Mumbai Breaking News Updates: जानेवारी ते एप्रिल या कालावधीत मुंबईमध्ये करोना रुग्णांची संख्या खूपच कमी आढळून आली होती. परंतु, मे महिन्यात करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे पुणे – नगर रस्त्यावरील केसनंद परिसरात भरधाव ट्रकने धडक दिल्याने पादचाऱ्याचा मृत्यू झाला. ट्रकचालकाकडे परवाना नसल्याचे उघडकीस आले असून, चालक व मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेव्हा मुंबई, पुणे आणि नागपूरसह राज्यातील महत्त्वाच्या शहरातील घडामोडींची माहिती या blog च्या माध्यमातून मिळेल…

Live Updates

Pune Mumbai Nagpur Breaking News Updates, 20 may 2025

 

13:01 (IST) 20 May 2025

मुंबई : इमारतीच्या गच्चीवरून पडून तरुणीचा मृत्यू

या घटनेत कसलाही संशयास्पद प्रकार नसल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी दहिसर पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. …सविस्तर बातमी
12:52 (IST) 20 May 2025

सोनसाखळी चोरणाऱ्या त्रिकुटाला अटक, ३०० सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाच्या आधारे काढला माग

वसीम नूर मोहम्मद शेख (३०), शहीद फरुख शेख (२०), तौफिक रियाज अहमद इदरीशी (२१) अशी आरोपींची नावे आहे. त्यांनी चोरलेली दीड लाखांची सोनसाखळी जप्त करण्यात आली. …सविस्तर बातमी
12:41 (IST) 20 May 2025

ठाणे – घोडबंदर ते भाईंदर बोगदा आणि उन्नत रस्ता प्रकल्पाचा मार्ग मोकळा, आर्थिक निविदेविरोधातील एल. ॲण्ड टी.ची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

तथापि, निविदा प्रक्रियेतील अटींनुसार, निविदा उघडल्यानंतर आणि निर्णय कळवल्यानंतर बोलीची किंमत आठवड्यासाठी सीलबंद लिफाफ्यात ठेवण्याचे आदेश न्यायालयाने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) दिले. …अधिक वाचा
12:35 (IST) 20 May 2025

डॉ. जयंत नारळीकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ, विज्ञान लेखक, महाराष्ट्र भूषण जयंत नारळीकर यांच्या निधनाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केले. …सविस्तर वाचा
12:26 (IST) 20 May 2025

मुंबई : १३ कोटींचे अंमली पदार्थ जप्त, आरसीएफ पोलिसांची कारवाई

मुंबई पोलिसांनी दोन वर्षांमध्ये एमडी तस्करी व विक्रीबाबत ४९५ गुन्ह्यांची नोंद केली असून या गुन्ह्यांमध्ये ७१८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. …अधिक वाचा
12:25 (IST) 20 May 2025

ज्येष्ठांसाठी व्यथा, वेदना, तक्रारींसाठी आता ‘एल्डर लाईन’ मदतीचा आधार…

‘घरात आम्ही दोघं एकटेच, मुलगा परदेशात आहे…’, ‘नातेवाइकांनी आमचं घर बळकावलंय…’, ‘कुटुंबात कुणाशी बोलणंच होत नाही…’ अशा असंख्य व्यथा, वेदना, तक्रारी महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांना ‘एल्डर लाईन’ हेल्पलाइनवर मोकळेपणाने मांडता येणार आहे. …सविस्तर वाचा
12:19 (IST) 20 May 2025

मुंबई विमानतळावरून ५ कोटींचे सोने जप्त, दोघांना अटक

तस्करी करून सोने देशात आणण्याचे प्रकार वाढत आहे. याविरोधात कारवाई करण्यासाठी सीमाशुल्क विभाग सक्रिय झाला आहे. …सविस्तर वाचा
12:14 (IST) 20 May 2025

“केरळ लॉटरी महाराष्ट्राच्या अर्थकारणाला नवी दिशा देणार,” माजी अर्थमंत्र्यांचा विश्वास…

राज्याचे माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी तिरुअनंतपुरम येथे केरळच्या लॉटरी मॉडेलचा सखोल अभ्यास करण्याच्या दृष्टीने भेट दिली. …सविस्तर वाचा
11:40 (IST) 20 May 2025

नवी मुंबईकरांना अक्कल शिकवण्याची गरज नाही,गणेश नाईकांचा विरोधकांवर पलटवार

नवी मुंबईतील पाणीटंचाईवरून विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना वनमंत्री गणेश नाईक यांनी ‘नवी मुंबईकरांना कोणी अक्कल शिकवण्याची गरज नाही’ असे म्हणत जोरदार प्रतिहल्ला केला …अधिक वाचा
11:30 (IST) 20 May 2025

जलसंकटाचे काळे ढग कायम, राज्यातील प्रकल्पांमध्ये २८.५३ टक्के जलसाठा

१९ मे रोजी राज्यातील धरणांमध्ये सरासरी २८.५३ टक्के जलसाठा नोंदवला गेला असून, अमरावती विभाग सर्वाधिक ४०.०८ टक्के जलसाठ्याने पुढे आहे, तर पुणे विभागात केवळ २१.४६ टक्के जलसाठा आहे. काही विभागांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत साठा घटला आहे. …सविस्तर बातमी
11:15 (IST) 20 May 2025

दहा दिवसांनी उलगडले खुनाचे रहस्य, केवळ…

तिशीतील दहा युवक खुनाच्या घटनेत आरोपी असून तिघांना अटक करण्यात आली आहे. …अधिक वाचा
11:07 (IST) 20 May 2025

मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेत ‘असेन मी… नसेन मी…’ सर्वप्रथम; ‘वरवरचे वधू-वर’ द्वितीय, तर ‘उर्मिलायन’ नाटक तृतीय

या स्पर्धेचा सविस्तर निकाल हा महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत समाजमाध्यम खात्यांवर उपलब्ध आहे. …सविस्तर बातमी
11:05 (IST) 20 May 2025

दीपक मानकर यांचा राजीनामा स्वीकारला, नवीन शहराध्यक्षाचा निर्णय चार दिवसांत

बनावट कागदपत्र सादर प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने राष्ट्रवादी (अजित पवार गट) चे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी नैतिकतेच्या भूमिकेतून राजीनामा दिला असून, तो पक्षाने स्वीकारला आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी याबाबत घोषणा केली. …वाचा सविस्तर
10:37 (IST) 20 May 2025

पुणे: राजेंद्र हगवणे यांच्या सुनेच्या आत्महत्येप्रकरणी शवविच्छेदन अहवाल आला समोर; सीसीटीव्हीत अनेक गोष्टी कैद!

राष्ट्रवादी (अजित पवार गट) नेते राजेंद्र हगवणे यांच्या सुनेच्या आत्महत्येप्रकरणी शवविच्छेदन अहवाल समोर आला असून, हत्या व आत्महत्या दोन्ही शक्यता वर्तवण्यात आल्या आहेत. …अधिक वाचा
10:01 (IST) 20 May 2025

ठाणे बोरिवली बोगदा खणायला अर्जुन मुंबईच्या वाटेवर

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) हाती घेण्यात आलेल्या ठाणे-बोरिवली दुहेरी बोगद्याच्या कामाला एमएमआरडीएकडून वेग देण्यात आला आहे. …सविस्तर वाचा
09:21 (IST) 20 May 2025

नगर रस्त्यावर ट्रकच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

नगर रस्त्यावरील केसनंद परिसरात भरधाव ट्रकने धडक दिल्याने पादचाऱ्याचा मृत्यू झाला. ट्रकचालकाकडे परवाना नसल्याचे उघडकीस आले असून, चालक व मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. …सविस्तर वाचा
09:20 (IST) 20 May 2025

‘पुणे बालपुस्तक जत्रा’ उपक्रमांची रेलचेल, २२ ते २५ मे दरम्यान गणेश कला क्रीडा केंद्र येथे आयोजन

‘पुणे बालपुस्तक जत्रा २०२५’ मध्ये २२ ते २५ मे दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रम, पारंपरिक खेळ, कार्यशाळा व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. गणेश कला क्रीडा केंद्रात हा कार्यक्रम विनामूल्य प्रवेशासह भरवण्यात येणार आहे. …सविस्तर बातमी
09:18 (IST) 20 May 2025

मुंबईमध्ये मे महिन्यात करोना रुग्णांच्या संख्येत वाढ

जानेवारी ते एप्रिल या कालावधीत मुंबईमध्ये करोना रुग्णांची संख्या खूपच कमी आढळून आली होती. परंतु, मे महिन्यात करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसत आहे. करोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे

मुंबई पुणे नागपूर ब्रेकिंग न्यूज टुडे