यावर पहाटे उभ्या असलेल्या २२ वर्षीय तरुणीचा ई – बाईक टॅक्सीचालकाने विनयभंग केला. …सविस्तर वाचा
20:35 (IST) 25 Apr 2025

गिरणी कामगारांना मुंबईतच घरे ? एनटीसी, खटाव मिलसह इतर गिरण्याच्या जागांचा शोध घ्या – उपमुख्यमंत्र्यांचे म्हाडाला निर्देश

गिरणी कामगार आणि काही गिरणी कामगार संघटनांनी मुंबईबाहेरील घरांना विरोध केला असून त्यांनी मुंबईतच घरे देण्याची आग्रही मागणी केली आहे. …वाचा सविस्तर
20:26 (IST) 25 Apr 2025

पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा ब्लाॅक, १६३ लोकल फेऱ्या रद्द होणार

पश्चिम रेल्वेवरील कांदिवली – बोरिवली स्थानकांदरम्यान पुलाची पायाभूत कामे करण्यासाठी मोठा ब्लाॅक घेण्यात येणार आहे. या ब्लाॅकमुळे पश्चिम रेल्वेवरील लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. …सविस्तर वाचा
20:26 (IST) 25 Apr 2025

पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा ब्लाॅक, १६३ लोकल फेऱ्या रद्द होणार

पश्चिम रेल्वेवरील कांदिवली – बोरिवली स्थानकांदरम्यान पुलाची पायाभूत कामे करण्यासाठी मोठा ब्लाॅक घेण्यात येणार आहे. या ब्लाॅकमुळे पश्चिम रेल्वेवरील लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. …सविस्तर वाचा
20:03 (IST) 25 Apr 2025

मुंबई : काँक्रीटच्या शहरात घनदाट जंगलाची निर्मिती, महापालिकेच्या प्रयत्नातून चांदिवलीत ४१ हजार झाडांचे निसर्गवन फुलले

महानगरपालिकेच्या उद्यान खात्याने चांदिवली येथील नाहर अमृत शक्ति गार्डनमध्ये मियावाकी पद्धतीने लावलेल्या झाडांचा उपक्रम यशस्वी झाला आहे. …सविस्तर बातमी
19:40 (IST) 25 Apr 2025

सोन्याच्या दरात मोठी घसरण… हे आहेत आजचे दर…

लग्नसराईच्या दिवसात सोन्याचे दर एक लाखावर गेल्याने ग्राहकांमध्ये चिंता वाढली होती. परंतु आता त्यात पुन्हा घसरण दिसत आहे. …सविस्तर वाचा
19:19 (IST) 25 Apr 2025

मुंबई विद्यापीठात आदिवासी अभ्यास आणि विकास उत्कृष्टता केंद्राची स्थापना करणार

मुंबई विद्यापीठात आदिवासी अभ्यास आणि विकास उत्कृष्टता केंद्राची (सेंटर फॉर एक्सलेन्स इन ट्रायबल स्टडीज अँड डेव्हलपमेंट) लवकरच स्थापना करण्यात येणार आहे. …अधिक वाचा
18:57 (IST) 25 Apr 2025

मुंबई : महानगरपालिकेकडून धार्मिक स्थळी स्वच्छतेचा जागर

मुंबईतील शाळा आणि क्रीडांगणांच्या स्वच्छतेनंतर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने आता धार्मिक स्थळांच्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. …सविस्तर बातमी
18:26 (IST) 25 Apr 2025

राज्यात ३६९९ व्यापगत गृहप्रकल्प… भोगवटा प्रमाणपत्राची सत्यता पडताळणार… कल्याण-डोंबिवलीतील गैरप्रकारच्या पार्श्वभूमीवर महारेराचा निर्णय

राज्यातील व्यापगत गृहप्रकल्पांना महारेराने नोटीसा बजावल्यानंतर ३६९९ गृहप्रकल्प पूर्ण झाल्याचे स्पष्ट करून त्यांचे भोगवटा प्रमाणपत्र महारेराच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. …अधिक वाचा
18:15 (IST) 25 Apr 2025

जे.जे. रुग्णालयात प्रथमच अत्याधुनिक ईव्ही शववाहिनी, ही सेवा सुरू करणारे जे.जे. रुग्णालय हे पहिले शासकीय रुग्णालय

रुग्णालयातून मृतदेह योग्य पद्धतीने घरी नेता यावा, कर्मचारी व नातेवाईकांना संसर्ग होऊ नये या दृष्टीकोनातून जे.जे. रुग्णालयामधील मृतदेहांची वाहतूक करण्यासाठी अद्ययावत व अत्याधुनिक अशा दोन इलेक्ट्रिक शववाहिन्या उपलब्ध करण्यात आल्या आहेत. …सविस्तर वाचा
17:49 (IST) 25 Apr 2025

राज्यात हिवताप… चार महिन्यात २ हजार ७२६ रुग्ण, मुंबईमध्ये सर्वाधिक १ हजार ४०० रुग्ण

गतवर्षीच्या तुलनेत यंदा राज्यामध्ये हिवताचा प्रकोप काही अंशी कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. राज्याच्या तुलनेत मुंबईत गतवर्षीच्या तुलनेत यंदा हिवतापाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. …अधिक वाचा
17:23 (IST) 25 Apr 2025

इथे आढळतात दुर्मिळ काळे वाघ! ओडिशामधील ‘हे’ आहे भारतातील १०७ वे राष्ट्रीय उद्यान..

ओडिशामधील ‘सिमिलिपाल’ उद्यानाला अखेर राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा मिळाला आहे. …अधिक वाचा
17:12 (IST) 25 Apr 2025

पालिकेच्या बैठकीत मूर्तिकारांमध्येच हाणामारी, पीओपी विरुद्ध शाडूची माती वाद चिघळलाभर सभेत पाण्याच्या बाटल्या, खुर्च्या फेकल्या

येत्या गणेशोत्सवात पर्यावरणपूरक सण साजरा करण्यासाठी मुंबई महापालिकेने बोलवलेली मूर्तिकारांची बैठक हाणामारीने गाजली. पीओपी मूर्ती निर्माते विरुद्ध शाडू माती मूर्तिकार परस्परांना भिडले. …सविस्तर बातमी
16:58 (IST) 25 Apr 2025

बदलापूर चकमक प्रकरण : अक्षय शिंदे कोठडी मृत्यूप्रकरणी अद्याप गुन्हा का नोंदवला नाही ? उच्च न्यायालयाचा सरकारला संतप्त प्रश्न

बदलापूरस्थित शाळेतील दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या कोठडी मृत्यूप्रकरणी स्पष्ट आदेश देऊनही पाच पोलिसांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात न आल्यावरून उच्च न्यायालयाने शुक्रवारी राज्य सरकारवर कठोर शब्दांत टीका केली. …सविस्तर वाचा
16:47 (IST) 25 Apr 2025

काश्मीर हा भारताचाच भाग… फिरायला फक्त तिथेच जायचे… अभिनेते सुनील शेट्टी नेमके काय म्हणाले ?

अभिनेते सुनील शेट्टी यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील सेवेसाठी मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्काराने गौरविण्यात आले. …सविस्तर वाचा
14:48 (IST) 25 Apr 2025

मुंबई : क्रीडा भवनच हवे… टाऊन हॉलला कडाडून विरोध…

कोणत्याही परिस्थिती क्रीडा भवनाच्या जागेवर टाऊन हॉल उभारू नये अशी मागणी करण्यात आली आहे. …सविस्तर बातमी
14:13 (IST) 25 Apr 2025

‘त्या’ उपकरप्राप्त इमारतीतील रहिवाशांनाही आता घरे, बृहतसूचीअंतर्गत घरे देण्याचा म्हाडाचा महत्त्वपूर्ण धोरणात्मक निर्णय

दक्षिण मुंबईतील कोसळलेल्या वा रिकाम्या केलेल्या इमारतींमधील तळमजल्यावरील रहिवाशांनाही आता हक्काची घरे देण्याचा महत्त्वपूर्ण धोरणात्मक निर्णय म्हाडा प्राधिकरणाने घेतला आहे. …वाचा सविस्तर
13:26 (IST) 25 Apr 2025

घाटकोपर, कुर्लावासीयांनो आज पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवा, काही भागात शनिवारी पाणीपुरवठा बंद राहणार

घाटकोपर पश्चिम येथे महानगरपालिका प्रशासनामार्फत पाणीपुरवठाविषयक विविध कामे प्रस्तावित असून ही कामे शनिवारी हाती घेण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. …वाचा सविस्तर
13:16 (IST) 25 Apr 2025

पहलगामच्या आघातांवर मानसिक समुपदेशनाची फुंकर… जखमी व त्यांच्या कुटुंबियांसाठी मुंबई महापालिकेची मानसिक आरोग्य सेवा!

समुपदेशन, तीव्र तणावाचे मूल्यमापन, ‘पीटीएसडी’ची (पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर) शक्यता, औषधोपचार आणि आवश्यकतेनुसार रुग्णालयात भरती अशा सेवा दिल्या जाणार आहेत. …अधिक वाचा
12:53 (IST) 25 Apr 2025

मुंबई – अल्माटी आता थेट विमान…

कझाकस्तान आणि भारतादरम्यान सुरू केलेल्या विमान सेवेला २० वर्षे झाली असून त्यानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. …सविस्तर वाचा
11:43 (IST) 25 Apr 2025

एकनाथ शिंदेंविरोधातील विडंबनात्मक गाण्याचे प्रकरण: कुणाल कामराविरोधातील तपास सुरू ठेवा, पण त्याला अटक करू नका, उच्च न्यायालयाचा निर्णय

कुणाल कामराने सादर केलेल्या विडंबनात्मक गाण्यानंतर शिवसेनेच्या (शिंदे) कार्यकर्त्यांनी मुंबईतील खारमधील स्टुडिओची मोडतोड केली होती. …अधिक वाचा
11:26 (IST) 25 Apr 2025

कल्याणस्थित पिसवली गावातील जागा कोणाची ? मालकीहक्काची चौकशी करा – उच्च न्यायालयाचे ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

जागेवर मालकीहक्क सांगणाऱ्या संरक्षण अधिकाऱ्यांना जागेचे अतिक्रमणांपासून संरक्षण करण्यात आलेल्या अपयशाबाबतही न्यायालयाने टीका केली. …अधिक वाचा
11:19 (IST) 25 Apr 2025

पहलगाम हल्ल्यानंतर परतलेल्या पर्यटकांसाठी एसटीची शिवनेरी धावली!

एकूण २५२ पर्यटकांना मुंबई विमानतळावरून त्यांच्या मूळ गावी जाणाऱ्या पर्यटकांसाठी ८ शिवनेरी सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. …अधिक वाचा
10:42 (IST) 25 Apr 2025

सव्वाशे वर्ष जुना पूल आजपासून वाहतुकीसाठी बंद, प्रभादेवी पुलाचे चार-पाच दिवसांत पाडकाम

दक्षिण मुंबईतून अटल सेतूवर अतिजलद जाता यावे यासाठी एमएमआरडीए ४.५ किमी लांबीचा वरळी-शिवडी उन्नत रस्ता बांधत आहे. …सविस्तर वाचा
10:21 (IST) 25 Apr 2025

जैन मंदिर प्रकरण… नेमिनाथ सोसायटीतील रहिवाशांनाही पालिकेकडून नोटीसा ? मंदिर विश्वस्तांच्या तक्रारीनंतर पालिकेची तपासणी

विलेपार्ले पूर्व येथील तेजपाल मार्गावरच्या दिगंबर जैन मंदिरावर मुंबई महापालिकेने केलेल्या पाडकाम कारवाईनंतर मोठा वाद उफाळून आला आहे. …अधिक वाचा
10:14 (IST) 25 Apr 2025

मुंबईला उष्ण व दमट वातावरणापासून दिलासा!

गेल्या दोन आठवड्यांपासून मुंबईकर सततच्या उष्ण आणि दमट वातावरणाने त्रासले आहेत. …सविस्तर वाचा
09:18 (IST) 25 Apr 2025

Mumbai AC Local Trains : पश्चिम रेल्वेवर गारेगार प्रवास करायचाय… तपासा आणि मगच प्रवास करा…

रेल्वे प्रवासात प्रवाशांना उन्हाचे तीव्र चटके सहन करावे लागत आहेत. घामाच्या धारांनी मुंबईकरांना नकोसे झाले आहे.

सविस्तर वाचा…

08:57 (IST) 25 Apr 2025

त्र्यंबकेश्वरसाठी २७५ कोटींच्या कामांना मान्यता, तीर्थक्षेत्र विकास आराखडा

राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या अध्यक्षतेखाली दरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बैठक घेण्यात आली.

सविस्तर वाचा…

08:48 (IST) 25 Apr 2025

राज्यात ५०० पर्यटक दाखल, विशेष विमानांची व्यवस्था; मुख्यमंत्र्यांकडून परिस्थितीचा आढावा

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना परत आणण्यासाठी राज्य सरकारकडून मदतकार्य सुरू करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा…

मुंबई न्यूज लाईव्ह अपडेट्स